Photo Credit- Social Media दिल्ली विधानसभा निवडणूक
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज (7 जानेवारी) जाहीर होणार आहेत. दिल्लीत एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होऊ शकते आणि 17 फेब्रुवारीला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगातर्फे आज दुपारी दोन वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये आगामी निवडणुकीची प्रक्रिया आणि संबंधित बाबींची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी (6 जानेवारी) दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर केली. या यादीत एकूण 1 कोटी 55 लाख 24 हजार 858 मतदारांची नोंद आहे. यामध्ये 84 लाख 49 हजार 645 पुरुष मतदार आहेत, तर 71 लाख 73 हजार 952 महिला मतदार आहेत. येत्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 15 फेब्रुवारी 2025 रोजी संपत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर 2020 मध्येही दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात निवडणुका झाल्या होत्या. त्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवून सरकार स्थापन केले होते. आता कार्यकाळाची शेवटची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी दिल्लीत आगामी निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे.
आज लाँच होणार OnePlus चे दोन ब्रँड न्यू स्मार्टफोन! कधी आणि कुठे पाहता येणार ईव्हेंट
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळीही नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्यांची स्पर्धा काँग्रेसचे संदीप दीक्षित आणि भाजपचे प्रवेश वर्मा यांच्याशी आहे. केजरीवाल यांनी या जागेवरून नेहमीच निवडणूक लढवली असून त्यांची येथे मजबूत पकड आहे. नवी दिल्लीची जागा ही व्हीआयपी जागा मानली जाते, त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोघांनीही आपापल्या प्रमुख नेत्यांना उमेदवार म्हणून उभे केले आहे, त्यामुळे ही लढत आणखी रंजक झाली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री आतिशी कालकाजी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत जिथे त्यांचा सामना काँग्रेसच्या अलका लांबा आणि भाजपचे माजी खासदार रमेश बिधुडी यांच्याशी होईल.
गेल्या विधानसभा निवडणुकांबद्दल बोलायचे झाले तर याआधी 2020 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुका आम आदमी पक्षाने जिंकल्या होत्या. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आता फक्त तारखांची प्रतीक्षा आहे. मतदार यादी दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले आहे. गेल्या सोमवारी निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर केली होती. या यादीत एकूण 1,55,24,7858 मतदार आहेत. यामध्ये 85,49,645 पुरुष मतदार आहेत, तर 71,73,952 महिला मतदार आहेत. तर 1261 मतदार हे तृतीयपंथी आहेत. त्याच वेळी, सुमारे 2 लाख मतदार 18 ते 19 वयोगटातील आहेत जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
लातूरकरांनो, मिळकतकराची थकबाकी ठेऊ नकाच; नाहीतर मिळकतच होणार जप्त






