Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज ठाकरे झीरोंचे हिरो, ठाकरे आणि ओवैसी एकाच विचाराचे औलादी; गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधून राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली त्याचबरोबर राज ठाकरेंनी मर्यादांचे उल्लंघन करू नये असा इशारा देखील दिला.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 12, 2026 | 06:17 PM
Gunaratna Sadavarte targets Raj Thackeray Uddhav Thackeray BMC elections 2026

Gunaratna Sadavarte targets Raj Thackeray Uddhav Thackeray BMC elections 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • गुणरत्न सदावर्ते यांची ठाकरे बंधूंवर टीका
  • मुंबईचा महापौर भाजपचा होण्याचा व्यक्त केला विश्वास
  • निवडणुका आल्या की हे दोन बेंडकुळे आवाज करत असल्याची टीका
Gunaratna Sadavarte on Thackeray : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Maharashtra Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे. मुंबई आणि पुण्यासह 29 पालिकांच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 तारखेला निकाल हाती येणार आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती (Thackeray brothers alliance) झाली आहे. ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर एकत्रित सभा देखील पार पडली. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. शिवतीर्थावरील या सभेमध्ये ठाकरे बंधूंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधून राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली त्याचबरोबर राज ठाकरेंनी मर्यादांचे उल्लंघन करू नये असा इशारा देखील दिला. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “महाराष्ट्र डिस्टर्ब करण्याच्या दृष्टीने काही वक्तव्य करत आहेत. अशी भाषण करणारी दोघेजण म्हणजे राज ठाकरे आणि असदुद्दीन ओवैसी. हे दोघे एकाच विचाराचे औलादी आहेत का ? या दोघांमध्ये साम्य आहे. ते साम्य म्हणजे हे दोघे अशा प्रकारे बाहेर येतात जसे जून महिना पावसाळ्याचा असतो आणि पावसाळ्यामध्ये शेतकरी यांना आवाज येत असतो तो बेंडकुळेचा असतो. निवडणुका आल्या की हे दोन बेंडकुळे आवाज करतात,” अशा शब्दांत गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

हे देखील वाचा : अजित पवारांनी ओवैसींना झापले! हिजाबच्या राजकारणावरून ओवैसींवर निशाणा, म्हणाले – “फालतू विधानांपेक्षा…..”

पुढे गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “गौतमी पाटील यांच्या नृत्यावर सुद्धा लोक शिट्या वाजवतात आणि आनंद व्यक्त करतात. माज शब्द वापरणारे लोक चालतात का ही लोकतंत्र मधली भाषा आहे का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नय्या डुबती आहे. मुंबईतील अनेक मोठे व्यवसाय दूर जात आहेत आणि याचे कारण ही लोक आहेत. उद्योजकांनी उद्योग वाढवले तर राज ठाकरेंच्या घरी परवानगीला पाठवायचे का? राज ठाकरेंना मर्यादा आहे त्यांनी त्याचे उल्लंघन करू नये. अदानीसोबत तुम्ही कौटुंबिक फोटो काढता तेव्हा चालतं. यांची भाषण आणि सभा या केवळ एन्टरटेन्मेंटसाठी सुरू आहेत. एकतरी उमेदवार निवडून येतील असा अंदाज आहे का?” असा खोचक सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला.

महापौर हा हिंदू आणि भारतीय जनता पार्टीचा होणार – सदावर्ते

पुढे ते म्हणाले की, “ठाकरे बंधूंचा सुफडासाफ झाला आहे. मुंबईच्या बाहेर सभा घेण्यासाठी जात नाहीत. राज ठाकरेंचे समर्थन करणारे काल किती डेसिमल होता स्पीकर हे प्रदूषणाचा भाग नाही ? खासदार अन्नामलाई यांच्या बाबत वक्तव्य केले ते शहराला कलंकित भाषा आहे. तुम्ही जर उत्तरं दिलं नाही तर कायदेशीर उत्तर घेऊ. अण्णा ये मुंबई है तुम्हाला तुमचे म्हणणे मांडण्यापासून कोणी रोकू शकणार नाही राज ठाकरे पण रोखू शकत नाहीत. उत्तर भारतीय महापौर बनवण्यापासून राज ठाकरे रोखू शकत नाही. महापौर हा हिंदू आणि भारतीय जनता पार्टीचा होणार,” असा विश्वास सुद्धा गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला आहे आणि राज ठाकरेंना डिवचलं आहे.

हे देखील वाचा : “हिंमत असल्यास हात-पाय तोडून…”; के. अण्णामलई यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

“नालायक भाषा राज ठाकरेंनी आता थांबवावी. सोशल मीडिया पाहणाऱ्या सायबर सेलला आव्हान करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दोन भाषेमध्ये प्रांतीय वाद निर्माण करणे असे वर्तन आहे, त्यामुळे त्यांच्यावर याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. राज ठाकरे खासदार होऊ शकत नाही, तुम्हाला किती वोट मिळू शकतात? ही निवडणूक म्हणजे त्यांचा शेवटीचा राजकीय श्वास आहे आम्ही त्यांची निंदा करत आहोत,” असा टोला देखील गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला.

ओवैसी याने नथुराम गोडसे यांच्या विचारांची माफी मागितली पाहिजे

गुणरत्न सदावर्ते यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्यांवर देखील निशाणा साधला आहे. पुढे ते म्हणाले की, “आज या देशामध्ये मुगल शासन नाही आहे. या देशाला अखंड भारताचे मार्गदर्शन असलेले पंडित नथुराम गोडसे यांच्या बाबत खालच्या स्तराची टीका केली. छोटा मोठा अँक्टर आहे तो कधीतरी बाहेर पडणारा. या देशामध्ये कोणतेही इस्लामिक राज्यांचे राज्य नाही संविधानिक राज्य आहे. ओवैसी याने नथुराम गोडसे यांच्या विचारांची माफी मागितली पाहिजे . देशाच्या प्रत्येक भागावर प्रत्येकाचा अधिकार आहे. राज ठाकरे यांचे कार्य झीरो आहे आणि ते झीरोचे हिरो आहेत. माझ्या बोलण्याचे परिणाम १०० टक्के होतात,” असे देखील गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.

Web Title: Gunaratna sadavarte targets raj thackeray uddhav thackeray bmc elections 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “हिंमत असल्यास हात-पाय तोडून…”; के. अण्णामलई यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
1

Maharashtra Politics: “हिंमत असल्यास हात-पाय तोडून…”; के. अण्णामलई यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

Shivsena News : महाराष्ट्राचे धुरंदर विरुद्ध ‘दलिंदर आणि बिलंदर’ जोडी’, ज्योती वाघमारे यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात
2

Shivsena News : महाराष्ट्राचे धुरंदर विरुद्ध ‘दलिंदर आणि बिलंदर’ जोडी’, ज्योती वाघमारे यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात

‘आम्ही तुम्हाला एक लाख रुपये देतो, फक्त असे भाषण दाखवा’;   Uddhav Thackerayचे फडणवीसांना खुले आव्हान
3

‘आम्ही तुम्हाला एक लाख रुपये देतो, फक्त असे भाषण दाखवा’; Uddhav Thackerayचे फडणवीसांना खुले आव्हान

Raj Thackeray News: राज ठाकरेंनी तो व्हिडीओ सुरू करताच एकच शांतता…; शिवाजी पार्कच्या सभेत नेमकं काय झालं?
4

Raj Thackeray News: राज ठाकरेंनी तो व्हिडीओ सुरू करताच एकच शांतता…; शिवाजी पार्कच्या सभेत नेमकं काय झालं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.