धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मनोज जरांगेंनी केली 'ही' मागणी; 'देशमुख यांची हत्या झाल्यानंतर...' (फोटो - सोशल मीडिया)
जालना : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणावर बसले आहेत. अंतरवली सराटी येथे जरांगे पाटील 25 जानेवारीपासून उपोषणावर आहेत. उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. मागील दीड वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांनी अनेक आंदोलन, उपोषण आणि मोर्च काढून आरक्षणाची मागणी केली आहे. ओबीसीमधून सर्व मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्यात यावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उगारले आहे. जरांगे पाटील हे त्यांच्या अंतरवली सराटी गावामध्ये आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांनी राज्यामध्ये इतर कुठेही आंदोलन करु नये असे सांगितले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांनी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवेळी देखील जरांगे पाटील यांनी आरक्षणाची जोरदार मागणी केली होती. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केल्यामुळे नेत्यांची चिंता वाढली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी बीड हत्या प्रकरणातील मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख दाखल झाले आहेत. बीड हत्या प्रकरणावरुन देखील जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत जनआक्रोश मोर्चाचे नेतृत्व केले. तसेच देशमुख परिवाराच्या हितासाठी भूमिका घेतली होती. आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी धनंजय देशमुख आले आहेत. त्यांच्यासोबत मस्साजोग गावाचे गावकरी देखील अंतरवली सराटीमध्ये दाखल झाले आहेत.
धनंजय देशमुख यांनी आमरण उपोषण सोडण्याची विनंती केली असून सरकारने मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन देखील केले आहे. धनंजय देशमुख म्हणाले की, “मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहेत. मी कालच मागणी केली आहे सरकार शिष्टमंडळ पाठवावं. सरकारने उपोषण गांभीर्याने घेतलं पाहिजे लवकरात लवकर शिष्ट मंडळ पाठवून यावर निर्णय घेतला पाहिजे. आज उपोषणात वैभवी सहभागी होणार आहे आईची तब्येत ठीक असेल तर आई पण सहभाग घेणार आहेत,” अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बीड हत्या प्रकरणाबात धनंजय देशमुख म्हणाले की, “मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिलेले पुरावे आहे त्यावर चर्चा करून निर्णय घेतील. आपली न्यायाची मागणी आहे आपण त्यावर ठाम आहोत मुख्यमंत्र्यांनी तशी यंत्रणा राबवली आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही आपली मागणी आहे बाकीचे निर्णय घेण्याचे काम त्यांच आहे. जे काही पुरावे दिले आहेत त्यावर चर्चा होईल, ते जे निर्णय घेतील ते समोर येईल आणि ते सगळ्यांना मान्य करावे लागेल. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला तर यंत्रणेवरील दबाव तर शंभर टक्के कमी होणार आहे. मागच्या ज्या दहा दिवसातील घडामोडी आहेत व्हिडिओ क्लिप, ऑडिओ क्लिप यावर गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे. ज्या गोष्टी घडल्या त्या परत नाही घडल्या पाहिजे त्यामुळे यावर निश्चित दबाव कमी होईल,” असे मत मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले आहे.