
Rohit Pawar, Gunaratna Sadavarte, Devendra Fadnavis, Manoj Jarange Patil,
ते मंगळवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “गुणरत्न सदावर्ते हा मुख्यमंत्री फडणीसांचा शूटर आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आजुबाजूला सदावर्तेंसारखे अनेक शुटर आहेत. हे सगळे बहुजन समाजातील शुटर आहेत, असा दावा रोहित पवार यांनी केला.
सदावर्ते हा हा व्यक्ती नेहमी नवनवीन कपड्यांत, गॉगल्समध्ये दिसतो. आपण सर्वजण गाईचं किंवा म्हशीचे दूध पितो. मात्र, सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, गाढविणीचं दूध पिल्यावर डोक्यावर काय परिणाम होतात, हे त्यांच्याकडे बघितलं तर कळते,” असा खोचक टोलाही रोहित पवारांनी लगावला आहे.
रोहित पवार म्हणाले की, जरांगे पाटील हे सामाजिक कार्यकर्ते असून मराठा आरक्षणाचं आंदोलन हे एक सामाजिक आंदोलन आहे. जरांगे पाटील हे आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाही सुरू आहेत. त्यांच्यात चर्चा सुरू असताना आम्ही बोलून काय होणार आहे अशा सवालही त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षण असो वा धनगर आरक्षण, समाजाचे आरक्षणाचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यात घटनादुरुस्ती करावीच लागणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांच्या खासदारांनी केंद्र सरकारकडे हा मुद्दा मांडला तर कोर्टात मराठा आणि धनगर समाजाला टिकणारे आरक्षण मिळेल, असे रोहित पवार यांनी सांगितले.
Mumbai News: शतकाअखेर मुंबई जलमय होण्याचा धोका! BMC करणार किनारपट्टीचे सविस्तर नकाशांकन
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. सोमेश्वर कारखान्याची निवडणूक शक्य असल्यास बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनाला अद्याप एक वर्षही पूर्ण झालेले नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर साखर कारखान्याचे कामकाज आतापर्यंत चांगल्या पद्धतीने चालू होते.. त्यामुळे आता कारखान्याची निवडणूक होत असेल, तर ती बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
केवळ सोमेश्वर कारखानाच नव्हे, तर इतर सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांबाबतही अशीच भूमिका घेतली पाहिजे. त्यांच्याकडचे काही चांगले संचालक आणि आमच्याकडचे काही चांगले संचालक एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध झाली, तर चांगलंच आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.