Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला

Maharashtra Politics: राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ अभियानावरून सुरू झालेल्या वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न, महिला आरक्षण आणि वंदे मातरमच्या मुद्द्यावरही त्यांनी भाजपवर आरोप केले.

  • By विवेक
Updated On: Aug 31, 2026 | 08:33 PM
Harshvardhan Sapkal Criticized CM Devendra Fadnavis

Harshvardhan Sapkal Criticized CM Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • ‘छात्रों की गुंज’ अभियानावरून फडणवीसांवर हर्षवर्धन सपकाळांचा पलटवार
  • महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयकावर भाजपवर गंभीर आरोप
  • ‘Get Well Soon Devendra Fadnavis’ म्हणत सपकाळांचा टोला
 

Maharashtra Politics : राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ अभियानावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कार्यक्रमात राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार पलटवार केला. राहुल गांधी यांच्या अभियानामुळे भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची झोप उडाली असून त्यातूनच अपप्रचार सुरू असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, ‘छात्रों की गुंज’ या अभियानाला विशेषतः विद्यार्थिनींचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भाजप अस्वस्थ झाला आहे. मागील १३ वर्षांत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांसाठी नेमके काय केले, याचे उत्तर आधी द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरले

सपकाळ यांनी विविध भरती आणि स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांचा उल्लेख करत भाजप सरकारवर निशाणा साधला. NET, TET, तलाठी, MPSC, न्यायालयीन भरती, पुणे महापालिका आणि MMRDA भरतीसह अनेक परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असून सरकार त्यावर उत्तर देऊ शकत नसल्याचा दावा त्यांनी केला.

Maratha Reservation : ‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात

महिला आरक्षणावरूनही टीका

महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा विरोध असल्याचा आरोप फेटाळून लावत सपकाळ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची सुरुवात काँग्रेसनेच केली होती. महिला आरक्षणाला विरोध नसून, त्यामागे डिलिमिटेशन विधेयक आणण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत, महिलांना संधी द्यायची असेल तर आधी भाजपने आपल्या पक्षात उदाहरण घालून द्यावे, असे म्हटले.

वंदे मातरम आणि आरएसएसवरही निशाणा

वंदे मातरमच्या मुद्द्यावरही सपकाळ यांनी भाजपवर टीका केली. वंदे मातरमला काँग्रेसचा विरोध असल्याचा प्रचार चुकीचा असल्याचे सांगत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसच्या भूमिकेचा उल्लेख केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये आधी वंदे मातरम सुरू करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली

‘Get Well Soon देवेंद्र फडणवीस’

भाजप इतिहास, संविधान, महिला आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर राजकारण करत असल्याचा आरोप करत सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘Get Well Soon देवेंद्र फडणवीस’ असा टोला लगावला. दरम्यान, या वक्तव्यांमुळे राज्यातील काँग्रेस-भाजप वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Maharashtra politics harshvardhan sapkal reply devendra fadnavis rahul gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 08:33 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Harshvardhan Sapkal
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Dharmendra Pradhan : ‘सत्तापालटासाठी आंदोलन?’ धर्मेंद्र प्रधानांचे गंभीर आरोप; राहुल गांधी, CJP वर साधला जोरदार निशाणा
1

Dharmendra Pradhan : ‘सत्तापालटासाठी आंदोलन?’ धर्मेंद्र प्रधानांचे गंभीर आरोप; राहुल गांधी, CJP वर साधला जोरदार निशाणा

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
2

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Droght News : शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! वाशिममधून हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी
3

Droght News : शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! वाशिममधून हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी
4

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.