Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Politics: सांगली राजकीय वर्तुळात खळबळ! जतमध्ये दोन माजी आमदारांसह ४० जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

Sangli News : या कारवाईत माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब आणि माजी सभापती तम्मणगौडा रवीपाटील यांच्यासह इतर पक्षांतील नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 29, 2026 | 03:34 PM
Sangli News, Jat Politics, Vilasrao Jagtap, Vikramsinh Sawant

Sangli News, Jat Politics, Vilasrao Jagtap, Vikramsinh Sawant

Follow Us
Follow Us:
  • सांगलीच्या जतमध्ये तालुक्याचे नामांतर व पाणीप्रश्नावरून सर्वपक्षीय आंदोलन
  • रस्ता रोको आणि सरकारविरोधात भाषणे केल्याप्रकरणी ४० जणांवर गुन्हा दाखल
  • माजी आमदार विलासराव जगताप आणि विक्रमसिंह सावंत यांचा आरोपींमध्ये समावेश
 

Sangli Jat Protest FIR Against Ex MLAs: सांगलीच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सांगलीच्या जत शहरातील महाराणा प्रताप चौकात सर्व पक्षीयांकडून आंदोलन करण्यात आले होते. जत तालुक्याचे नामांतर आणि नियमित पाणीपुरवठ्यासाठी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते. पण या आंदोलनावेळी सरकारच्या विरोधात भाषणे केल्याप्रकरणी दोन माजी आमदार, दोन जिल्हा बँक संचालकांसह ४० जणांविरोधात जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे आणि मन्सूर खतीब यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि आंदोलकांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा भंग करून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखल्याचा आरोप संबंधित आंदोलकांवर करण्यात आला आहे.

FDAचा राज्यभर दणका! ११.८२ लाखांचं संशयास्पद खाद्यतेल जप्त; मुंबईतील ४ हॉटेल्सचे परवाने निलंबित

कोणत्या कलमांनुसार कारवाई?

या प्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार श्रीशैल बिसलाप्पा वळसंग यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.पोलिसांच्या फिर्यादीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन करत आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अडवली. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम २२१, १८९(२), महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील कलम १३५(३) तसेच राष्ट्रीय महामार्ग कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे.

सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश

या कारवाईत माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब आणि माजी सभापती तम्मणगौडा रवीपाटील यांच्यासह इतर पक्षांतील नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

BJP Leader Murli Manohar Joshi: देश नक्की चाललाय कुठे? पेपर लीक, बेरोजगारीवरून मुरली मनोहर जोशींचा केंद्राला घरचा आहेर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आप्पाराया बिरदार, माजी सभापती सुजय ऊर्फ नाना शिंदे, पंचायत समिती सदस्य प्रमोद सावंत, शिवसेनेचे अमित ऊर्फ बंटी दुधाळ, नगरसेवक संतोष कोळी, माजी नगरसेवक नीलेश बामणे, युवराज निकम, रवींद्र सावंत, अजिंक्य सावंत, राहुल बाबर, महादेव पाटील, ईरण्णा निडोणी, परशुराम सांगोलकर, प्रकाश माने, बाबासाहेब कोडग, विवेक कोकरे, महांतेश पाटील आणि रासप नेते अजित पाटील यांच्यासह अन्य आंदोलकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रास्ता रोको आंदोलनादरम्यान वाहतूक रोखणे आणि सरकारविरोधात भाषणे केल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जत पोलिसांकडून सुरू आहे.

 

 

 

Web Title: Fir registered against 40 people including two ex mlas in jat sangli protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • crime news
  • Jat
  • Maharashtra Politics
  • Sangli

संबंधित बातम्या

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ डॉक्टर महिलेची फसवणूक; APK फाईल पाठवली अन्…
1

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ डॉक्टर महिलेची फसवणूक; APK फाईल पाठवली अन्…

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?
2

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात
3

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!
4

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.