'महाभारत' फेम भाजप नेत्या रूपा गांगुलींना पोलिसांनी अटक केली आहे. (फोटो - सोशल मीडिया)
कलकत्ता : भाजप नेत्या आणि माजी राज्यसभा खासदार रुपा गांगुली यांना अटक करण्यात आली आहे. रात्रभर पोलील ठाण्याच्या बाहेर बसून आंदोलन करणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. स्थानिक महिला भाजप नेत्या रुबी दास यांच्या सुटकेच्या मागणीसाठी त्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय़्या आंदोलन केले. मात्र आता पोलिसांनी माजी राज्यसभा खासदार रुपा गांगुली यांना अटक केली आहे. रुपा गांगुली या टीव्ही जगातातील देखील लोकप्रिय कलाकार आबेत. बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या टीव्ही मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारली होती. आता भाजप नेत्या रुपा गांगुली यांना अटक करण्यात आली आहे. रुपा गांगुली यांनी बुधवारी (दि.02) रात्रीपासून दक्षिण कोलकाता येथील पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
आंदोलनाचे कारण काय?
भाजप नेत्या रुपा गांगुली यांच्या कार्यकर्त्यांनी आणि इतर सहकाऱ्यांनी पोलीस कारवाई करायला दिरंगाई करत असल्यामुळे आंदोलन केले. हे सर्व प्रकरण एका अपघाताशी संबंधित आहे. एका शाळेतील मुलाला पेलोडरची धडक बसली. कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशन (केएमसी) कर्मचारी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी त्याचा वापर करत होते. यामध्ये मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे हे सर्व शाळकरी मुलाच्या मृत्यूच्या निषेधार्थ आंदोलन करत होते. या घटनेच्या निषेधार्थ रुपा गांगुली यांचे कार्यकर्ते आणि सहकारी आंदोलन करत होते. पोलिसांनी त्यांना अटक केली. कार्यकर्त्यांच्या अटकेची माहिती मिळताच रुपा गांगुली दक्षिण कोलकाता येथील स्थानिक बांसद्रोणी पोलीस ठाण्यात पोहोचल्या. आणि त्यांनी दास यांच्या सुटकेची मागणी करत आंदोलन सुरू केले. रात्रभर त्या पोलीस ठाण्याच्या बाहेर बसून आंदोलन करत राहिल्या. यानंतर पोलिसांनी माजी राज्यसभा खासदार रुपा गांगुली यांना अटक केली आहे.
रुपा गांगुली यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांवर आरोप केले आहेत. गांगुली म्हणाल्या की, गांगुली यांनी दावा केला की दास आणि इतर भाजप समर्थक शांततापूर्ण आंदोलन करत होते. जेव्हा त्यांच्यावर स्थानिक तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी आंदोलकांनाच अटक केली, असा रोष रुपा गांगुली यांनी व्यक्त केला. अटक केल्यानंतर गांगुलीने आरोप केला आहे की, पोलिसांनी त्यांना बॅगही घेऊ दिली नाही. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी गांगुलीला अटक करण्यात आली आहे.