
Maharashtra Breaking News Updates Today:
वॉशिंग्टन : सध्या इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून वारंवार हल्ले केले जात आहेत. त्यातच बुधवारी अमेरिकेच्या राष्ट्रीय कर्जाने 39 ट्रिलियन डॉलर्सचा विक्रमी टप्पा ओलांडला. इराणसोबत अमेरिका-इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांतच हा कर्जाचा बोजा पडत आहे.
गव्हर्नमेंट अकाउंटेबिलिटी ऑफिसने (Government Accountability Office) वाढत्या सरकारी कर्जाचे अमेरिकन नागरिकांवर होणारे परिणाम स्पष्ट केले आहेत. यामध्ये गृहकर्ज आणि गाड्यांसारख्या वस्तूंसाठी कर्ज घेण्याचा वाढलेला खर्च, व्यवसायांकडे गुंतवणुकीसाठी कमी पैसा उपलब्ध असल्याने कमी वेतन, आणि वस्तू व सेवांच्या वाढलेल्या किमती यांचा समावेश आहे. अधिक कर्ज घेण्याचा आणि व्याज भरण्याचा दीर्घकालीन कल भविष्यात अमेरिकन नागरिकांना अधिक कठीण आर्थिक जबाबदाऱ्यांचा सामना करण्यास भाग पाडेल.
19 Mar 2026 06:48 PM (IST)
Arab Muslim Ministers Meeting : रियाध : मध्यपूर्वेतील तणाव आता एका भीषण वळणावर आला आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत प्रादेशिक अस्थिरता पसरली असून अरब देशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया (Saudi Arabia) ची राजधानी रियाध येथे १२ मुस्लिम देशांनी एक महाबैठक पार पडली आहे. बुधवारी (१९ मार्च २०२६) एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर इराणला गंभीर इशारा देण्यात आला आहे. या बैठकीत १२ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणच्या वाढत्या आक्रमक हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे.
19 Mar 2026 06:45 PM (IST)
पलूस येथील पं. विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे संचालक संजय प्रभाकर परांजपे (वय ६०, रा. मारुती मंदिराजवळ, पलूस) यांचा अज्ञातांनी निघृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. त्यांच्या स्वतःच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे पलूस शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू ठेवली होती.
19 Mar 2026 06:36 PM (IST)
Parali Politics: नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. नगरपालिका निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांनी आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा कट रचला होता, असा थेट आरोप मुंडे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
19 Mar 2026 06:25 PM (IST)
लंडन-मुख्यालय असलेली गुंतवणूक बँक एचएसबीसी (HSBC) येत्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याचा विचार करत आहे. एका अहवालानुसार, एचएसबीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॉर्जेस एलहादरी यांना बँकेचे कामकाज सुव्यवस्थित आणि वेगवान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर वाढवायचा आहे.
19 Mar 2026 06:14 PM (IST)
Jalgaon Farmers News: जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. गेल्या वर्षी नवरात्र, दसरा व दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात केळीला अत्यल्प दर मिळाला होता. यंदा रमजानच्या पार्श्वभूमीवर चांगल्या भावाची अपेक्षा असताना आंतरराष्ट्रीय परिस्थिती व निर्यात अडथळ्यांमुळे पुन्हा भाव कोसळले आहेत. परिणामी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.
19 Mar 2026 06:07 PM (IST)
Rupali Patil Thombre on Ashok kharat Case: नाशिक मधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी कॅप्टन अशोक खरात याला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अभय होते का? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, त्या पदावर राहिल्या तर त्या पुरावेही नष्ट करू शकतात, असा आरोप करीत, ‘जनाची नाही तर मनाची लाज असेल तर, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा’ अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
19 Mar 2026 05:55 PM (IST)
गुढीपाडव्याचे औचित्य साधून अहिल्यानगर येथील निवृत्त बँक कर्मचारी शिवाजी नाईकवाडी गेल्या १२ वर्षांपासून 'ज्ञानाची गुढी' उभारून आगळावेगळा उपक्रम राबवत आहेत. नव्या पिढीला वाचनाची गोडी लागावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे...विशेष म्हणजे या गुढीचे पूजन नेहमी महिलांच्या हस्ते केले जाते. या परंपरेची सुरुवात त्यांनी स्वतःच्या आईच्या हस्ते गुढी उभारून केली होती. आतापर्यंत त्यांनी कमाल ११०० पुस्तकांची तब्बल साडेसात फूट उंचीची भव्य गुढी उभारली आहे. यंदाचीही गुढी सुमारे ५०० पुस्तकांच्या माध्यमातून उभारली आहे.ही अनोखी गुढी पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात आणि यानिमित्तानेअनेकजण नाईकवाडी यांना पुस्तके भेटही देत असतात. यामाध्यमातून सुमारे ३५०० हजाराहून अधिक पुस्तकांचा भंडार त्यांच्याकडे असल्याचे शिवाजी नाईकवाडी यांनी सांगितले आहे.
19 Mar 2026 05:50 PM (IST)
पत्रकार अमर म्हात्रे आणि त्याचा साथीदार मिल्टन घोन्साल्वीस यांनी वसई तहसील कार्यालयातील सेतु सुविधा केंद्रात भेट दिली.“तुम्ही नागरिकांकडून शासकीय फी व्यतिरिक्त जादा पैसे घेत आहात” असा आरोप करत, त्यांनी तहसील कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयात तक्रार करून तुमचे सेतु केंद्राचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करून टाकू, अशी धमकी दिली.या धमकीच्या आधारावर संबंधित फिर्यादीकडून तब्बल 5 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.
19 Mar 2026 05:45 PM (IST)
नवरात्राच्या पहिल्याच दिवशी हजारो श्रद्धाळूंनी मंदिरात हजेरी लावत देवीचे दर्शन घेतले. पहाटेपासूनच मंदिर परिसरात “जय माता दी”च्या घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले आहे. अनेक भाविक पायऱ्यांमार्गे डोंगर चढत मंदिरात पोहोचत आहेत, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांकडून रोपवे सुविधेचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.
19 Mar 2026 05:35 PM (IST)
मिरा रोड परिसरात चैत्र नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित चैत्र नवरात्रोत्सव २०२६ मोठ्या भक्तिभावात साजरा होत आहे. हा उत्सव १९ मार्च ते २८ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.संपूर्ण रस्त्यावर सुंदर आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तसेच सर्वात मोठा आकर्षण म्हणजे उत्सव ठिकाणी भव्य दिव्य असा दक्षिण भारतात असलेला मीनाक्षी मंदिराची आवृति हुबेहूब बनवण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे आणि ते लोकांचा आकर्षण केंद्र झाला आहे.
19 Mar 2026 05:30 PM (IST)
नालासोपाऱ्यातील ऐतिहासिक बौद्ध स्तूपाला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्यावर या पर्यटनस्थळाचा विकास होईल अशी अपेक्षा स्थानिकांना होती. पण या ठिकाणी अद्याप मूलभूत सुविधा देखील उपलब्ध झालेल्या नाहीत. या ऐतिहासिक स्थळाच्या देखभाल आणि संवर्धनाची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाने विकास आराखडा जाहीर करून याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
19 Mar 2026 05:20 PM (IST)
रत्नागिरीच्या खेड येथील लोटे परशुराम एमआयडीसीवर मोठे संकट कोसळले आहे. गॅस टंचाई आणि कच्च्या मालाअभावी अनेक उद्योगांचे उत्पादन ठप्प झाले आहे. सुमारे 40 टक्के कंपन्या बंदीच्या उंबरठ्यावर असून परिस्थिती गंभीर बनली आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ येत असून तातडीने उपाययोजनांची मागणी होत आहे.
19 Mar 2026 05:15 PM (IST)
उरणमध्ये हॉटेल व्यावसायिकांना गॅस तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. गॅस तुटवड्यामुळे काही हॉटेल बंद झाली आहेत तर काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. काही हॉटेल व्यावसायिकांनी गॅस तुटवड्यावर उपाय म्हणून चुलीचा वापर सुरु केला आहे. हॉटेलच्या किचनमध्ये आता चुली पेटल्या आहेत.
19 Mar 2026 05:10 PM (IST)
पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या नावावर करण्यात येत असलेल्या कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार तात्काळ थांबविण्यात यावा. या मागणीसाठी आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दारावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आला आहे. या आंदोलनात छत्रपती संभाजी महाराजांचे फलक आपल्या हातात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या जागेवर कोट्यावधी रुपये खर्चून छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच असा इस्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण स्मारक उभारण्यात आला आहे. मात्र याच स्मारकाच्या ठिकाणी स्थापत्य आणि विद्युत विषयक कामाच्या नावाखाली पुन्हा एकदा जवळपास 51 कोटी रुपयांची कामाला महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने मंजुरी दिली आहे.
19 Mar 2026 05:05 PM (IST)
पालघर जिल्ह्यातील डहाणू समुद्रकिनारी डहाणू फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातून स्थानिक खाद्यसंस्कृती, परंपरा आणि सामाजिक जीवन पर्यटकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आहे. यावर्षी कमी खर्चात अधिक स्टॉल्स उभारण्यात आले असून कोट्यवधींची उलाढाल अपेक्षित आहे. या फेस्टिवलमुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
19 Mar 2026 04:55 PM (IST)
मध्य-पूर्वेतील (us-israel iran war) वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा संकट निर्माण झाले असताना, भारतीय गृहखाते आणि पेट्रोलियम मंत्रालयाने देशातील गॅस पुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एलपीजी सिलेंडरचा तुटवडा भासणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या, मात्र सरकारने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
19 Mar 2026 04:46 PM (IST)
राज्य परिवहन महामंडळात कार्यरत वाहक आणि चालक यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. मात्र अनेक चालक आणि वाहक मद्य प्राशन करून कर्तव्यावर जातात. त्यामुळे बस चालविताना अपघात झाल्यास त्याचा विनाकारण त्रास प्रवाशांना होतो. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वीच अल्कोहोल तपासणी करण्याचे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी धाराशिव विभागात सुरू आहे. याची प्रत्येक आगारामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे सक्त आदेश विभागीय नियंत्रक अजय पाटील यांनी दिले आहेत.
19 Mar 2026 04:29 PM (IST)
इराणसोबत सुरू असलेले युद्ध आणि मध्य पूर्वेतील तणावामुळे, ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल ११० डॉलरच्या वर गेली आहे. अमेरिकन क्रूड (डब्ल्यूटीआय) तेलाची किंमत १०० डॉलरच्या आसपास राहिली आहे. मार्च २०२६ च्या ब्रेंट तेलाची किंमत ११३ डॉलरवरून ११६ डॉलरपर्यंत वाढली आहे, जी गेल्या काही आठवड्यांत ५०-६०% वाढ आहे. इराण-इस्रायल तणावामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक थांबली आहे, ज्यातून जगातील तेलाचा मोठा हिस्सा जातो. यामुळे पश्चिम आशियातून होणारी तेल निर्यात ६०% पेक्षा जास्त कमी झाली आहे. सध्या, दुपारी ३ वाजता, ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती ८% नी वाढून प्रति बॅरल ११७ डॉलरवर पोहोचल्या आहेत.
19 Mar 2026 04:27 PM (IST)
वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील कचरा आणि रेल्वे रुळांलगत उभारलेल्या अतिक्रमणांचे व्हिडिओ काही विदेशी पर्यटकांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या प्रश्नाची मोठी चर्चा सुरू झाली होती. या व्हिडिओंची दखल घेत पश्चिम रेल्वे प्रशासनाने तत्काळ पावले उचलत वांद्रे (पूर्व) येथील गरीब नगर परिसरात अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. या मोहिमेत रेल्वे हद्दीतील सुमारे 65 अनधिकृत झोपड्या आणि बांधकामे हटविण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (ता.17 मार्च) करण्यात आली. सांताक्रूझ येथील वरिष्ठ विभाग अभियंता (जमीन) कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. रेल्वेचा अभियांत्रिकी विभाग, रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली.
19 Mar 2026 03:50 PM (IST)
कणकवली: पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अखाती देशांमधून होणारा गॅस पुरवठा थांबल्यामुळे देशात गॅस टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. परिणामी व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल व्यवसायावर संक्रांत ओढवली आहे. या संकटातून सावरण्यासाठी हॉटल व्यावसायिकांनी इलेक्ट्रिक शेगडी व चुलीचा आधार घेतला आहे. मात्र, सिलिंडरअभावी हॉटेल व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे.
19 Mar 2026 03:40 PM (IST)
Iran Attack on Yanbu Port Saudi Arabia : मध्यपूर्वेतील युद्ध (US-Israel Iran War) आता केवळ दोन देशांपुरते मर्यादित राहिले नसून ते जागतिक ‘ऊर्जा युद्धा’त रूपांतरित झाले आहे. गुरुवारी इराणने लाल समुद्रातील अत्यंत महत्त्वाच्या ‘यान्बू’ बंदरावर हवाई हल्ला केला. हा हल्ला सौदी अरामको(Saudi Arabia) आणि अमेरिकेच्या एक्सॉनमोबिल कंपनीचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘सॅमरेफ’ (SAMREF) रिफायनरीवर करण्यात आला. इराणच्या गॅस प्लांटवर झालेल्या इस्रायली हल्ल्यानंतर इराणने आता आपला मोर्चा आखाती देशांतील तेल आणि गॅस सुविधांकडे वळवला आहे.
19 Mar 2026 03:20 PM (IST)
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लवकरच आई होणार आहे. लग्नाच्या १० वर्षांनंतर अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ती बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर होती आणि तिच्या गरोदरपणाच्या अफवा सतत पसरत होत्या. पण आता, हे जोडपे अखेर त्यांच्या घरी एका लहान पाहुण्याचे स्वागत करणार आहे. दिव्यांका आणि तिचा पती विवेक दहिया यांनी इन्स्टाग्रामवर आई- बाबा होणार असल्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. तसेच त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
19 Mar 2026 03:10 PM (IST)
आज गुढी पाडव्याचा खास सण. हा सण खास करून मराठी घरांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. घरात गुढी उभारून नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. हा दिवस म्हणजे मराठी लोकांसाठी नव्या वर्षीची सुरुवात. आता नवीन गोष्टीची सुरुवात करायची म्हणजे घरी गोडाधोडाच जेवण तर हवंच! भारतीय पारंपरिक गोड पदार्थांमध्ये गव्हाच्या पिठाचा हलवा हा एक अतिशय साधा, पण तितकाच स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ मानला जातो.
19 Mar 2026 03:03 PM (IST)
Chhatrapati Sambhajinagar Kidnapping Case: ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून एका शेतकऱ्याचे अपहरण करून त्याला चाकूने जखमी करत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना वळदगाव परिसरात उघडकीस आली आहे. आरोपींनी पीडिताला वाहनात जबरदस्तीने बसवून वेगवेगळ्या ठिकाणी नेत धमकावले आणि शेवटी फोन पेद्वारे 40 हजार रुपये उकळून बॉन्ड लिहून घेत धमकी देत सोडून दिले. ही घटना 15 मार्च रोजी रात्री 9.30 ते 10 वाजेच्या सुमारास वळदगाव परिसरात घडली. अचिन जयंत चव्हाण, सचिन जयंत चव्हाण (दोघे रा. भासुनाईक तांडा ता. अंबड जि. जालना) आणि त्याचे सहा साथीदार अशी अपहरण करुन खंडणी उकळणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
19 Mar 2026 02:50 PM (IST)
सिंधुदुर्गनगरी: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीची दखल घेत राज्य शासनाने ठोस भूमिका घेतली असून, शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीपूर्वीच नुकसानभरपाईची अधिकृत घोषणा केली जाईल, असे त्यांनी आढावा बैठकीत सांगितले. मुंबई येथील विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
19 Mar 2026 02:45 PM (IST)
मुंबई : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात बुधवारी गारपीटासह अवकाळी सरी बरसल्या. त्यामुळे ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव परिसरात ऐन कापणीच्या तोंडाशी आलेले पीक आडवे पडल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गुरुवारी गुढी पाडव्याच्या सणाआधीच शेतकऱ्यांवर संकट कोसळल्याचे चित्र दिसून येत आहे. मोठ्या अपेक्षेने घेतलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीचा आढावा स्थानिक पातळीवर घेतला जात असून, मदतीची मागणी होत आहे.
19 Mar 2026 02:40 PM (IST)
मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयक, २०२६ बुधवारी (दि.१८) विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाद्वारे वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
19 Mar 2026 02:35 PM (IST)
टी-२० विश्वचषकात आपली छाप पाडल्यानंतर, संजू सॅमसन आयपीएल २०२६ मध्ये पुनरागमन करणार आहे. तो पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाकडून खेळणार आहे. चेन्नईने यष्टीरक्षक-फलंदाज सॅमसनला राजस्थान रॉयल्स (RR) कडून ट्रेडद्वारे संघात घेतले आहे. त्याने अनेक वर्षे RR चे कर्णधारपद भूषवले होते. त्यामुळे, सॅमसनने CSK ची सूत्रे हाती घ्यावीत की नाही यावर चर्चा सुरू आहे. भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने CSK च्या कर्णधारपदाबद्दल स्पष्टपणे आपले मत व्यक्त केले आहे.
19 Mar 2026 02:30 PM (IST)
Ohio Meteor Strike March 2026 : मंगळवारी सकाळी ९ वाजता, जेव्हा अमेरिकेतील ओहायोमधील (Ohio America) नागरिक आपल्या दैनंदिन कामात व्यस्त होते, तेव्हा अचानक आकाशात एक असा चमत्कार घडला ज्याने सर्वांच्या काळजात धडकी भरवली. आकाशातून एक प्रचंड वेगाने येणारा आगीचा गोळा दिसला आणि काही क्षणांतच एका भीषण स्फोटाने जमीन हादरली. हे कोणतेही विमान अपघात किंवा क्षेपणास्त्र नव्हते, तर हा होता अंतराळातून आलेला एक महाकाय ‘उल्कापिंड’ (Meteorite).
19 Mar 2026 02:19 PM (IST)
झी स्टुडिओ निर्मित ‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी होळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं एक वेधक मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. त्या पोस्टरमध्ये एका जुन्या दरवाजावर उमटलेले हातांचे ठसे आणि दाराआड दिसणारी एक गूढ आकृती यामुळे प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं. तसेच आता आणखी एक नवं पोस्टर प्रेक्षकांसाठी निर्मात्यांनी प्रदर्शित केले आहे.
19 Mar 2026 02:11 PM (IST)
राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. मध्य प्रदेश परिसरातील चक्रीय वाऱ्यांची स्थिती आणि उत्तर कर्नाटकपर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांत ताशी ५० ते ६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार विजांच्या कडकडाटासह गारपीट (Hailstorm) होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. विशेषतः नाशिक जिल्हा आणि घाटमाथ्यावरील परिसरासाठी आजचा गुरुवारचा दिवस अत्यंत संवेदनशील मानला जात असून, नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
19 Mar 2026 02:00 PM (IST)
मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल युद्धाने (US-Israel Iran War) आता एका अशा वळणावर प्रवेश केला आहे, जिथून संपूर्ण जगाचे ‘ऊर्जा चक्र’ विस्कळीत होऊ शकते. बुधवारी इस्रायलने इराणची आर्थिक नस मानल्या जाणाऱ्या ‘साउथ पार्स’ (South Pars) या गॅस क्षेत्रावर मोठा हल्ला चढवला. हा हल्ला केवळ इराणवर नसून तो जगाच्या गॅस पुरवठ्यावर झालेला प्रहार मानला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या हल्ल्यापासून अंतर राखले असले, तरी या एका घटनेने तेलाच्या किमती ५ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत.
19 Mar 2026 01:55 PM (IST)
हार्दिक पांड्या आणि त्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्या यांच्यात सर्व काही ठीक आहे का? दोन्ही भावांमध्ये भांडण झाले आहे का? हार्दिक पांड्याने आपल्या वहिनीशी बोलणे बंद केले आहे का? माहिका शर्माच्या आगमनाने हार्दिक आणि कृणाल यांच्यातील अंतर वाढले आहे का? अलीकडील घडामोडींमुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. आतापर्यंत आपण हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यात फक्त प्रेमच पाहिले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना दोन्ही भावांमधील वाढत्या दुराव्याकडे निर्देश करत आहेत.
19 Mar 2026 01:45 PM (IST)
एसटी महामंडळाचा ५१५० विजेवरील बस कंत्राटी पद्धतीने भाडे तत्वावर घेण्याचा प्रकल्प अपयशी ठरल्या नंतरही सरकारी अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा होत आहे. तसेच मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांचे निर्देश गांभीर्याने घेतले जात नसतील तर लोकवाहिनीसाठी हे दुर्दैवी असून अधिकाऱ्यांना या प्रकरणी काहीच गांभीर्य दिसून येत नसल्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
19 Mar 2026 01:40 PM (IST)
आयपीएल २०२६ २८ मार्च रोजी सुरू होणार आहे. आयपीएलच्या पहिल्या सिझनची सुरूवात 2008 मध्ये झाली होती. या नव्या सिझनसाठी सर्वच क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. युवा खेळाडू त्याचबरोबर अनेक दिग्गज खेळाडू या सिझनमध्ये खेळताना दिसणार आहेत. या हंगामातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाईल. हा आयपीएलचा १९वा हंगाम असेल.
19 Mar 2026 01:35 PM (IST)
मध्यपूर्वेतील संघर्ष आता भीषण झाला आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे इराण चवताळला असून मध्यपूर्वेतील आखाती देशांवर हल्ले करत आहे. इराणने सौदी अरेबिया, युएई, कतार, बहरीन या देशांतील उर्जा केंद्र आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले केले आहे. यामुळे आखाती देश संतप्त झाले असून इराणला गंभीर इशारा दिला आहे.
19 Mar 2026 01:25 PM (IST)
हैदराबाद येथून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. Youtube वरील आपल्या फॅमिली व्लॉगसाठी ओळखली जाणारी २० वर्षीय चित्तारी वैष्णवी हिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वैष्णवी तीन महिन्यांची गर्भवती होती. तिच्या मृत्यूला तिचा पती जबाबदार आहे. तिचा पती तिची निर्गुण हत्या करत फरार झालाय. पोलिसाचा शोध घेत आहेत. हैदराबाद जवळच्या जगतियाल जिल्ह्यातील कोरुतला मंडळातील माधापूर गावात ही घटना घडली.
19 Mar 2026 01:15 PM (IST)
अशोक खरात उर्फ ‘स्वयंघोषित कॅप्टन’ याला नाशिक गुन्हे शाखा युनिट-१ ने अटक केली आहे. आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात त्याच कार्यालय असून याच कार्यालयातून तो त्याचे कारनामे करत होता. या तपासादरम्यान पोलिसांना 58 व्हिडिओ सापडले असून, यामध्ये काही नामवंत महिला आणि सेलिब्रिटी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या व्हिडिओंची सखोल चौकशी केली जात असून, यामध्ये आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. यामध्ये काही नामवंत महिला, वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय व्यक्तींशी संबंधित संदर्भ असण्याची शक्यता आहे.
19 Mar 2026 01:07 PM (IST)
ईदच्या खास मुहूर्तावर सलमान खानने आपल्या चाहत्यांना एक सुंदर भेट दिली आहे. सलमान खान फिल्म्सच्या ‘मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटातील “चांद देख लेना” हे भावनिक गाणं नुकतंच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात सलमान खान आणि चित्रांगदा सिंह यांची प्रेम, प्रतीक्षा आणि भावनांची नाजूक केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. या दोघांना एकत्र पाहून चाहते देखील खुश झाले आहेत. अशातच त्यांचे नवीन गाणे सोशल मीडियावर गाजत आहे.
19 Mar 2026 12:50 PM (IST)
चेन्नईत पतीने पत्नीवर ॲसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली. प्रेमविवाहानंतर छळामुळे वेगळी राहणाऱ्या महिलेवर हल्ला झाला. तिच्या एका डोळ्याची दृष्टी अंशतः गेली असून पोलिस तपास सुरू आहे.
19 Mar 2026 12:50 PM (IST)
UPI पेमेंट करताना, लोक अनेकदा चुकीच्या नंबरवर पैसे पाठवण्याची चूक करतात. घाईगडबडीत, आपण कुठे आणि कोणत्या नंबरवर पैसे पाठवत आहोत याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत, व्यवहार पूर्ण झाल्यावर आणि प्राप्तकर्त्याला पैसे न मिळाल्यास, आपल्या लक्षात येते की आपण चुकीच्या नंबरवर पेमेंट केले आहे. जर तुमच्यासोबत असे घडले, तर घाबरू नका. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर UPI पेमेंट चुकीच्या नंबरवर झाले, तर तुम्ही ताबडतोब NPCI च्या टोल-फ्री नंबरवर तक्रार दाखल करावी. यामुळे तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते.
19 Mar 2026 12:40 PM (IST)
रायपूरमधील मेकारा येथील ॲडव्हान्स्ड कार्डियाक इन्स्टिट्यूटमधील डॉ. स्मित श्रीवास्तव आणि त्यांच्या टीमने एका स्मार्टवॉचची क्लिनिकल ट्रायल यशस्वीरित्या पार पाडली आहे. हे घड्याळ हृदयविकाराचा झटका येण्याच्या तीन तास आधी तुम्हाला सतर्क करेल.
19 Mar 2026 12:40 PM (IST)
नुकत्याच झालेल्या विश्वचषकामध्ये दिनेश कार्तिकने काॅमेंटेटरची भूमिका साकारली होती. त्याने क्रिकेटला अलविदा केल्यानंतर तो सध्या काॅमेंट्री करत आहे. आता त्याने सोशल मिडियावर शेअर करुन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. भारताचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्याची पत्नी दीपिका पल्लीकलने एका मुलीला जन्म दिला आहे. दिनेश कार्तिकने ही आनंदाची बातमी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसोबत शेअर केली.
19 Mar 2026 12:30 PM (IST)
बॉलीवूड स्टार रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ या चित्रपटाने प्रदर्शनानंतर अशी खळबळ उडवून दिली आहे की प्रेक्षक थक्क झाले आहेत. हा चित्रपट आज मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला लोकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तसेच बॉलीवूड आणि दाक्षिणात्य कलाकार दोघेही ‘धुरंधर २’ चे कौतुक करताना दिसत आहेत. दरम्यान, दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचे एक ट्विट समोर आले आहे, जे सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या ट्विटमुळे लोक भारावून गेले आहेत. अभिनेता नक्की काय म्हणाला जाणून घेऊ.
19 Mar 2026 12:10 PM (IST)
मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्षाने आता भयानक रुप धारण केले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर सर्वोच्च सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामुळे इराण अमेरिका-इस्रायलविरोधात संतापला आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने अली लारीजानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शेजारी देशांमध्ये हल्ले केले आहे. या हल्ल्यांमध्ये उर्जा केंद्रांना टार्गेट करण्याता आले आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.
19 Mar 2026 12:00 PM (IST)
तेहरान/वॉशिंग्टन/जेरुसलेम : गेल्या तीन आठवड्यांपासून मध्यपूर्वेत इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण संघर्ष (US-Israel VS Iran War) पेटला आहे. या संघर्षाने जागतिक पातळीवर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. यामध्ये सर्वोत मोठे नुकसान हे इराणचे झाले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तसेच त्यांचे संपूर्ण कुटुंबही उद्ध्वस्त झाले आहे. यानंतर इराणचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांचीही हत्या करण्यात आली आहे. यामुळे इराण पेटून उठला आहे. याच पार्श्वभूमीवर इराणचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी अमेरिका-इस्रायलला गंभीर इशारा दिला आहे.
19 Mar 2026 11:50 AM (IST)
२०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सर्व खेळाडू सध्या आपापल्या घरी आहेत. २०२६ चा टी-२० विश्वचषक भारतीय संघाने जिंकला त्यानंतर भारताच्या कमालीच्या कामगिरीनंतर बीसीसीआयने मोठी बक्षिस रक्कम खेळाडूंसाठी जाहीर केली आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यामधील मंत्र्यांनी त्यांना बक्षीस रक्कम देऊन त्यांचा सन्मान केला आहे. तिलक वर्मा देखील हैदराबादमध्ये आहेत. काल त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेतली.
19 Mar 2026 11:40 AM (IST)
आजच्या डिजिटल युगात क्यूआर कोडद्वारे पेमेंट करणे अत्यंत सोयीचे आणि जलद झाले आहे. अगदी छोट्या खरेदीपासून मोठ्या व्यवहारांपर्यंत आपण सहजपणे मोबाईलद्वारे पैसे पाठवतो. मात्र, हीच सोय अनेक वेळा धोक्याची ठरू शकते. सायबर गुन्हेगार आता लोकांच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत खोटे क्यूआर कोड वापरून फसवणूक करत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही अशा फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करू शकता.
19 Mar 2026 11:30 AM (IST)
आज १९ मार्च २०२६! आजचा दिवस अशा लोकांसाठी समर्पित आहे, ज्यांच्याशिवाय कोणताही व्यवसाय, मग तो छोटा असो वा मोठा, उभा राहूच शकत नाही. आपण बोलत आहोत ‘ग्राहकां’बद्दल. जगभरात आज ‘आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन’ (International Clients Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा दिवस केवळ कॅलेंडरवरील एक तारीख नसून, व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यातील विश्वासाच्या नात्याचा उत्सव आहे.
19 Mar 2026 11:20 AM (IST)
उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक आणि संताप जनक घटना समोर आली आहे. एका तरुणाने त्याच्याच वर्धा शिकणाऱ्या तरुणीचा फेसबुक आयडी हॅक करून तिचे मानसिक शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचं समोर आलं आहे. तब्बल तीन लाख रोख रुपये व 50 लाख रुपयांचे दागिने तिच्याकडून उकळले. या प्रकारामुळे पीडिता इतकी घाबरली होती की तिची प्रकृती खालावली. हा धक्कादायक प्रकार आग्रा परिसरातील आहे. या घटनेने खळबळ वाली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.