Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajya Sabha Election : पक्षांतर्गत कलहामुळे काँग्रेसचे समीकरण बिघडलं; आता प्रतिष्ठेची बनली लढाई

विजयपूरच्या आमदाराने मतदानावर घेतलेली बंदी आणि ज्येष्ठ नेत्यांची तटस्थता या पार्श्वभूमीवर, भाजप आता तिसऱ्या जागेवर मुसंडी मारण्याची तयारी करत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 22, 2026 | 02:12 PM
Rajya Sabha Election : पक्षांतर्गत कलहामुळे काँग्रेसचे समीकरण बिघडलं; आता प्रतिष्ठेची बनली लढाई

Rajya Sabha Election : पक्षांतर्गत कलहामुळे काँग्रेसचे समीकरण बिघडलं; आता प्रतिष्ठेची बनली लढाई

Follow Us
Follow Us:

भोपाळ : मध्य प्रदेशात एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह आणि कायदेशीर अडथळ्यांमुळे समीकरण बिघडले आहे. विजयपूरच्या आमदाराने मतदानावर घेतलेली बंदी आणि ज्येष्ठ नेत्यांची तटस्थता या पार्श्वभूमीवर, भाजप आता तिसऱ्या जागेवर मुसंडी मारण्याची तयारी करत आहे. विधानसभेच्या 230 जागा असलेल्या या राज्यात तीन जागांसाठीची लढाई केवळ संख्याबळाचा खेळ न राहता प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.

विजयपूरचे आमदार मुकेश मल्होत्रा यांना त्यांच्या अपात्रतेच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे, परंतु त्यांच्या मतदानापासून दूर राहण्याच्या भूमिकेमुळे काँग्रेसच्या गोटात निराशेचे सावट पसरले आहे. काँग्रेसची समस्या केवळ संख्याबळाची नाही, तर त्यांच्याच आमदारांच्या बदलत्या मानसिकतेची आहे. विरोधी पक्षनेते हेमंत कटारे यांचा राजीनामा कौटुंबिक कारणांमुळे दिला गेला असेल, पण पक्षांतर्गत चर्चा वेगळीच आहे.

भाजपचा मार्ग अधिक सोपा

अलीकडच्या वर्षांत, हरियाणा, बिहार आणि ओडिशा येथील राज्यसभा निवडणुकांनी हे दाखवून दिले आहे की, ऐनवेळी झालेले पक्षांतर कसे बाजी पलटवू शकते. मध्य प्रदेशातील भारत आदिवासी पक्षाचे एकमेव आमदार कमलेशवर डोडियार यांनीही आपला उमेदवार उभा करण्याचे संकेत दिले असून, ही लढत तिरंगी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जर काँग्रेसचे ५-६ आमदार पक्षांतर करतील, तर भाजपचा तिसऱ्या जागेपर्यंतचा मार्ग अधिक सोपा होईल.

एका जागेसाठी 58 मतांची गरज

मध्य प्रदेशात राज्यसभेच्या एका जागेसाठी 58 मतांची आवश्यकता आहे. भाजपचे 160 हून अधिक आमदार असल्याने दोन जागांवर त्यांचा विजय निश्चित आहे. तिसऱ्या जागेवर आव्हान आहे. काँग्रेसकडे अधिकृतपणे ६५ आमदार होते, पण आता ही संख्या प्रभावीपणे ६३ वर आली आहे. बिना मतदारसंघाच्या आमदार निर्मला सापरे यांच्यावर पक्षांतराचा धोका आहे, तर मुकेश मल्होत्रा मतदान करू शकणार नाहीत.

अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम बापू आहे. आसाराम बापू, राम रहिम यांनी जे केले तेच या अशोक खरातने केले असून, ५८ व्हिडिओ नाही तर सखोल चौकशी केली तर शेकडो व्हिडिओ उघड होतील. महिलांचे शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाला कठोर शिक्षा तर झाली पाहिजे, अशी मागणी करून आजपर्यंतचे त्याचे कारनामे पाहता त्याला कोणाचा तरी राजकीय आशीर्वाद असला पाहिजे, त्याच्यामागे ही कोणती राजकीय शक्ती आहे, ते महाराष्ट्राच्या जनतेला समजले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा : हर्षवर्धन सपकाळांनी घेतली इराणचे कॅान्सुल जनरल मोतलाघ यांची भेट; ‘या’ मुद्द्यावर झाली चर्चा

Web Title: Internal strife has disrupted the congress party equations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • Congress Politics
  • political news
  • Rajya Sabha Elections 2026

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.