Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation : जरांगे पाटलांना मंत्र्यांचा थेट इशारा; ‘आमच्या नेत्यांवर बोलाल तर आम्हीही रस्त्यावर उतरू’

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस असून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. सरकारने 15 पैकी 12 मागण्या मान्य केल्याचा दावा केला असताना जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले यांनी जरांगेंना थेट इशारा दिला आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 08, 2026 | 07:40 PM
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा अकरावा दिवस.
  • सरकारने 15 पैकी 12 मागण्या मान्य केल्याचा उदय सामंतांचा दावा.
  • नेत्यांवर टीका केल्यास रस्त्यावर उतरण्याचा मंत्र्यांचा इशारा.
 

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. सरकारने त्यांच्या 15 पैकी 12 मागण्या मान्य केल्याचा दावा केला असला, तरी जरांगे आपल्या सर्व मागण्यांवर ठाम आहेत. 12 सप्टेंबर रोजी बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्याची आणि त्यानंतर मुंबईकडे कूच करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर जोरदार टीका होत आहे. मंत्री उदय सामंत यांनी जरांगे यांनी संयमाने बोलावं, असं आवाहन केलं. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं योग्य नसल्याचं सामंत म्हणाले.

‘आमच्या नेत्यांवर बोलाल तर आम्हीही रस्त्यावर उतरू’

मंत्री प्रताप सरनाईक यांनीही जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे कूच करण्याच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, मात्र आपल्या नेत्यांबद्दल बोलताना मर्यादा पाळल्या पाहिजेत, असं सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

Maratha Reservation : ‘गणेशोत्सवात मुंबईत येऊन अडचणी निर्माण करू नका,’ उदय सामंत यांचे मनोज जरांगेंना आवाहन

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी मोठं काम केल्याचा दावा करत, नेत्यांविरोधात अपशब्द वापरले तर ते खपवून घेतले जाणार नाहीत. गरज पडली तर आम्हीही रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला.

 भरत गोगावले यांचे जरांगे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर

मंत्री भरत गोगावले यांनीही जरांगे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. हैदराबाद गॅझेट, आरक्षण आणि इतर मागण्यांवर चर्चा होऊ शकते; मात्र नेत्यांवर टीका केली तर ती सहन केली जाणार नाही, असं त्यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी आरक्षणासह विविध निर्णय घेतले असून हजारो तरुणांना नोकरी मिळवून देण्याचं काम झाल्याचा दावा गोगावले यांनी केला. सारथीच्या माध्यमातूनही समाजाला मदत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte: ’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी

मनोज जरांगे यांनी राजकारणावर भाष्य केलं तर आम्हीही त्याला उत्तर देऊ. ‘आम्हीही मराठे आहोत, आमच्यावरही केसेस आहेत,’ असं म्हणत गोगावले यांनी आक्रमक भूमिका घेतली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एकेरी भाषेत बोललं तर जशास तसं उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असून 12 सप्टेंबरच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.

Web Title: Maratha reservation manoj jarange ministers warning eknath shinde devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Pratap Sarnaiik

संबंधित बातम्या

Maratha Reservation : ‘गणेशोत्सवात मुंबईत येऊन अडचणी निर्माण करू नका,’ उदय सामंत यांचे मनोज जरांगेंना आवाहन
1

Maratha Reservation : ‘गणेशोत्सवात मुंबईत येऊन अडचणी निर्माण करू नका,’ उदय सामंत यांचे मनोज जरांगेंना आवाहन

‘आता शिष्टमंडळ जाणार नाही, शेवटी त्यांनी…’; विखे-पाटलांनी जरांगेंबाबत नेमकं काय म्हटलं?
2

‘आता शिष्टमंडळ जाणार नाही, शेवटी त्यांनी…’; विखे-पाटलांनी जरांगेंबाबत नेमकं काय म्हटलं?

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या
3

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी
4

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.