Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra politics : भाजपची ‘सेफ गेम’ रणनीती; सदस्य सहलीवर, सत्ता समीकरणांवर सस्पेन्स कायम

महाविकास आघाडीनंतर आता भाजपनेही आपले सदस्य सहलीच्या नावाखाली एकत्रित केल्याने सत्तासमीकरणांवर नवा सस्पेन्स निर्माण झाला आहे. सदस्य फुटू नयेत आणि संभाव्य राजकीय घडामोडींना आळा घालण्यासाठीच ही रणनीती असल्याची चर्चा रंगली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 17, 2026 | 12:15 PM
भाजपची ‘सेफ गेम’ रणनीती; सदस्य सहलीवर, सत्ता समीकरणांवर सस्पेन्स कायम

भाजपची ‘सेफ गेम’ रणनीती; सदस्य सहलीवर, सत्ता समीकरणांवर सस्पेन्स कायम

Follow Us
Close
Follow Us:
  • महाविकास आघाडीच्या हालचालींना प्रत्युत्तर
  • कोल्हापुरात १८ सदस्यांची ‘बंदोबस्तात’ बैठक
  • सत्ता समीकरणांवर सस्पेन्स कायम
सांगली : जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाविकास आघाडीनंतर आता भाजपनेही आपले सदस्य सहलीच्या नावाखाली एकत्रित केल्याने सत्तासमीकरणांवर नवा सस्पेन्स निर्माण झाला आहे. अपुऱ्या संख्याबळातही भाजपने ‘सेफ गेम’ खेळत सदस्यांवर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे चित्र आहे.

भाजपचे १६, जनसुराज्य आणि रयत क्रांती पक्षाचा प्रत्येकी एक असे एकूण १८ सदस्य सोमवारी कोल्हापुरात एकत्रित दाखल झाले. सुरुवातीला ‘एकत्रित जेवण’ असा संदेश देण्यात आला; मात्र नंतर दोन दिवस एकत्रित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सदस्य फुटू नयेत आणि संभाव्य राजकीय घडामोडींना आळा घालण्यासाठीच ही रणनीती असल्याची चर्चा रंगली आहे.

Black Box सुरक्षित असतानाही जळाल्याचं का सांगितलं? रोहित पवारांचा संताप अनावर

दरम्यान, महाविकास आघाडीनेही आपले सदस्य यापूर्वीच अज्ञातस्थळी हलवून ‘सुरक्षितता कवच’ तयार केले आहे. जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेचा पेच अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. ६१ सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी ३१ आकड्याची गरज असताना महाविकास आघाडी ३० सदस्यांवर थांबली आहे, तर भाजप व मित्रपक्ष मिळून १८ सदस्यांपर्यंत मर्यादित आहेत.

अजित पवार गटासोबत महाविकास आघाडीने केलेल्या समझोत्यामुळे सत्तेची समीकरणे अधिकच रंगतदार झाली आहेत. अध्यक्षपदाच्या वाटपावरून सुरू असलेल्या चर्चेनंतर आता पहिल्या टप्प्यात अध्यक्षपद शरद पवार गटाला, तर सव्वा वर्षानंतर अजित पवार गटाला देण्याचा फॉर्म्युला पुढे आला आहे. यासंदर्भात मंगळवारी निर्णायक बैठक होणार आहे. बुधवारी (१८ मार्च 2026) अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक होत असताना, दोन्ही बाजूंनी जोरदार ‘मॅनेजमेंट’ सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. सदस्यांची सहल, बंदोबस्त आणि गुप्त बैठका यामुळे सांगली जिल्हा परिषदेची सत्ता आता पूर्णपणे ‘थ्रिलर’ टप्प्यात पोहोचली आहे.

शिवसेनेत मतभेद; दोन सदस्य आघाडीच्या बाजूला, पाच तटस्थ?

जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट)चे सात सदस्य असून, त्यांच्यातही मतभेद स्पष्ट झाले आहेत. आमदार सुहास बाबर व तानाजी पाटील यांनी भाजपला पाठिंबा देण्याबाबत नकारात्मक भूमिका घेतली आहे. निवडणुकीदरम्यान भाजपकडून झालेल्या वागणुकीचा मुद्दा ते उपस्थित करत आहेत. दरम्यान, सेनेचे दोन सदस्य महाविकास आघाडीच्या गोटात दाखल झाले असून, ते सहलीतही सहभागी झाल्याची माहिती आहे. उर्वरित पाच सदस्य मतदानावेळी तटस्थ राहण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने अंतिम निकालात त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यावर प्रश्नचिन्ह; भाजपमध्येच पवारविरोधी गट ‘अ‍ॅक्टिव्ह’

Web Title: Maha vikas aghadi now the bjp too has brought its members together under the pretext of an excursion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • shivsena

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

धक्कादायक! ठेकेदाराकडून मुख्यमंत्र्यांच्या नावे धमक्या, स्थायी सदस्यांकडून आरोप; आयुक्तांनाही जुमानत नसल्याची तक्रार
2

धक्कादायक! ठेकेदाराकडून मुख्यमंत्र्यांच्या नावे धमक्या, स्थायी सदस्यांकडून आरोप; आयुक्तांनाही जुमानत नसल्याची तक्रार

Maharashtra Politics: “शेतमजुराच्या मुलाला ZP अध्यक्ष…”; सोलापूरमध्ये जयकुमार गोरेंचे मोठे विधान
3

Maharashtra Politics: “शेतमजुराच्या मुलाला ZP अध्यक्ष…”; सोलापूरमध्ये जयकुमार गोरेंचे मोठे विधान

Jogeshawari SRA News: जोगेश्वरीतील ‘एसआरए’ प्रकल्पाची १५ दिवसांत चौकशी; मंत्री शंभूराज देसाईंचे आदेश
4

Jogeshawari SRA News: जोगेश्वरीतील ‘एसआरए’ प्रकल्पाची १५ दिवसांत चौकशी; मंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.