Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCERT चा अजब कारभार! मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याने इतिहासप्रेमी आक्रमक

आंदोलकांच्या मते, मराठा साम्राज्याचा नकाशा हटवणे म्हणजे Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या कार्याचा आणि इतिहासाचा अपमान आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 24, 2026 | 10:34 AM
NCERT, Maratha Empire, Maharashtra Politics, History, Syllabus Controversy,

NCERT, Maratha Empire, Maharashtra Politics, History, Syllabus Controversy,

Follow Us
Follow Us:
  •  NCERT च्या पाठ्यपुस्तकांमधून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला
  • महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला लेखी विनंती
  • मराठा साम्राज्याचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न
 

NCERT News: शालेय अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या मुद्द्यावरून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. NCERT च्या पाठ्यपुस्तकांमधून हा नकाशा हटवण्यात आल्याचा आरोप करत आंदोलकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, सरकारवर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. NCERT च्या या निर्णयाविरोधात विविध स्तरांवरून नाराजी व्यक्त होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

११ मार्च २०२६ रोजी विधान परिषदेत शिक्षणराज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी मराठा साम्राज्याचा नकाशा हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या पुस्तकांत नसल्याची कबुली दिली होती. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला लेखी विनंतीही केली होती. मात्र, केंद्र सरकारने या पत्राची कोणतीही दखल न घेता थेट केराची टोपली दाखली. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, राज्य सरकारच्या पत्रानंतर हिंदी माध्यमाच्या पुस्तकांनंतर इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आला, असा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे.

ढोलताशांच्या आवाजात अचानक पसरली शांतता! बिदाई दरम्यानच कॅमेरामॅनला कारने फरफटतं नेलं;

आंदोलकांचे म्हणणे काय?

हा प्रकार महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा अवमान आहे. “मराठा साम्राज्याचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप आंदोलकांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी राजस्थानमधून मराठा इतिहासाला विरोध झाला होता, त्यावेळी राज्यातील सर्व नेत्यांनी एकत्रित भूमिका घेतली असती, तर आज ही वेळ आली नसती, असेही आंदोलकांनी म्हटले. (Educational News) 

 

RTIमधून उघड झाला प्रकार

जेव्हा या मोहिमेतील कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार (RTI) अंतर्गत माहिती मागवली. त्यातूनच NCERT च्या पुस्तकांतून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यानंतर पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय शिक्षणमंत्री तसेच राज्यातील संबंधित मंत्र्यांना पत्रव्यवहार केल्यानंतरच सरकारला जाग आली, असा आरोप आंदोलकांनी केला.

महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे जाणार विधान परिषदेवर? काँग्रेसह राष्ट्रवादीचाही पाठिंबा

“अटक ते कटक” नकाश्याचे महत्त्व

आंदोलकांनी ‘अटक ते कटक’ या मराठा साम्राज्याच्या नकाश्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, हा नकाशा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या इतिहासाचा भाग आहे. या नकाश्यामुळेच मराठ्यांच्या साम्राज्यविस्ताराची खरी ताकद दिसून येते. तोच नकाशा हटवल्याने पुढील पिढीसमोर चुकीचा इतिहास जाण्याची भीती आहे,” असे त्यांनी म्हटले. या संपूर्ण प्रकरणात राज्य आणि केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, तसेच शालेय अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

 

शिवाजी महाराजांचा अपमान- आंदोलकांचा आरोप

आंदोलकांच्या मते, मराठा साम्राज्याचा नकाशा हटवणे म्हणजे Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या कार्याचा आणि इतिहासाचा अपमान आहे. “मराठा साम्राज्याने मुघल सत्तेचा पराभव करून हिंदुस्तानात आपले वर्चस्व निर्माण केले. हा नकाशा केवळ भूगोल नव्हे, तर इतिहासाचा आणि अस्मितेचा भाग आहे,” असे त्यांनी म्हटले. मराठा साम्राज्याचा ‘अटक ते कटक’ विस्तार हा देशाच्या एकात्मतेचे प्रतीक असल्याचा दावा करत आंदोलकांनी सांगितले की, “हा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. नकाशा हटवल्याने चुकीचा संदेश जाऊ शकतो.”

या प्रकरणात केवळ केंद्र सरकार नव्हे, तर राज्यातील लोकप्रतिनिधींवरही आंदोलकांनी निशाणा साधला आहे. “राजस्थानमधील प्रतिनिधींनी त्यांच्या राज्याच्या मुद्द्यांसाठी दिल्लीत जाऊन दबाव निर्माण केला. मात्र महाराष्ट्रातील खासदार आणि नेते याबाबत पुढाकार घेताना दिसले नाहीत,” असा आरोप करण्यात आला.

“ज्या Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या नावाने राज्यात राजकारण केले जाते, त्यांचाच इतिहास पुसला जात असताना सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांनी ठोस भूमिका घेतली नाही,” अशी टीकाही आंदोलकांनी केली. या संपूर्ण प्रकरणात मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, तसेच इतिहासाशी छेडछाड होऊ नये यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडित असलेल्या या विषयावर आता पुढील राजकीय आणि शैक्षणिक घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Maratha empire map dropped from ncert textbooks massive outrage erupts across maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • Educational News
  • History
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
1

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

Maharashtra Politics : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
2

Maharashtra Politics : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Ganeshotsav 2026: १ ली आणि २ री खत्तरगल्ली गणपती का आहेत प्रसिद्ध? जाणून घ्या इतिहास आणि परंपरा
3

Ganeshotsav 2026: १ ली आणि २ री खत्तरगल्ली गणपती का आहेत प्रसिद्ध? जाणून घ्या इतिहास आणि परंपरा

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
4

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.