
कर्जत तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आढावा बैठक तालुका प्रमुख बाजीराव दळवी यांच्या माध्यमातून शिवालय येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत,तालुका संघटक माधव कोळंबे,शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन ओसवाल,कर्जत पंचायत समिती उप सभापती चित्रा ठाकरे, कर्जत उप नगराध्यक्ष संतोष पाटील,महिला आघाडी तालुका संघटक करुणा बडेकर,उप तालुका प्रमुख दशरथ भगत,माथेरान शहर प्रमुख कुलदीप जाधव,कर्जत शहर प्रमुख निलेश घरत,नेरळ शहर प्रमुख बंडू क्षीरसागर,युवा सेना ॲड संपत हडप,प्रथमेश मोरे तालुका सचिव रामदास घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद,पंचायत समितीवर निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. त्यात जिल्हा परिषदेचे गटनेते बाबू घारे,सदस्या सुनीता मोरे,कर्जत पंचायत समिती सदस्य कविता शिंगवा,सुषमा पवाळी,नमिता श्रीखंडे आदी तसेच माथेरान पालिकेचे नगरसेवक सचिन दाभेकर,कर्जत नगरपरिषद नगरसेवक प्रशांत पाटील,नगरसेविका सुचेता खोत, मानसी कानिटकर,आदींचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला तालुका प्रमुख बाजीराव दळवी यांनी तालुक्यातील पदाधिकारी यांची आजची स्थिती यांची यादी वाचून दाखवली. त्यानंतर रिक्त पदे तत्काळ भरण्याची कार्यवाही सुरू आहे यावेळी स्वतःहून पुढे यावे तसेच ज्या पदाधिकारी यांना पदावर राहायचे नाही त्यांनी पक्षाला सूचना करावी असे सेनाभवन कडून सूचित करण्यात आल्याची माहिती दिली.तालुक्यात येत असलेल्या विनाशकारी प्रकल्प याविरुद्ध रस्त्यावर उतरावे लागणार आहे आणि त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचे काम केले जाईल असा निर्धार व्यक्त केला.
उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी यावेळी बोलताना नगरपरिषद आणि जिल्हा परिषदमध्ये आपण परिवर्तन आघाडी बनवली,त्यावेळी माझ्यावर टीका झाली पण आपला सैनिक ढळू नये आणि आपले कार्यकर्ते जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य झाले पाहिजेत यासाठी हा निर्णय घेतला. त्याचे चांगले परिणाम या ठिकाणी दिसून आले असून आपण सत्तेत नंबर एक वर पोहचलो आहोत असे जाहीरपणे सांगितले. बाबू घारे यांनी यावेळी बोलताना कार्यकर्त्यांना सक्षम करण्याबरोबर आपल्याला पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर राहिला पाहिजे.
आम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून दर तीन महिन्यांनी घेणार आहोत,ज्यातून गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून अशी बैठक व्हावी असा प्रयत्न करावा.आमच्याकडे येणारा निधी जिल्हा परिषद गटाच्या बाहेर देखील करणार आहोत असे जाहीर केले. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आघाडी नंतर होईल पण आपली तयारी असली पाहिजे आणि बीड पासून खांडस पर्यंत भगवा झेंडा फडकला पाहिजे यासाठी कामाला लागण्याचे आवाहन केले. तर ज्यांनी आपला पक्ष फोडला त्यांचा बॅनर आपल्या कार्यालयापुढे लागला जातो ही लाजीरवाणी बाब आहे आणि त्यांना धडा शिकवायच आहे असे स्पष्ट मत बाबू घारे यांनी मांडले. तालुका संघटक माधव कोळंबे यांनी आपल्या माणसाला ताकद द्या अशी सूचना केली.
यावेळी विभागप्रमुख बीड संदीप रुठे,विभाग संघटक रमेश भुसाळ,माजी सरपंच प्रमिला बोराडे, युवा कार्यकर्ते कुमार बासरे,शाखा प्रमुख संजय तरे,नेरळ शहर प्रमुख बंडू क्षीरसागर, वेणगावचे वैभव पेठे,जगदीश ठाकरे यांनी आपली मनोगते मांडली.यावेळी कर्जत पंचायत समिती माजी उप सभापती पंढरीनाथ राऊत,सुधाकर देसाई, माजी शहर प्रमुख रोहिदास मोरे,जगदीश ठाकरे,सरपंच थोरवे, माजी सरपंच प्रमिला बोराडे,विभाग प्रमुख सुरेश बोराडे,सारिका मानकामे,अजय शिंगटे,म्हसे,चिंधू बाबरे,आदी सह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.