Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Gas : “आपण हिंदुत्ववादी आहात ना… मग देवळांनातरी गॅस द्या; खासदार संजय राऊतांचे टीकास्त्र

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरुन सरकारवर निशाणा साधला. तसेच मंदिरांच्या अन्नछत्रांसाठी तरी गॅस द्यावा अशी मागणी केली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 17, 2026 | 12:16 PM
खासदार संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाले, 'भाजपच्या राजकारणाला एकच शब्द...'

खासदार संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाले, 'भाजपच्या राजकारणाला एकच शब्द...'

Follow Us
Close
Follow Us:
  • खासदार संजय राऊतांची पत्रकार परिषद
  • एलपीजी गॅस तुटवड्यावरुन सरकारवर टीका
  • निधी वाटपावरुन राज्य सरकारवर टीका
LPG Gas Shortage : मुंबई : आखाती देशांमध्ये युद्ध सुरु असून याचा फटका महाराष्ट्रातील सामान्य लोकांना फटका बसला आहे. एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून व्यावसायिक गॅस मिळणे कठीण झाले आहे. तर घरगुती गॅससाठी (LPG Gas) देखील मोठ्या रांगा लागल्या आहेत. यामुळे सामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. 40 वर्ष अखंड दोन वेळा भक्तांना जेवण दिले जाणारे अन्नछत्र एलपीजी गॅलच्या तुटवड्यामुळे बंद झाले आहेत. लोकांचे खायचे हाल होत आहेत, अशी टीका संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) केली.

खासदार संजय राऊतांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील गॅस तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, “सरकारवर एलपीजीच्या बाबतीत विश्वास ठेवू नका. कारण हे पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी किंवा लालबहाद्दूर शास्त्री यांचे सरकार नाही. गॅसचा तुटवडा राज्यभर आणि देशभर आहे. तरीही सरकार सांगत असेल की तुटवडा नाही तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. लोकांच्या गॅस एजन्सीबाहेर रांगा लागल्या आहेत. त्या रांगा काय AI ने बनवल्या आहेत का?” असा प्रश्न खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : Black Box सुरक्षित असतानाही जळाल्याचं का सांगितलं? रोहित पवारांचा संताप अनावर

पुढे ते म्हणाले की, “आज मुंबईमध्ये 40 टक्के रेस्टारंट बंद आहेत. मुंबईमध्ये शाळांच्या कटिंगमध्ये एलपीजी मिळत नाहीये. खाण्याच्या वडापावच्या वगैरे गाड्या असतात, त्याही 50 टक्के बंद आहेत. तुम्ही म्हणत आहात की, परिस्थिती चिंताजनक नाही, काही अडचणी नाही. तुम्ही खोटं बोलू नका. अनेक प्रमुख जे देवालय आहेत, काशी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ आहे. तिथे जे अन्नपूर्णा मंदिर आहे, तिथे गेले 40 वर्ष अखंड दोन वेळा भक्तांना जेवण दिले जाते. पण आता ते अन्नछत्र एलपीजी गॅलच्या तुटवड्यामुळे बंद झालेले आहे. शिर्डीमध्येही तशीच परिस्थिती आहे. दोन लाडू प्रसादाचे द्यायचे आता ते एकच देतात. आपण हिंदुत्ववादी आहात ना… मग निदान देवळांनातरी एलपीजी द्या,” अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी टीका केली.

हे देखील वाचा : आधार कार्ड होणार अधिक सुरक्षित, UIDAI ने सुरु केला खास प्रोग्राम! एक्स पोस्ट शेअर करत दिली माहिती

राज्य सरकारवर देखील त्यांनी हल्लाबोल केला. खासदार राऊत म्हणाले की, “मराठवाडा आणि विदर्भात जास्त मदत करणे आवश्यक आहे. मग तिथे विरोधी पक्षाचे आमदार का असेना तिथेही विकासनिधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. बॅकलॉग असणाऱ्या ठिकाणी मदत करणे गरजेचे आहे. सरकार अनैतिक पद्धतीने निधी वाटप करत आहे. ज्यावेळी तुम्ही अध्यक्षाच्या पदावर बसलेले असता त्यावेळी तुमच्याकरिता सर्व पक्ष एकसारखी असतात मग तो सरकार असलेला पक्ष देखील. विधासभेचे अध्यक्ष असतील किंवा लोकसभेचे अध्यक्ष ते पूर्णपणे राजनैतिक दृष्टिकोनातून काम करतात. विधानसभाध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्ष पदावरील व्यक्ती निष्षक्ष असावी,” अशी अपेक्षा खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली.

Web Title: Mp sanjay raut press conference on lpg gas shortage in maharashtra news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • LPG Gas
  • LPG gas cylinder
  • sanjay raut

संबंधित बातम्या

LPG सिलिंडरच्या किमती बदलल्या! तुमच्या खिशावर किती भार पडणार? पाहा आजचे ताजे दर
1

LPG सिलिंडरच्या किमती बदलल्या! तुमच्या खिशावर किती भार पडणार? पाहा आजचे ताजे दर

Sanjay Raut: पश्चिम बंगाल निकालावर संजय राऊतांचा मोठा दावा; “हा ममता बॅनर्जींचा नाही, लोकशाहीचा पराभव”
2

Sanjay Raut: पश्चिम बंगाल निकालावर संजय राऊतांचा मोठा दावा; “हा ममता बॅनर्जींचा नाही, लोकशाहीचा पराभव”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.