Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harshwardhan Sapkal: विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी काँग्रेसची मोठी घोषणा, हर्षवर्धन सपकाळांनी जाहीर केली भूमिका

शिवसेना ठाकरे गटाने अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्याकडून झालेल्या मनधरणीला यश आले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 30, 2026 | 03:23 PM
विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी काँग्रेसची मोठी घोषणा (Photo Credit- X)

विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी काँग्रेसची मोठी घोषणा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी काँग्रेसची मोठी घोषणा
  • हर्षवर्धन सपकाळांनी जाहीर केली भूमिका
  • संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
Vidhan Parishad Election 2026 News: विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत निर्माण झालेला जागावाटपाचा पेच अखेर सुटला आहे. शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे यांच्या उमेदवारीवरून नाराज असलेल्या काँग्रेसने अखेर माघार घेतली असून, आपला स्वतंत्र उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली.

काँग्रेसची ‘तलवार म्यान’; अंबादास दानवेंना पाठिंबा

शिवसेना ठाकरे गटाने अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्याकडून झालेल्या मनधरणीला यश आले आहे. “उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाला आम्ही समर्थन देत आहोत आणि काँग्रेस या निवडणुकीत आपला उमेदवार देणार नाही,” असे हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले. यामुळे आता अंबादास दानवे यांचा मार्ग सुकर झाला आहे.

“चर्चा करायला हवी होती…”

उमेदवारीला पाठिंबा दिला असला तरी, काँग्रेसने आपली नाराजी मात्र बोलून दाखवली आहे. “उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेसाठी उमेदवार घोषित करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करायला हवी होती,” अशा शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी मित्रपक्षाला सुनावले. सुरुवातीला काँग्रेसने स्वतःचा उमेदवार देण्याचे संकेत दिले होते, मात्र आघाडीची एकजूट टिकवण्यासाठी काँग्रेसने एक पाऊल मागे घेतल्याचे दिसत आहे.

वादाची पार्श्वभूमी काय होती?

काँग्रेसने यापूर्वी स्पष्ट केले होते की, जर स्वतः उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार असतील तरच त्यांना पाठिंबा दिला जाईल. मात्र, ऐनवेळी अंबादास दानवे यांचे नाव समोर आल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा दावा केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती.

मोठी बातमी ! बच्चू कडू करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; आता ‘प्रहार’चे काय होणार?

संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार, आज ३० एप्रिल २०२६ हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. यानंतर, २ मे रोजी अर्जांची छाननी केली जाईल आणि उमेदवारांना ४ मे पर्यंत आपली उमेदवारी मागे घेण्याची मुदत असेल. जर आवश्यकता भासली, तर १२ मे रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५:०० वाजता मतमोजणी सुरू होईल.

महायुती आणि महाविकास आघाडीची भूमिका

विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता, महायुतीला (ज्यामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे) वरचढ स्थान असल्याचे दिसून येते. भाजपने आपल्या कोट्यातून सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत; यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक आणि प्रज्ञा सातव यांसारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करण्यासाठी झीशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने अंबादास दानवे यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले आहे. तर, शिवसेना शिंदे गटाकडून निलम गोऱ्हे आणि बचू कडू यांचा नावांचा सामावेश आहे.

पश्चिम बंगालनंतर आता भाजपची नजर ‘या’ सात राज्यांवर; निवडणुकीची मोर्चेबांधणी केली सुरु

Web Title: Mva mlc election congress supports ambadas danve harshvardhan sapkal announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Congress
  • Harshwardhan Sapkal
  • Shivsena UBT
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल
1

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
2

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.