• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Bjp Navnath Ban Target Mp Sanjay Raut Marathi Political News

Maharashtra Politics : “राऊतांना ठाकरे गटात काडीचीही किंमत राहिलेली नाही…”; भाजप नेत्यांची खरमरीत टीका

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी निशाणा साधला आहे. अज्ञानी राऊत हीन राजकारण करून राष्ट्रीय हित आणि देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवत असल्याची टीका केली.

  • By प्रीति माने
Updated On: मार्च 05, 2026 | 02:23 PM
BJP Navnath Ban Target MP sanjay raut marathi political news

भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊतांवर टीका केली (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • खासदार संजय राऊतांवर भाजप नेत्यांची टीका
  • भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी निशाणा साधला
  • ठाकरे गटामध्ये त्यांना काडीची किंमत नसल्याचा दावा
मुंबई : राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले आहे. उमेदवारी मिळण्यासाठी राजकीय नेत्यांनी (Political News) हालचाली सुरु केल्या आहेत. आज उमेदवारी जाहीर करण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी निशाणा साधला आहे.

भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले की, “राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये कुरघोड्यांचे राजकारण शिगेला पोहोचल्याने मविआचे घोडे अडले आहे. मविआ मधील तिन्ही पक्ष आपापले घोडे दामटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरे यांचा शरद पवरांच्या उमेदवारीला विरोध असताना, धूर्त संजय राऊत शरद पवारांचे नाव सातत्याने पुढे करत आहेत. उबाठा गटाचे प्रवक्ते असूनही आपली खासदारकीची टर्म संपल्यानंतर खासदारकी शाबूत ठेवण्यासाठी उबाठा गटाच्या प्रियांका चतुर्वेदींना डावलून शरद पवारांचे नाव पुढे करण्याची धूर्त खेळी संजय राऊत खेळत आहेत,” अशी टीकेची झोड त्यांनी उठवली.

हे देखील वाचा : प्रसिद्ध ‘रामेश्वरम कॅफे’ला PMC चा दणका; अतिक्रमण केलेल्या जागेची तोडफोड

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मात्र उबाठा गटाच्या उमेदवारीबद्दल राऊतांच्या शब्दांना काडीचीही किंमत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी बन म्हणाले की, “राऊत आणि उबाठा गट हे वारंवार माती खात असल्यानेच मतदारांनी विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अशा लागोपाठच्या निवडणुकांमध्ये त्यांना घरी बसवले आहे. परराष्ट्र धोरणासंदर्भात अज्ञानी राऊत हीन राजकारण करून राष्ट्रीय हित आणि देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवत असून त्यांनी संवेदनशील अशा परराष्ट्रविषयक मुद्द्यांमध्ये नाक खुपसू नये असा इशारा बन यांनी दिला.

हे देखील वाचा : बिहारच्या राजकारणात भूकंप! नीतीश कुमार दिल्लीला गेल्यानंतर कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची धुरा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी आणि ठाम नेतृत्वाखाली राष्ट्रीय हित, सामरिक संतुलन आणि जागतिक स्थैर्य या मुद्द्यांना प्राधान्य देत वेळोवेळी उभय देशांतील संवादाच्या बळावर आज भारत जागतिक स्तरावर स्वाभिमानाने उभा असल्याचेही त्यांनी नमूद केले. जागतिक स्तरावरील युद्धजन्य स्थितीला एपस्टीन फाईल्सशी जोडणे हे केवळ राऊतांचे कल्पनारंजन आहे. त्यांची कल्पकशक्ती सुमार दर्जाची असून बौद्धिक दिवाळखोरीचे त्यातून दर्शन घडते असा घणाघात बन यांनी केला.

Web Title: Bjp navnath ban target mp sanjay raut marathi political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: मार्च 05, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • BJP Politics
  • political news
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात भूकंप! नीतीश कुमार दिल्लीला गेल्यानंतर कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची धुरा?
1

Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात भूकंप! नीतीश कुमार दिल्लीला गेल्यानंतर कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची धुरा?

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत
2

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Vinod Tawade Rajyasabha : विनोद तावडेंना मिळालं प्रामाणिक पणाचं गिफ्ट! राज्यसभेवर संधी मिळताच व्यक्त केल्या भावना
3

Vinod Tawade Rajyasabha : विनोद तावडेंना मिळालं प्रामाणिक पणाचं गिफ्ट! राज्यसभेवर संधी मिळताच व्यक्त केल्या भावना

Israel-Iran War : Epstein Filesवरुन लक्ष वळवण्यासाठी हे विनाशकारी युद्ध; खासदारांचा मोठा दावा, चर्चांना उधाण
4

Israel-Iran War : Epstein Filesवरुन लक्ष वळवण्यासाठी हे विनाशकारी युद्ध; खासदारांचा मोठा दावा, चर्चांना उधाण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics : “राऊतांना ठाकरे गटात काडीचीही किंमत राहिलेली नाही…”; भाजप नेत्यांची खरमरीत टीका

Maharashtra Politics : “राऊतांना ठाकरे गटात काडीचीही किंमत राहिलेली नाही…”; भाजप नेत्यांची खरमरीत टीका

Mar 05, 2026 | 02:23 PM
Israel Iran War चा मोठा फटका; सीएनजी, पेट्रोल अन् डिझेल संपण्याच्या भीतीने रत्नागिरीत थेट…

Israel Iran War चा मोठा फटका; सीएनजी, पेट्रोल अन् डिझेल संपण्याच्या भीतीने रत्नागिरीत थेट…

Mar 05, 2026 | 02:23 PM
2 लाख गुंतवा अन् मिळवा 90,000 चा नफा, कमी गुंतवणूक अधिक नफा, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना

2 लाख गुंतवा अन् मिळवा 90,000 चा नफा, कमी गुंतवणूक अधिक नफा, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना

Mar 05, 2026 | 02:13 PM
Iran Vs USA : कतारमधील अल-उदेद तळ हादरला! 1. अब्ज डॉलर्सच्या ‘THAAD’ रडारची धूळधाण; अमेरिकेचा थयथयाट

Iran Vs USA : कतारमधील अल-उदेद तळ हादरला! 1. अब्ज डॉलर्सच्या ‘THAAD’ रडारची धूळधाण; अमेरिकेचा थयथयाट

Mar 05, 2026 | 02:04 PM
‘नागबंधम’ चित्रपटामधील ‘नमो रे’ गाण्याची घोषणा; १००० डान्सर्स साकारणार भगवान नारायणांच्या भक्तीचे भव्य दृश्य

‘नागबंधम’ चित्रपटामधील ‘नमो रे’ गाण्याची घोषणा; १००० डान्सर्स साकारणार भगवान नारायणांच्या भक्तीचे भव्य दृश्य

Mar 05, 2026 | 02:04 PM
Bangalore crime: बंगळुरूमध्ये हुंड्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरचा छळ; महिलेने उचलले टोकाचे पाऊल

Bangalore crime: बंगळुरूमध्ये हुंड्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरचा छळ; महिलेने उचलले टोकाचे पाऊल

Mar 05, 2026 | 02:02 PM
Karjat News : ठेकेदारांची मुजोरी; रस्त्याच्या कामाकडे प्रशासानाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आरोप

Karjat News : ठेकेदारांची मुजोरी; रस्त्याच्या कामाकडे प्रशासानाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आरोप

Mar 05, 2026 | 02:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.