Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut : “मतदानात घोटाळे करायचे त्यांनी केले, शाई पुसली गेली”, संजय राऊतांचा सत्ताधारांवर गंभीर आरोप

Sanjay Raut on Municipal Election Result 2026 : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे समोर आलं आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 16, 2026 | 11:34 AM
"मतदानात घोटाळे करायचे त्यांनी केले, शाई पुसली गेली", संजय राऊतांचा सत्ताधारांवर गंभीर आरोप

"मतदानात घोटाळे करायचे त्यांनी केले, शाई पुसली गेली", संजय राऊतांचा सत्ताधारांवर गंभीर आरोप

Follow Us
Close
Follow Us:

Sanjay Raut on Municipal Election Result 2026 News Marathi : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून विविध ठिकाणच्या २३ मतमोजणी कक्षात सुरु आहे. यासाठी २.२९९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या मतमोजणी प्रक्रियेकरिता तयार करण्यात आलेल्या सविस्तर आराखड्यास महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे. याचदरम्यान शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे समोर आलं आहे.

PMC Election Result : पुण्याचा कारभार कोणाच्या हातात जाणार? निकालाआधीच रविंद्र धंगेकरांचा मोठा विश्वास

नेमकं काय म्हटलं?

शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी महानगरपालिका निवडणुकीवर म्हटले आहे की, “मुंबईसारख्या शहरातील मतदानाचा पॅटर्न हा एक गंभीर विषय आहे. शिवसेना (यूबीटी), मनसे किंवा काँग्रेस सत्तेत असलेल्या भागातून विधानसभा निवडणुकीत मतदान केलेल्या हजारो मतदारांची नावे गायब आहेत. ईव्हीएम मशीन व्यवस्थित काम करत नाहीत. निवडणूक आयोग आमचे ऐकण्यास तयार नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांमध्ये बैठक झाली. का? आचारसंहिता अजूनही लागू आहे…, तसेच “मतदानाची टक्केवारी कळण्यापूर्वीच एक्झिट पोल बाहेर आले. भाजपने आपला विजय साजरा करायला सुरुवात केली. आम्ही लोकांना घाबरू नका असे आश्वासन दिले आहे…”

मतदानादरम्यान घोटाळे

“एक्झिट पोल येऊद्या, अजूनव काही पोल येऊद्या, लोकांनी मतदान केले आहे. मतदानात ज्यांना घोटाळे करायचे होते, त्यांनी ते केले आहे.पैसे वाटले गेले आहेत. शाई पुसली गेली आहे. तरीही आम्ही खात्रीने सांगतो की निकाल लागू द्या. तमाम मराठी माणसाने, मुंबईकरांनी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या युतीला मतदान केलं आहे”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

…तर ठाकरे बंधू महापौर येईल

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याबाबत कोणतीही कृती झाली नाही. तरीही, आम्ही जिद्दीने प्रचार केला आणि लोकांपर्यंत पोहोचलो. सत्ताधारी पक्ष लोकशाहीवर विश्वास ठेवत नसला तरी, आम्ही लोकशाही पद्धतीने निवडणुका लढवल्या. जर लोकांनी मतदान जर इव्हीएम मशीनमधून गायब केलं नसेल तर ठाकरे बंधूंचा महापौर होईल. यांच्याकडे पूर्ण यंत्रणा आहे, म्हणून ते खात्रीने सांगतात की १४०-१२५ जागांवर जिंकतोय”, असं संजय राऊत म्हणाले. “मुंबईला वाचवण्याकरता जे जे सोबत येतील त्यांना सोबत घेतलं जाईल. ते पक्ष स्वत:हून सोबत येतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केलं आहे.

पहिल्यांदाच बदलली मतमोजणीची वेळ, सकाळी 10 पासून का सुरू? पहिल्या टप्प्यात ४६ वॉर्ड, त्यानंतर उर्वरित जागांवर मतमोजणी

Web Title: Maharashtra mahanagar palika election results 2026 sanjay raut allegations on bjp meeting with bmc commissioner bhushan gagarani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • sanjay raut

संबंधित बातम्या

PMC Election Result : पुण्याचा कारभार कोणाच्या हातात जाणार? निकालाआधीच रविंद्र धंगेकरांचा मोठा विश्वास
1

PMC Election Result : पुण्याचा कारभार कोणाच्या हातात जाणार? निकालाआधीच रविंद्र धंगेकरांचा मोठा विश्वास

Pune Municipal Elections : पुण्यात भाजप सध्या 38 तर राष्ट्रवादी 14 जागांवर आघाडीवर
2

Pune Municipal Elections : पुण्यात भाजप सध्या 38 तर राष्ट्रवादी 14 जागांवर आघाडीवर

Municipal Elections 2026: चिपळूणमध्ये राजकीय भूकंप! निकालापूर्वीच ठाकरे गटाला धक्का, ‘या’ नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा
3

Municipal Elections 2026: चिपळूणमध्ये राजकीय भूकंप! निकालापूर्वीच ठाकरे गटाला धक्का, ‘या’ नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

पहिल्यांदाच बदलली मतमोजणीची वेळ, सकाळी 10 पासून का सुरू? पहिल्या टप्प्यात ४६ वॉर्ड, त्यानंतर उर्वरित जागांवर मतमोजणी
4

पहिल्यांदाच बदलली मतमोजणीची वेळ, सकाळी 10 पासून का सुरू? पहिल्या टप्प्यात ४६ वॉर्ड, त्यानंतर उर्वरित जागांवर मतमोजणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.