Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गडकरींप्रमाणेच फडणवीसांचे पंतप्रधानपदाचे पंख…’, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा, तर आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटले जात असल्याचा आणि ते विमानात हतबल दिसल्याचा दावा केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मला पंखच नाहीत, मी विमानात वेबसिरीज पाहत होतो" असे म्हणत मिश्किल आणि सडेतोड उत्तर दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 28, 2026 | 03:39 PM
'जो राम का नहीं, वो किसी काम का नहीं'; उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांचा टोला

'जो राम का नहीं, वो किसी काम का नहीं'; उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांचा टोला

Follow Us
Follow Us:
  • ‘गडकरींप्रमाणेच फडणवीसांचे पंतप्रधानपदाचे पंख…’,
  • उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा
  • तर आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. उबाठा नेते उद्धव ठाकरे सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी “केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असा खळबळजनक दावा केला होता. उद्धव ठाकरेंच्या या विधानाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मला कुठले पंखच नाहीत, तर माझे पंख कोण छाटणार? आपण काय वेड्यांच्या बाजारात बसलोय का? अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

विमानात फडणवीस हतबल दिसत होते – उद्धव ठाकरेंचा निशाणा

विदर्भ-मराठवाडा दौऱ्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कालपरवा ते नागपूरच्या प्रवासात माझ्यासोबत विमानात बसले होते. पण ते प्रचंड हतबल दिसत होते. ते मुख्यमंत्री आहेत की नाही, हे कळतच नव्हते. त्यांनी आपला आत्मविश्वास गमावला आहे, असे ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी नितीन गडकरींचा संदर्भ दिला. नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण नंतर काय झाले? त्यांच्या इथेनॉलमध्ये पाणी टाकून त्यांचे पंख छाटण्यात आले. आता गडकरी कुठे आहेत? जो जो शर्यतीत येतो, त्याला हे लोक वेळेवर बाजूला करतात, असा गंभीर आरोप ठाकरेंनी केला.

Sanjay Shirsat: ‘आम्हाला ऑपरेशन टायगर ३…’, उबाठा आमदारांच्या पक्षबदलाच्या चर्चांवर संजय शिरसाट यांचे मोठे वक्तव्य

फडणवीसांचा पलटवार

उद्धव ठाकरेंच्या या विधानावर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना खोचक टिप्पणी केली. फडणवीस म्हणाले, माझ्याकडे उडायला पंखच नाहीत, मी जमिनीवर चालणारा माणूस आहे. त्यामुळे माझे पंख कोण छाटणार? माझ्या पाठीशी महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचा आणि पक्षाच्या वरिष्ठांचा खंबीर आशीर्वाद आहे. विमानातील प्रवासाबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, आम्ही एकाच सर्व्हिस फ्लाईटमध्ये योगायोगाने प्रवास करत होतो. उद्धव ठाकरे एका बाजूला बसले होते आणि मी दुसऱ्या बाजूला होतो. जर आम्ही शेजारी-शेजारी बसलो असतो, तर नक्कीच गप्पा मारल्या असत्या. पण मी विमानात असताना मोबाईलवर आधीच डाऊनलोड केलेली एक वेबसिरीज पाहण्यात व्यस्त होतो. या सर्व्हिस फ्लाईटमधील प्रवासावर एवढी चर्चा होताना पाहून मला प्रश्न पडला की, आपण काय वेड्यांच्या बाजारात बसलोय का?

‘विमानापेक्षा इमान महत्त्वाचं’ – एकनाथ शिंदे

या विमानप्रवासाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “जनतेने त्यांना एकाच विमानातून प्रवास करण्याचं तिकीट दिलं होतं, पण त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून प्रवास सुरू केला. त्यामुळे आज ते गटांगळ्या खात आहेत. पुन्हा एकदा अशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, देवेंद्रजी खूप हुशार आहेत. 2019 मध्ये कपटी मित्र किती घातक ठरू शकतो, हे त्यांनी पाहिलं आहे.”

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन…

Web Title: Devendra fadnavis witty reply to uddhav thackerays claim on pm post and nitin gadkari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • Maharashtra Political
  • Nitin Gadkari
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो,’ नागपुरात भाजप नेते, कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाण यांच्या कडून बैठकीत थेट कानपिचक्या
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो,’ नागपुरात भाजप नेते, कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाण यांच्या कडून बैठकीत थेट कानपिचक्या

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
2

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

कोरेगाव-बिरदवडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना साकडे
3

कोरेगाव-बिरदवडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना साकडे

BJP Seva Abhiyan Satara District: सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार!; साताऱ्यात भाजपाचे ‘सेवा अभियान’ यशस्वी
4

BJP Seva Abhiyan Satara District: सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार!; साताऱ्यात भाजपाचे ‘सेवा अभियान’ यशस्वी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.