पोटावर फुग्यासारखी लटकलेली चरबी कमी करण्यासाठी नियमित करा 'या' पदार्थांचे सेवन
वजन कमी करण्यासाठी उपाय?
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काय खावे?
लठ्ठपणा वाढण्याची कारणे?
जगभरात लठ्ठपणामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. लठ्ठपणा वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, पोटावर चरबीचा थर वाढणे, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक गंभीर आजारांची शरीराला लागण होते. धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत काम, जंक फूडचे अतिसेवन, तिखट तेलकट पदार्थ, अपुरी झोप आणि वारंवार बिघडलेली पचनक्रिया आजारांचे मुख्य कारण आहे. पोटावर वाढलेले फॅट कमी करण्यासाठी चयापचय क्रियेत अनेक अडथळे निर्माण होतात. ज्यावेळी शरीरात ‘इन्सुलिन रेसिस्टन्स’ वाढते तेव्हा टाईप २ मधुमेह होण्याची शक्यता असते. अशावेळी आहारात बदल करणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यासाठी बऱ्याचदा महागडा डाएट सुद्धा घेतला जातो. पण याचा फारसा परिणाम शरीरावर दिसून येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा किंवा कॉफीचे सेवन करण्याऐवजी ग्रीन टी प्यावी. उपाशी पोटी ग्रीन टी प्यायल्यास शरीरावर वाढलेला अनावश्यक चरबीचा थर कमी होईल. ग्रीन टी मध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स केवळ वजन कमी न करता रक्तातील साखरेचे प्रमाण सुद्धा नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे नियमित सकाळ संध्याकाळ ग्रीन टी चे सेवन करावे. याशिवाय ग्रीन टी मध्ये लिंबू मिक्स करून प्यावा.
हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरते. नियमित एक हिरवी पालेभाजी खावी. पालक, मेथी, मुळा इत्यादी भाज्यांमध्ये असलेले फायबर आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकतात आणि शरीर स्वच्छ करतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर, सूक्ष्म पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणातबी आढळून येतात, ज्यामुळे शरीराच्या आतील अवयवांना आलेली सूज कमी होते. वजन कमी करताना कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. रक्तातील साखर नियंत्रणात राहिल्यास सतत भूक लागणार नाही.
पोटाभोवती वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ब्लूबेरीज खावे. यामध्ये असलेले अँथोसायनिन नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट शरीरातील दाह कमी करतो. नियमित वाटीभर कोणत्याही बेरीज खाल्ल्यास महिनाभरात वजन कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर सुद्धा चमकदार ग्लो येईल आणि तुम्ही सुंदर दिसाल. नियमित बेरीज खाल्ल्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत होते.
जेवणात फॅटी फिशचा समावेश करावा. माशांमध्ये असलेले प्रोटीन शरीराला भरपूर ऊर्जा देते. सॅल्मन, सार्डिन आणि मॅकरेल यांसारख्या फॅटी फिशमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असते. यामुळे शरीराच्या आतील अवयवाला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. रक्तातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी संतुलित ठेवण्यासाठी माशांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.






