Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath SHinde : “कमळाचा विजय म्हणजे विकासाला जनतेची पसंती”, पश्चिम बंगाल निकालांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल आणि आसाममधील निवडणूक निकालांचे स्वागत करत हा विजय भारतीय जनता पक्षावरील जनतेच्या विश्वासाची पावती असल्याचे म्हटले.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 04, 2026 | 06:27 PM
Eknath Shinde Live : सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर एकनाथ शिंदे पत्रकार परिषद

Eknath Shinde Live : सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर एकनाथ शिंदे पत्रकार परिषद

Follow Us
Follow Us:
  • बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जी यांना पराभवाची झालमुडी खाऊ घातली
  • आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा कमळ
  • सुनेत्रा पवार यांच्या विक्रमी विजयाबद्दल केले अभिनंदन
मुंबई : शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल व आसाम येथील निवडणूक निकालांचे स्वागत केले आहे. हा भव्य विजय म्हणजे भारतीय जनता पक्षावरील जनतेच्या विश्वासाची तसेच, विकासाभिमुख राजकारणावरील पसंतीची मोठी पावती असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे. आजचे विधानसभा निवडणुकीचे निकाल देशातील राजकारणाला निश्चितपणे नवी दिशा देतील, असा विश्वास त्यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधताना व्यक्त केला .

पश्चिम बंगालने दिला परिवर्तनाचा कौल

पश्चिम बंगालमधील निकालांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये प्रथमच पूर्ण बहुमतासह कमळ फुलणे हा लोकशाहीचा खरा विजय आहे. जनतेने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची गुंडागर्दी आणि भ्रष्टाचार पूर्णपणे नाकारला आहे. जनतेने विकास, स्थैर्य आणि शांततेच्या बाजूने कौल दिला आहे. शिवाय, बंगालच्या जनतेने यावेळी ममता बॅनर्जी यांना पराभवाची झालमुडी खाऊ घातल्याचा टोलाही शिंदे यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात हायवेचे जाळे विस्तारणार! नितीन गडकरींकडून ५२७ किमीच्या प्रकल्पांचा आढावा; कनेक्टिव्हिटीला मिळणार वेग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता बंगालमध्ये ‘डबल इंजिन’ सरकारद्वारे विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरुद्ध जनतेच्या मनात असलेला रोष मतदानातून स्पष्ट दिसून आला असून, “सबका साथ, सबका विकास” या धोरणाला बंगालमध्ये व्यापक पाठिंबा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

रणनीती, संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांचा संघर्ष

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आखलेल्या चाणक्यासारख्या रणनीतीमुळे ममता बॅनर्जींचा अभेद्य किल्ला कोसळला आहे. अमित शाह यांची भक्कम रणनीती, तसेच, तळागाळातील कार्यकर्त्यांची अथक मेहनत यामुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाला आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या भूमीत भाजपचा विजय हा विचारांच्या विजयाचा क्षण असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील ही यशस्वी कामगिरी विशेष महत्त्वाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दडपशाही सहन करतही कार्यकर्त्यांनी उभारलेला लढा आज यशस्वी ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

आसाममध्ये विकासाच्या राजकारणाला जनतेची पसंती

आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता देत जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांच्या कार्यशैलीवर शिक्कामोर्तब केले आहे. हा विजय म्हणजे विकास, स्थैर्य आणि पारदर्शक प्रशासन यांना मिळालेली जनतेची ठाम साथ असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

बारामतीतील विजयाचेही स्वागत

याचबरोबर, महाराष्ट्रातील बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विक्रमी विजयाबद्दलही एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले. बारामतीच्या जनतेने विकासाभिमुख राजकारणाला पाठिंबा देत अजित पवार यांच्या प्रगतिशील विचारांना कौल दिला आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. देशभरात विकास आणि सुशासनाच्या मुद्द्यांवर आधारित राजकारण अधिक बळकट होत असल्याचे या निकालांतून स्पष्ट होत आहे. आगामी काळात याचा सकारात्मक परिणाम देशाच्या प्रगतीवर दिसून येईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

तामिळनाडूमध्ये एम. के. स्टॅलिनच्या पराभवावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी तामिळनाडूच्या जनतेचे आभार मानले. ते म्हणाले की, स्टॅलिन अनेकदा सनातन आणि हिंदुत्वाबाबत वादग्रस्त विधाने करत असे, त्यामुळे तेथील जनतेने त्याला धडा शिकवून पराभूत केले. शिंदे म्हणाले की, या निकालावरून हे स्पष्ट होते की लोकशाहीमध्ये जनताच सर्वोच्च असते.

Mira Bhayander : अतिक्रमण झालेल्या झोपड्यांना भीषण आग; निष्काळजीपणामुळे महानगरपालिकेवर टीकेची झोड

Web Title: Eknath shinde reaction west bengal election results bjp victory marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • West Bengal Election Result 2026

संबंधित बातम्या

Sangli News : दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश
1

Sangli News : दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबईत एकनाथ शिंदेंचा नवा प्लान? सचिन अहिरांकडे संघटनेची धुरा सोपवण्याच्या हालचालींना वेग
2

मुंबईत एकनाथ शिंदेंचा नवा प्लान? सचिन अहिरांकडे संघटनेची धुरा सोपवण्याच्या हालचालींना वेग

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
3

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Satara Har Ghar Tiranga Abhiyan 2026: सातार्‍यातील मोती चौकात १००० तिरंगा ध्वजांचे वाटप
4

Satara Har Ghar Tiranga Abhiyan 2026: सातार्‍यातील मोती चौकात १००० तिरंगा ध्वजांचे वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.