Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar PC : अजित पवारांसारख्या नेत्यांच्या मृत्यूवर FIR का घेतला जात नाही? पोलीस दबावाखाली; रोहित पवारांचा संशय

आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी पोलीस ठाणे गाठले होते. यानंतर माध्यमांशी संवाद साधून भूमिका स्पष्ट केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 26, 2026 | 01:48 PM
MLA Rohit Pawar Press Confernce Baramati marathi Live news update on VSR register a crime

MLA Rohit Pawar Press Confernce Baramati marathi Live news update on VSR register a crime

Follow Us
Close
Follow Us:
  • बारामतीमध्ये रोहित पवारांची पत्रकार परिषद
  • अजित पवारांच्या अपघातावरुन संशय
  • बारामती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी
Rohit Pawar Press Conference: बारामती : दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाला (Ajit Pawar Plane Crash) एक महिना पूर्ण होत आला आहे. मात्र हा अपघात एक घातपात असल्याची शक्यता आमदार रोहित पवार व्यक्त करत आहेत. यासाठी त्यांनी अनेक पत्रकार परिषद घेत संपूर्ण तपासाची मागणी केली आहे. यानंतर रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र फक्त एफआयआर दाखल करुन घेत असून यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप रोहित पवारांनी (Rohit Pawar) केला आहे. कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे देखील रोहित पवार म्हणाले आहेत.

आमदार रोहित पवार हे राजेंद्र पवार, युगेंद्र पवार आणि वकीलांसह बारामती पोलीस ठाण्यामध्ये गेले होते. जीसीए, व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. मात्र , तेथे पोलिसांनी एफआयर नोंदवण्यास नकार दिला. यानंतर त्यांनी बारामती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र याठिकाणी देखील रोहित पवार आणि पोलिसांची शाब्दिक चकमक झाली.

हे देखील वाचा : बारामतीमध्ये रोहित पवारांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक; जीसीए, व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल नाहीच

यानंतर पत्रकार परिषद घेत रोहित पवार म्हणाले की, “अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला न्याय का मिळत नाही? त्यांच्या मृत्यूनंतर देखील विमान कंपनीला का वाचवले जात आहे. अजित दादा हे तर महाराष्ट्राचे एवढे मोठे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री होते, मग त्यांच्या सारख्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यावरही एफआयआर का घेतला जात नाही? त्यांना न्याय का मिळत नाही ? त्यांच्या मृत्यूला महिना होत आलाय, तरी इतक्या दिवसात काहीच का झालं नाही ?” असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले आहेत.

VIDEO | Baramati: During a press conference, NCP(SP) MLA Rohit Pawar (@RRPSpeaks) says, “The DGCA has acknowledged non-compliance by the VSR company in the Learjet 45XR case. I questioned why, if the remaining aircraft were grounded, a faulty aircraft was given to Ajit Dada. We… pic.twitter.com/kgfOhpuyJa — Press Trust of India (@PTI_News) February 26, 2026

दादांच्या बाबत एफआयआर घेतला जात नाही

पुढे रोहित पवार म्हणाले की, “पोलीस एफआयआर करण्यास नकार देत होते. त्यांचं म्हणणं की अॅक्सिडेंट रिपोर्ट झाला आहे. दादांचा आतापर्यंत अॅक्सिडेंट रिपोर्ट झाला. सीआयडी चौकशी करत आहे हे सांगितलं. पण अॅक्सिडेंट रिपोर्ट झाल्यावर क्रिमिनल अँगलने चौकशी का करत नाही. त्यानंतरही एफआयआर का घेत नाही. दादांच्या बाबत एफआयआर घेतला जात नाही. आम्ही तपास यंत्रणाच्या आड येत नाही. कुणीही चौकशी करावी. आमचं म्हणणं आहे की एफआयआर दाखल करा आणि तो सीआयडी किंवा सीबीआयला द्या, दादांच्या अपघाताच्या चौकशीसाठी त्यांच्या मोठ्या मित्राने तरी मदत करावी,’ अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

हे देखील वाचा : सोशल मीडिया किंग! पंतप्रधान मोदी ठरले 10 कोटी फॉलोवर्स असणारे जगातील एकमेव नेते

पुढे रोहित पवार म्हणाले की, “आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत नाही. आम्ही फक्त कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांवर काहीतरी दबाव असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांच्या डोळ्यात देखील पाणी आले. मात्र त्यांना दबावाखाली काम करावं लागत आहे. काल जसे पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव होता. तसाच इथे दबाव जाणवत होता. हे कार्यालय अजितदादांनी बांधलं आहे. त्यांनी पोलीस आणले. त्यामुळे चौकशीची मागणी करत आहोत. आता पोलीस म्हणतात आम्हाला एक तास द्या, आम्ही पोलिसांना सर्व पुस्तके वाचून दाखवली. नियम दाखवले. आता अधिकारी सकारात्मक दाखवायला लागले,” असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

Web Title: Mla rohit pawar press confernce baramati marathi live news update on vsr register a crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • baramati news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

बारामतीला एक न्याय आणि राहुरीला दुसरा? महाविकास आघाडीच्या ‘दुहेरी’ भूमिकेवर सुजय विखेंचा प्रहार
1

बारामतीला एक न्याय आणि राहुरीला दुसरा? महाविकास आघाडीच्या ‘दुहेरी’ भूमिकेवर सुजय विखेंचा प्रहार

बारामती एमआयडीसी परिसरात चोरीच्या घटना; अल्पवयीन मुलांसह भंगार व्यावसायिक अटकेत
2

बारामती एमआयडीसी परिसरात चोरीच्या घटना; अल्पवयीन मुलांसह भंगार व्यावसायिक अटकेत

Maharashtra Politics : बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला; उमेदवारी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस
3

Maharashtra Politics : बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला; उमेदवारी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस

Baramati by election : “अजितदादाच ही निवडणूक लढवतायेत असं…; सुनेत्रा काकींसाठी रोहित पवारांची भावनिक साद
4

Baramati by election : “अजितदादाच ही निवडणूक लढवतायेत असं…; सुनेत्रा काकींसाठी रोहित पवारांची भावनिक साद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.