Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेना आणि बंडखोरीचा इतिहास! भुजबळांपासून सुरु झालेलं सत्र शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’पर्यंत कसं पोहोचलं? वाचा सविस्तर

बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून एकनाथ शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'पर्यंत शिवसेनेत तब्बल ५ वेळा मोठी बंडखोरी झाली आहे. भुजबळ, राणे, राज ठाकरे आणि शिंदे यांच्या बंडाचा संपूर्ण इतिहास वाचा एका क्लिकवर.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 18, 2026 | 05:58 PM
शिवसेना आणि बंडखोरीचा इतिहास! (Photo Credit- AI)

शिवसेना आणि बंडखोरीचा इतिहास! (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:
  • शिवसेना आणि बंडखोरीचा इतिहास!
  • भुजबळांपासून सुरु झालेलं सत्र शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’पर्यंत कसं पोहोचलं?
  • वाचा सविस्तर
मुंबई: महाराष्ट्रातील राजकारण सध्या कोणत्या टोकाला जाईल, याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. सर्वसामान्य जनतेने आपल्या हक्काचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कधी पक्षांतर करतील आणि नवीन वाट पकडतील, याचा नेम उरलेला नाही. नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) राबवून शिवसेना (UBT) पक्षाचे ६ लोकसभा खासदार फोडल्याचा दावा केला आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप आला आहे.

शिवसेना आणि बंडखोरीचा इतिहास

परंतु, शिवसेनाविरुद्ध बंडखोरी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९६६ मध्ये स्थापन केलेल्या या पक्षाने आपल्या ५० हून अधिक वर्षांच्या इतिहासात अनेक चढ-उतार, यश-अपयश आणि मोठ्या फुटींचा सामना केला आहे. भुजबळांपासून सुरू झालेले बंडखोरीचे हे सत्र आजच्या ‘ऑपरेशन टायगर’पर्यंत कसे पोहोचले, याचा संपूर्ण इतिहास खालीलप्रमाणे आहे:

१. पहिले बंड (१९९१): छगन भुजबळ यांचे ओबीसी आरक्षणावरून बंड

शिवसेना पक्षातील पहिली मोठी फूट ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली पडली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पक्षाच्या भूमिकेशी असमाधानी असल्याने भुजबळ यांनी थेट बाळासाहेबांच्या निर्णयाला आव्हान दिले. त्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान १८ आमदारांसह बंड पुकारले, ज्यापैकी ६ आमदार शेवटी त्यांच्यासोबत राहिले. भुजबळांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुढे १९९९ मध्ये, जेव्हा शरद पवार यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ (NCP) स्थापन केला, तेव्हा भुजबळ त्यांच्यासोबत गेले.

२. दुसरे बंड (२००५): नारायण राणे यांनी सोडली शिवसेना

कोकणचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षांतर्गत उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या प्रभावाला आणि नेतृत्वाला उघड आव्हान दिले. यानंतर जुलै २००५ मध्ये त्यांनी शिवसेना सोडली. राणे यांच्यासोबत शिवसेनेच्या १२ हून अधिक आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला. या दुसऱ्या मोठ्या बंडानंतर नारायण राणे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

‘संजय राऊत शिवीगाळ करत असतील तर…’ राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून किरेन रिजिजूंची मोठी प्रतिक्रिया

३. तिसरे बंड (२००६): राज ठाकरे यांनी स्थापन केला ‘मनसे’

शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात भावनिक आणि राजकीयदृष्ट्या गाजलेले तिसरे बंड स्वतः बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. उद्धव ठाकरे यांच्या उदयामुळे आपल्याला आणि जुन्या नेत्यांना बाजूला सारले जात असल्याचा आरोप करत त्यांनी २७ नोव्हेंबर २००५ रोजी शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर, ९ मार्च २००६ रोजी त्यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (MNS) या आपल्या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.

४. चौथे बंड (२०२२): एकनाथ शिंदे यांचे सर्वात मोठे बंड आणि सत्तापालट

शिवसेनेच्या इतिहासातील चौथी आणि सर्वात विध्वंसक फूट जून २०२२ मध्ये पडली. महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले. शिंदे आपल्यासोबत तब्बल ४० आमदार आणि १२ खासदारांना घेऊन आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एवढेच नव्हे, तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ‘शिवसेना’ हे मूळ नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह देखील कायदेशीररित्या मिळवले. अर्थात, या प्रकरणाशी संबंधित कायदेशीर लढाई अजूनही सुरू आहे.

५. पाचवे बंड (२०२६): ‘ऑपरेशन टायगर’ आणि ६ खासदारांची गळती

२०२२ च्या महाबंडानंतर उद्धव ठाकरे गटाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमन करत महाराष्ट्रात ९ खासदार निवडून आणले होते. मात्र, दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठ्या खिंडाराचा सामना करावा लागत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरे गटाचे ९ पैकी तब्बल ६ खासदार पुन्हा एकदा बंडखोरी करून शिंदे गटात (मूळ शिवसेनेत) प्रवेश करत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ‘धनुष्यबाण’ आणि लोकप्रतिनिधींची पळवापळवी हा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला आहे.

Operation Tiger : उज्ज्वल निकम यांचे मोठे भाष्य; ठाकरे गटातील 6 खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

Web Title: History of shiv sena splits and rebellions from chhagan bhujbal to eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • shivsena
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

Shivsena Opration Tiger : 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? ‘…म्हणून शिवसेना सोडली’, समोर आलं धक्कादायक कारण
1

Shivsena Opration Tiger : 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? ‘…म्हणून शिवसेना सोडली’, समोर आलं धक्कादायक कारण

Satara Politics: ठाकरे गटाला साताऱ्यात खिंडार? २० ते २५ नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर; शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
2

Satara Politics: ठाकरे गटाला साताऱ्यात खिंडार? २० ते २५ नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर; शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

व्हीप म्हणजे नेमके काय? कधी लागू होतो आणि त्याचे उल्लंघन केल्यास काय होते? जाणून घ्या नियम
3

व्हीप म्हणजे नेमके काय? कधी लागू होतो आणि त्याचे उल्लंघन केल्यास काय होते? जाणून घ्या नियम

Operation Tiger: अरे देवा! मुंबई पालिकेत पण ऑपरेशन टायगर २.०? ३५ नगरसेवक संपर्कात; किरण लांडे यांचा दावा
4

Operation Tiger: अरे देवा! मुंबई पालिकेत पण ऑपरेशन टायगर २.०? ३५ नगरसेवक संपर्कात; किरण लांडे यांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.