Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi FIR Haldwani: राहुल गांधींविरोधात हल्द्वानीत पोलिसांत FIR दाखल; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Rahul Gandhi FIR Haldwani Police Station: रामलीला मैदानातील घाण आणि मुस्लिम जातीयवादी घोषणांच्या निषेधार्थ हा शुद्धीकरण विधी करण्यात आला होता. काँग्रेस पक्षाने खर्गे यांना दलित असल्याचे जोडून या शुद्धीकरण विधीचे राजकारण करण्यास सुरुवात केली.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 31, 2026 | 12:18 PM
Rahul Gandhi FIR, Haldwani Police Station, Mallikarjun Kharge

Rahul Gandhi FIR, Haldwani Police Station, Mallikarjun Kharge

Follow Us
Follow Us:
  • काँग्रेस खासदार व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात हल्द्वानीत FIR दाखल.
  •  दलित तरुण अमित कुमार यांच्या तक्रारीवरून BNS व SC/ST कायद्यांतर्गत गुन्हा नोंद.
  •  मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर रामलीला मैदानावर हिंदुत्ववादी संघटनांकडून ‘शुद्धीकरण’.
Rahul Gandhi FIR Haldwani: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका दलित तरुणाच्या तक्रारीवरून हल्द्वानी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी हल्द्वानी येथीस जाहीर सभेनंतर, एका हिंदुत्ववादी संघटनेने त्यांच्या सभास्थळाचे शुद्धीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावरून संसदेत मोठा गदारोळ झाला होता. या प्रकरणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्याची मागणी राहुल गांधीनी केली होती. त्यावरुन आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, अनुसूचित जातीतील तरुण अमित कुमार यांनी राहुल गांधींविरोधात हल्द्वानी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित तरुणाच्या तक्रारीवरुन राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या (BNSS) कलम १९६ आणि २९९ तसेच अनुसूचित जाती/जमाती कायदा, १९८९ च्या कलम ३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराचा आरोप आहे की, राहुल गांधींच्या वक्तव्यांमुळे अनुसूचित जातीच्या लोकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत आणि समाजात तणाव निर्माण झाला आहे.

Vasai Virar News : महापालिकेचा मोठा निर्णय? निराधार महिलांच्या अनुदानात होणार वाढ; दरमहा मिळणार ‘इतके’ रुपये

शुद्धीकरण विधीचा मुद्दा काय आहे?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या 8 ऑगस्टच्या जाहीर सभेनंतर काही कथित हिंदुत्त्वावादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून रामलीला मैदानात शुद्धीकरण विधी करण्यात आला. या शुद्धीकरण विधी केलेल्यांवर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जवाहर नगर येथील रहिवासी अमित कुमार यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित कुमार हे ‘श्री राम सेना चॅरिटेबल सर्व्हिस ट्रस्ट’शी संबंधित असून ते स्वतःला अनुसूचित जाती समाजाचे सदस्य मानतात.

अमित कुमार यांच्या तक्रारीनुसार , २९ ऑगस्ट रोजी एका पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधींनी हल्द्वानीच्या रामलीला मैदानावर झालेल्या एका विधीतील सहभागींबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर रामलीला मैदानावर धार्मिक विधी आणि स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. राहुल गांधी यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचे वर्णन अस्पृश्यतावादी मानसिकता असलेले आणि दलितविरोधी असे केले.

Mumbai News: मुंबईकरांच्या कटिंगला साखरेचा कडू घोट; तलफ कशी भागणार? वाढत्या महागाई खिशावर भार

रामलीला मैदानातील शुद्धीकरण विधीवरून वादाची ठिणगी

रामलीला मैदानातील घाण आणि मुस्लिम जातीयवादी घोषणांच्या निषेधार्थ हा शुद्धीकरण विधी करण्यात आला होता. काँग्रेस पक्षाने खर्गे यांना दलित असल्याचे जोडून या शुद्धीकरण विधीचे राजकारण करण्यास सुरुवात केली. हल्द्वानीमध्ये राहुल गांधींविरुद्ध दाखल झालेल्या अहवालावर काँग्रेस पक्षाने भाष्य केले आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सूर्यकांत धस्माना म्हणाले की, भाजप राहुल गांधींना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण काँग्रेस त्यांना घाबरणार नाही. शुद्धीकरण विधी पार पाडण्याच्या कृतीबद्दल देशातील अनुसूचित जाती समुदाय भाजपला माफ करणार नाही.

जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले, तेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू होते. या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला. राज्यसभेच्या अध्यक्षांनीही या घटनेचा निषेध केला आणि कारवाईचे आदेश दिले. भाजप नेते जेपी नड्डा यांनी स्वतः चौकशीची मागणी केली आहे.

 

Web Title: National newsfir registered against rahul gandhi in haldwani under sc st act

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Mallikarjun Kharge
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

SIR च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय; आता देशातील 17 राज्यांमध्ये…
1

SIR च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय; आता देशातील 17 राज्यांमध्ये…

Dharmendra Pradhan : ‘सत्तापालटासाठी आंदोलन?’ धर्मेंद्र प्रधानांचे गंभीर आरोप; राहुल गांधी, CJP वर साधला जोरदार निशाणा
2

Dharmendra Pradhan : ‘सत्तापालटासाठी आंदोलन?’ धर्मेंद्र प्रधानांचे गंभीर आरोप; राहुल गांधी, CJP वर साधला जोरदार निशाणा

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका
3

Rahul Gandhi on CJP leaders Arrest: झेंडे वेगवेगळे पण उद्देश एकच!; CJP नेत्यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची टिका

Amit Shah on Congress : राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, अमित शाहांचा हल्लाबोल
4

Amit Shah on Congress : राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, अमित शाहांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.