
Delhi Police Jantar Mantar Protest Supreme Court:
पोलीस उपआयुक्त सचिन शर्मा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, आंदोलनादरम्यान जमाव हिंसक आणि अनियंत्रित झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी टप्प्याटप्प्याने बळाचा वापर करण्यात आला. पोलिसांनी आंदोलन नियंत्रणात आणत असताना विद्यार्थ्यांवर कोणत्याही अतिरिक्त बळाचा वापर केला गेला नाही, असाही गावा केला आहे.
पोलिसांनी उपलब्ध आणि कायदेशीर मार्गांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आंदोलनादरम्यान जमावाने बॅरिकेड्सचे अनेक थर तोडून संसदेच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिस्थिती अनियंत्रित होत असल्याचे लक्षात आल्याने जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला, असेही या प्रतिज्ञापत्रात नमुद करण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेल्या निवेदनानुसार, २० जुलै रोजी जंतर मंतर परिसरात ३०,००० हून अधिक आंदोलक उपस्थित होते. सुमारे तीन किलोमीटर परिसरात पसरलेल्या एवढ्या मोठ्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी अंदाजे ५,००० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
विद्यार्थी आंदोलकांवरील कथित पोलीस अत्याचारांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांना उत्तर म्हणून हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. हे निवेदन अशा चार संबंधित याचिकांसाठी संयुक्त उत्तर म्हणूनही वापरला जाईल असेही दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.
BJP New National Team: भाजपच्या नव्या राष्ट्रीय टीममधून 2029च्या निवडणुकीची रणनीती
पोलिसांनी आपल्या प्रतिज्ञापत्रानुसार, आंदोलकांना नियंत्रित करण्याची कारवाई अचानक केली गेली नाही, तर परिस्थिती बिघडल्यानंतर टप्प्याटप्प्याने करण्यात आली. जमावाने बॅरिकेड्स ओलांडून संसदेच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक झाले, असे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसी बळाचा वापर जमावाला इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने नव्हता, तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होता. पोलिसांनी अतिरिक्त बळाच्या वापराचे आरोप फेटाळून लावले आणि आपली कारवाई योग्य व कायदेशीर चौकटीत असल्याचे दिल्ली पोलिसांनी न्यायालयासमोर नमुद केलं आहे.
याशिवाय २० ते २६ जुलै दरम्यान, नोंदींच्या आधारे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकूण २,८७३ लोकांची ओळख पटवण्यात आली. यापैकी ९२ जण १० पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये सामील होते. ४७ जण सराईत गुन्हेगार होते. काहींवर खून, बलात्कार, पॉक्सो आणि एनडीपीएस सारख्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप होते. पोलिसांनी म्हटले आहे की, त्यांचा तपास केवळ या २,८७३ लोकांपुरता मर्यादित असेल.