दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणवरुन शरद पवार आणि सीएम देवेंद्र फडणवीस वाद निर्माण झाला (फोटो - टीम नवराष्ट्र)
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यापूर्वीच नियतीने डाव खेळला अशी चर्चा सुरु होती. याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी दुजोरा दिला. तसेच शरद पवारांनी देखील याच्या समर्थनार्थ वक्तव्य केले. अजितदादा यांच्या राष्ट्रवादीशी विलीनिकरणाची चर्चा सुरू होती. 12 फेब्रुवारी रोजी अजितदादा याविषयीची घोषणा करणार होते असे यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले होते. यावरुन मोठा वाद निर्माण झाला असून यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
हे देखील वाचा : मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट अखेर हटवली; वाय. खेमचंद सिंह असणार राज्याचे नवे मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनकरणावर प्रतिक्रिया देत मी काही आता बोलत नाहीये ही ती वेळ नाही असे वक्तव्य केले. फडणवीस म्हणाले की, सध्याची परिस्थिती अशी आहे त्यामुळे आम्हाला राजकारण करायचं नाही. अन्यथा मी अनेक गोष्टी सांगू शकतो. मला सगळं माहिती आहे. मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की, अजितदादा आणि माझे जे संबंध होते त्यामुळे ते सगळ्या गोष्टी मला शेअर करायचे.त्यांनी अशी काही तारीख ठरली असती तर मला सांगितलंच असतं. कारण ते आमच्या सरकारमध्ये सुद्धा होते. त्यामुळे मला वाटतं की खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही. अजित पवार हे जर अशा प्रकारची कोणत्याही विलीनिकरणाची चर्चा करत असते तर ती भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित करत प्रतिक्रिया दिली आहे.
हे देखील वाचा : सुनेत्रा पवार यांच्याकडेच असतील राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे; येत्या 9 फेब्रुवारीला…
यावरुन शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांचा खरपूस समाचार घेतला. देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा शरद पवारांनी खरपूस समाचार घेतला आहे. शरद पवार म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनिकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असे शरद पवार म्हणाले. जयंत पाटील आणि अजित पवार हे यावर चर्चा करत होते, असे त्यांनी पुन्हा नमूद केले. त्यामुळे राष्ट्रवादी विलीनिकरणाच्या चर्चा सुरू होती असं शरद पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.






