Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde News: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल!; एकनाथ शिंदेंचे मोठे आवाहन

Eknath Shinde: शिक्षण विभागाकडून सुरू असलेल्या विविध चांगल्या उपक्रमामुळे शाळा आणि विद्याथ्यांमध्ये घडत असलेले सकारात्मक बदल जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. चांगल्या कामांची माहिती व्यापक स्तरावर गेल्यास इतर शाळानाही प्रेरणा मिळेल आणि लोकसहभाग वाढेल, असे त्यानी स्पष्ट केले.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 24, 2026 | 03:02 PM
Maharashtra Education Reform

Maharashtra Education Reform

Follow Us
Follow Us:
  • लोकप्रतिनिधींनी (आमदार-खासदार) आपल्या क्षेत्रातील शाळा दत्तक घेऊन विकास करण्याचे आवाहन
  • नंदनवन बंगल्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि अधिकाऱ्यांसोबत ४ तास सखोल आढावा
  • तज्ज्ञ शिक्षकांच्या सहकार्याने विशेष प्रशिक्षण व उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान
School Education Department Meeting:  राज्यातील शिक्षण व्यवस्थेत व्यापक आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले आहे. आपल्या मतदारसंघातील शाळांच्या विकासासाठी आमदार आणि खासदारांनी शाळा दत्तक घेऊन उपलब्ध निधी तसेच स्थानिक संसाधनांच्या माध्यमातून योगदान द्यावे, असे निर्देश शिंदे यांनी दिले.

राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘मिशन मोड’वर काम करावे, अशा सूचना देतानाच शिंदे यांनी शनिवारी नंदनवन बंगल्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तब्बल चार तास बैठक घेतली. शालेय शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शिक्षकांचे सक्षमीकरण, विद्याथ्यर्थ्यांच्या विकासासाठी स्पष्ट व कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले.

Sanjay Raut Slams Narendra Modi: चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे 

शाळांनाही प्रेरणा मिळेल : एकनाथ शिंदे

शिक्षण विभागाकडून सुरू असलेल्या विविध चांगल्या उपक्रमामुळे शाळा आणि विद्याथ्यांमध्ये घडत असलेले सकारात्मक बदल जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. चांगल्या कामांची माहिती व्यापक स्तरावर गेल्यास इतर शाळांनाही प्रेरणा मिळेल आणि लोकसहभाग वाढेल, असे त्यानी स्पष्ट केले. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांच्या सहभागातून शिक्षकांसाठी प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि प्रेरणादायी उपक्रम राबवावेत, तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करावा, असेही बैठकीत ठरविण्यात आले. केंद्र सरकारच्या शिक्षणविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही भर देण्यात आला.

आधुनिकीकरणासाठी कॉर्पोरेट क्षेत्राचे सहकार्य

विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक विकास केंद्रस्थानी ठेवून आरोग्य तपासणी, पोषण, मध्यान्ह भोजन आणि मानसिक आरोग्यविषयक उपक्रमांना अधिक महत्त्व देण्याच्या सूचना शिदे यांनी दिल्या. शाळांच्या आधुनिकीकरणासाठी कॉर्पोरेट क्षेत्राचे सहकार्य घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, शिक्षण क्षेत्रातील बदल केवळ कागदावर न राहता ते प्रत्यक्ष प्रत्येक शाळेत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत, यावर शिंदे यांनी विशेष भर दिला.

Sharad Ratna Awards : कलाकारांसाठी मोठी बातमी! मुंबईत रंगणार ‘शरद रत्न पुरस्कार’ सोहळा, पुणे बैठकीत

समाजातील सर्व घटकांचा सहभाग हवा

पालक, माजी विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थांसह लोकप्रतिनिधींनीही आपल्या मतदारसंघातील शाळांच्या विकासाची जबाबदारी स्वीकारावी, असे शिदे यांनी सांगितले. आमदार आणि खासदारांनी शाळा दत्तक घेतल्यास त्याच्या निधीतून तसेच स्थानिक पातळीवरील उपलब्ध संसाधनांतून शाळांमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, केवळ सरकारी योजनांवर अवलंबून न राहता शाळाच्या विकासासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 

Web Title: Deputy cm eknath shinde appeals mps mlas to adopt schools education department review meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • dada bhuse
  • Education Department
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

एकनाथ शिंदे यांच्याकडून चाकण MIDC ची पाहणी; ‘या’ समस्यांवर तातडीने उपाययोजनांचे दिले निर्देश
1

एकनाथ शिंदे यांच्याकडून चाकण MIDC ची पाहणी; ‘या’ समस्यांवर तातडीने उपाययोजनांचे दिले निर्देश

महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल; एकनाथ शिंदेंचे ‘मिशन मोड’वर काम करण्याचे शिक्षण विभागाला निर्देश
2

महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल; एकनाथ शिंदेंचे ‘मिशन मोड’वर काम करण्याचे शिक्षण विभागाला निर्देश

Amruta Khanvilkar: अभिनयासोबत उद्योजकतेतही अमृताची झेप; अवघ्या ५ महिन्यांत ६१ ब्रँड्सना एकत्र आणत भरवलं ‘अमूल्यवैभव’ प्रदर्शन
3

Amruta Khanvilkar: अभिनयासोबत उद्योजकतेतही अमृताची झेप; अवघ्या ५ महिन्यांत ६१ ब्रँड्सना एकत्र आणत भरवलं ‘अमूल्यवैभव’ प्रदर्शन

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा
4

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.