Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest: जंतर-मंतरवरील आंदोलनात कार्यकर्त्यावर लोखंडी रॉडने हल्ला; CJPचा गंभीर आरोप

CJP Protest: नीट-यूजी परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि अनियमिततेच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. ही मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आंदोलनाच्या आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 25, 2026 | 06:30 PM
Jantar Mantar Protest, Cockroach Janata Party, Abhijit Dipke, Saurabh Das,

Jantar Mantar Protest, Cockroach Janata Party, Abhijit Dipke, Saurabh Das,

Follow Us
Follow Us:
  • आंदोलनाला जाणीवपूर्वक लक्ष्य करून कार्यकर्त्यांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी हा पूर्वनियोजित हल्ला
  • सोशल मीडियावर जखमी कार्यकर्त्याच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला
  • सीजेपीच्या माहितीनुसार, या हल्ल्यात १५ जण सामील असताना पोलिसांनी केवळ एकाच व्यक्तीला अटक केली आहे
 

CJP Protest News: दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पक्षाने (CJP) त्यांच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यात संबंधित कार्यकर्ता गंभीर जखमी झाल्याचे पक्षाने म्हटले आहे. आंदोलनाला लक्ष्य करून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी केला आहे. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी दिल्ली पोलिसांकडे केली आहे.

सीजेपीच्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली असली तरी हल्ल्यात अंदाजे १५ जण सहभागी होते. मात्र, उर्वरित आरोपींवर अद्याप कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

‘गद्दारांना गद्दारचं म्हणणार, पत्रकारांना धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा’; संजय दिना पाटील प्रकरणावरून संजय राऊतांचा संताप

दरम्यान, या घटनेनंतर जखमी व्यक्तीच्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तिने काही गंभीर आरोप केले आहेत. काही लोकांनी तिला रस्त्यावर घेरले होते. त्यावेळी तिच्या वडिलांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याचा दावा तिने केला आहे.

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच हत्येचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी केली आहे. हल्ला आणि सोशल मीडियावरील धमक्यांबाबत दिल्ली पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

आंदोलनाला लक्ष्य करून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न

सौरभ दास म्हणाले की, हल्लेखोरांनी शांततापूर्ण आंदोलनाला लक्ष्य करून आंदोलकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वैद्यकीय अहवालात जखमी व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी ही दुखापत किरकोळ असल्याचे सांगितल्याचा आरोप त्यांनी केला.

Aditya Thackeray: पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांवर आदित्य ठाकरे कडाडले; म्हणाले, ‘हिंमत असे

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींची ओळख पटवून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. एका व्यक्तीला अटक करण्यात आली असली तरी हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींना अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, नीट-यूजी परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि अनियमिततेच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. ही मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आंदोलनाच्या आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

 

Web Title: Jantar mantar protest attack cockroach janata party activist injured abhijit dipke saurabh das

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 06:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.