
Rahul Gandhi, Mallikarjun Kharge, Haldwani Rally, BJP RSS Shuddhikaran
पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधी यांनी शुद्धीकरण केलेल्या नेत्यांचे व्हिडीओदेखील सार्वजनिक केले आहेत. पत्रकार परिषदेत थेट व्हिडीओ प्रसिद्ध करत राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएस आजही अस्पृश्यतेच्या विचारांचा पर्दाफाश केला आहे. “राजस्थानमध्ये आमचे एक नेते मंदिरात गेले. ते मंदिरात जाऊन आल्यानंतर भाजप नेत्यांनी मंदिराचे शुद्धीकरण करुन घेतले. आमचे नेते मल्लिकार्जुन खर्गे उत्तराखंड येथील हल्दवानीमध्ये रामलीला मैदानात भाषण देण्यासाठी गेले, पण त्यांच्या सभेनंतर तिथेही शुद्धीकरण केले गेले. त्यांच्याच पक्षाचे माजी मुख्यमंत्री माजी जी हे मंदिरात गेले, त्यानंतर मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले. हे सर्व कोण करत आहे, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. त्याचवेळी फक्त भाजप आणि आरएसएसचे लोक हे करत आहेत आणि हे गुन्हा आहे. याला आपण शुद्धीकरण म्हणतो पण ही अस्पृश्यतेचे दुसरे नाव आहे. असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.
राहुल गांधी म्हणाले की, “अस्पृश्यता हे संविधानानुसार बेकायदेशीर करण्यात आले होते. पण आता भाजपचे लोक सर्वांदेखत ही अस्पृश्यतेची वागणूक देत आहेत. ८ ऑगस्टला खर्गेंची रॅली झाली. १० ऑगस्टला भाजप आरएसएसने शुद्धीकरण करून घेतले. काँग्रेसच्या लोकांमुळे घाण होते असं भाजपचे लोक म्हणत आहेत. हल्दवानी मध्ये भाजपचे गिरीष पांडे यांनी हे शुद्धीकरण करून घेतले. भाजप जाहीरपणे अस्पृश्यतेचे समर्थन करत आहेत. १० ऑगस्टला हे सर्व झाल्यानंतर १३ ऑगस्टला संसंदेत हा अस्पृश्यतेचा मुद्दा उपस्थित केला. मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या रॅलीनंतर झालेले शुद्धीकरण हा अपमान असल्याचे म्हटले आहे. हिंदुस्तानच्या प्रत्येक दलितांचा हा अपमान आहे.
ये सिर्फ कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जी का मुद्दा नहीं है, बल्कि ये हिंदुस्तान के हर दलित व्यक्ति से जुड़ा मुद्दा है। अगर हमारे राष्ट्रीय अध्यक्ष के साथ खुलेआम, बिना झिझक के ऐसा व्यवहार किया जा सकता है तो सोचिए… स्कूल में बच्चे के साथ क्या हो रहा होगा? ये हमारे लिए… pic.twitter.com/ktnQMIKHMP — Congress (@INCIndia) August 29, 2026
भाजपचे उत्तराखंडचे नेते आहेत. ते स्वत: म्हणत आहेत की शुद्धीकरणे केले त्यात कोणताही गुन्हा केला नाही. आज २० दिवस उलटले, SCST कायद्यानुसार हा शुद्धीकरण हा गुन्हा आहे. पण कोणताही गुन्हा झाला नाही, आता आमची मागणी आहे, की ज्या लोकांनी शुद्धीकरण केले त्यांच्यावर FIR दाखल व्हावी. पंतप्रधान म्हणतात, ते प्रत्येक जातीचे आहेत. देशाचे पंतप्रधान आहेत. पण त्यांच्याच पक्षाचा प्रमुख म्हणतो की शुद्धीकरण केले ते योग्यच केले, RSSच्या लोकांनी शुद्धीकरण केले, आता पंतप्रधानांनी या सर्वांवर SCST कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत.
ही लढाई, संविधान, आरएसएस आणि भाजपच्या विचारधारेची आहे, पण हा प्रसंग भाजप आणि आरएसएसचा माईंडसेट दाखवतो. या देशातील दलितांनी सन्मानाने जगावं अशी या लोकांची इच्छा नाही. त्यामुळे उत्तराखंडमध्ये तातडीने एफआयआर दाखल झाली पाहिजे, आम्ही कोणतीही चुकीची गोष्ट मागत नाही आहोत. अस्पृश्यता हा गुन्हा आहे. त्यामुळे आम्ही आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांविरोधात झालेल्या अस्पृश्यतेबाबत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करत आहोत. मल्लिकार्जुन खर्गे यांना न्याय मिळायलाच हवा. हा संबंधित राज्याचे कर्तव्य आहे.
देशात दोन विचाराधांवरून राजकारण सुरु आहे. हजारो वर्षांपासून या देशात दलितांवरील अत्याचार हिंसा केली गेली. पण संविधानांनंतर हे बेकायदेशीर आहें, पण आजही शाळांमध्ये शौचालये आणि शाळा स्वच्छ करवून घेतल्या जातात. या देशात काय सुरू आहे. अनेक गांवांमध्ये आजही गावातील दलितांना पाणवठ्यावर पाणी भरू दिले जात नाहीये, एका दलित व्यक्तीने स्वत:साठी एक विहीर खोदून घेतली. उत्तर प्रदेशात आजही दलित तरुणांना त्यांच्या वरातीत हेल्मेट घालावे लागत आहे. कारण त्यांच्यावर तिथेही हल्ले होऊ लागले आहेत. दररोज करोडो लोकांवर हे अन्याय होत आहेत. हे उत्तर प्रदेशचे चित्र आहे.
पाहा व्हिडीओ