Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hotel Politics : राजकीय पळवापळवी अन् सहकाऱ्यांवरचा अविश्वास! हॉटेल पॉलिटिक्सवरुन अमित ठाकरेंनी शिंदे गटाला फटकारलं

मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन एकनाथ शिेंदेंवर निशाणा साधला आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याने टीका केली.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 20, 2026 | 12:51 PM
MNS Amit Thackeray facebook post on hotel politics target eknath shinde bmc mayor

MNS Amit Thackeray facebook post on hotel politics target eknath shinde bmc mayor

Follow Us
Close
Follow Us:
  • शिंदे गटाने निवडून आलेले नगरसेवक ठेवले हॉटेलमध्ये
  • हॉटेल पॉलिटिक्सवरुन अमित ठाकरेंनी साधला निशाणा
  • अमित ठाकरेंची सोशल मीडिया पोस्ट
Amit Thackeray Facebook post : मुंबई : राज्यामध्ये महापालिका निवडणूका पार पडल्या असून महापौर पदावरुन राजकारण रंगले आहे. अधिकाधिक महापालिकांमध्ये (BMC Election 2026) भाजपचा विजयी झेंडा फडकला आहे. सर्वात जास्त चर्चेत असलेल्या मुंबई महापालिकेवर देखील बहुमत मिळवण्यास महायुतीला यश आले आहे. मात्र यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय डाव टाकला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अडीच वर्षांच्या महापौर पदाची मागणी केल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबरए एकनाथ शिंदेंचे मुंबईतून निवडून आलेल्या नगरसेवकांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

महापालिका निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यात हॉटेल पॉलिटिक्स सुरु झाले आहे. विजयी झालेल्या नगरसेवकांना निकाल लागल्यापासून एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. कोणत्याही नगरसेवकांने इतरांशी चर्चा करु नये म्हणून शिंदेंनी सावधगिरीने हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंनी मुंबई पालिकेमध्ये सत्तास्थापन करण्यापूर्वी अटी घातल्या आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याच परिस्थितीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन जोरदार टीकास्त्र डागले आहे.

हे देखील वाचा : राज्यात महापालिका निवडणुका संपल्या; आता महापौरपदासाठी तयारी सुरु, ‘हा’ बडा नेता घेणार अंतिम निर्णय…

मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत?
निकाल लागल्यावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते, लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती. पण दुर्दैवाने, ज्यांना जनतेने निवडून दिलंय, ते आज फाईव्ह स्टार हॉटेलच्या बंद दाराआड ‘आनंदाने’ कैद आहेत,” असा टोला अमित ठाकरेंनी लगावला आहे.

हे देखील वाचा : वडगाव मावळमध्ये अनोखा अंदाज; एकूण 15 जागांवर ‘मविआ’ म्हणून ‘हे’ पक्ष लढणार

पुढे त्यांनी लिहिले आहे की,  “याला नक्की कारण काय? स्वतःच्याच सहकाऱ्यांवरचा अविश्वास? स्वार्थी राजकारण? या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केले त्यांचा अपमान नाही का होतं? किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचे राजकारण? या सगळ्या नाटकामध्ये ज्या पर्यटकांनी स्वतःचे कष्टाचे पैसे भरून हॉटेल बुकिंग केलं आहे, त्यांनाही सुरक्षेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागतोय. लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आता तरी थांबवा! ‘जमल्यास’… ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवलाय तिच्यासाठी काहीतरी करा,” अशी मागणी अमित ठाकरे यांनी करत शिंदेसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.

Web Title: Mns amit thackeray facebook post on hotel politics target eknath shinde bmc mayor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • amit thackeray
  • BMC Election 2026
  • BMC Mayor
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘शिंदे वज्रमूठ’ की महायुतीत नवा भूकंप? साताऱ्यात शिंदे गटाचा भव्य मेळावा
1

Maharashtra Politics: ‘शिंदे वज्रमूठ’ की महायुतीत नवा भूकंप? साताऱ्यात शिंदे गटाचा भव्य मेळावा

Thane News : आरोग्यसेवेत मोठी झेप, 900 बेड्स आणि 18 ऑपरेशन थिएटर्स मल्टी स्पेशासलिस्ट हॉस्पीटल लवकर सेवेत होणार रुजू
2

Thane News : आरोग्यसेवेत मोठी झेप, 900 बेड्स आणि 18 ऑपरेशन थिएटर्स मल्टी स्पेशासलिस्ट हॉस्पीटल लवकर सेवेत होणार रुजू

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब! साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ; मेळाव्याआधीच संघटनेत भगदाड
3

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब! साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ; मेळाव्याआधीच संघटनेत भगदाड

Anjali Damania : अशोक खरातची भेट? एकनाथ शिंदे, जयंत पाटील…न संपणारी बड्या नेत्यांची यादी; अंजली दमानिया यांचा गौप्यस्फोट
4

Anjali Damania : अशोक खरातची भेट? एकनाथ शिंदे, जयंत पाटील…न संपणारी बड्या नेत्यांची यादी; अंजली दमानिया यांचा गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.