पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंस्टाग्रामवर 10 कोटी फॉलोवर्स पार करणारे पहिले जागतिक नेते ठरले आहे (फोटो - सोशल मीडिया)
डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाढता दबदबा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा कारभार स्वीकारल्यानंतर 2014मध्ये इंस्टाग्राम वापरण्यास सुरुवात केली. मागील 12 वर्षांपासून ते सोशल मीडियावर असून अनेक दिग्गज नेते, लोकप्रिय व्यक्ती, खेळाडू हे मोदींना फॉलो करत आहेत. जागतिक नेत्यांमध्ये सध्या ते सर्वात सक्रिय आणि सर्वाधिक फॉलोअर्स असलेले बनले आहेत. त्यांचा डिजिटल प्लॅटफॉर्मवरील वापर सातत्याने वाढत आहे, यामधून भारत आणि परदेशातील लोकांशी जोडण्याच्या त्यांच्या धोरणाचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून येते.
हे देखील वाचा : ब्रिटीशकालीन खुणा पुसल्या! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’
जागतिक नेत्यांमध्ये एक नेता
इंस्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत पंतप्रधान मोदी इतर जागतिक नेत्यांपेक्षा खूप पुढे आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ४.३२ कोटी फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांचे १.५ कोटी फॉलोअर्स, ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांचे १.४ कोटी, तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांचे १.१६ कोटी आणि अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मेली यांचे ६.४ कोटी फॉलोअर्स आहेत.
इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही मजबूत पकड
पंतप्रधान मोदी यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर १०.६ कोटी फॉलोअर्स आहेत, तर फेसबुकवर त्यांचे ५.४ कोटी फॉलोअर्स आहेत. हे आकडे त्यांची विस्तृत जागतिक पोहोच आणि मजबूत जनसंपर्क दाखवून देत आहे. त्याचबरोबर ट्वीटरवर 10.62 कोटी फॉलोवर्स आहेत.
हे देखील वाचा : केरळनंतर आता ‘या’ राज्याचे बदलणार नाव? भाजप खासदाराने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना लिहिले पत्र
देशातील जवळपास सर्वच खासदार, आमदार आणि लोकप्रिय नेते हे सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत आहे. कमी वेळेमध्ये जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरले आहे. या माध्यमातून आपला नेता रोज कुठे आहे. कोणाची भेट घेत आहे आणि काय विकासकाम करत आहे हे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे लोकांचा आणि नेत्यांचा संपर्क देखील एकप्रकारे वाढतो. त्याचबरोबर प्रचारासाठी देखील सोशल मीडियाचा वापर जोरदार वाढला आहे. पंतप्रधान मोदी हे इंस्टाग्रामवर इतर भारतीय नेत्यांपेक्षा खूपच जास्त आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांचे फॉलोअर्स अंदाजे १.६१ कोटी आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे फॉलोअर्स अंदाजे १.२६ कोटी कोटी आहेत.






