मोठी बातमी! शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली, छातीत संसर्ग अन्...; रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल
महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मात्र, त्यांच्या घरी परतताच राजकीय भेटीगाठींना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील बड्या नेत्यांसह अजित पवार गटातील पार्थ पवारही भेटीसाठी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. (NCP Merger)
आधीच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांची राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाबाबत भाष्य केल्यानंतर या चर्चाना अजूनच जोर आला. तसेच, प्रफुल्ल पटेल यांनीदेखील शरद पवारांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतल्यामुळेदेखील याबाबत बोलले जात होते.
आता दोन्ही राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यांनी सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नवा भूकंप होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शरद पवार सिल्व्हर ओकवर पोहोचल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या भेटीसाठी धाव घेतली. यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे.
या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा आधीपासूनच चर्चेत असल्याने या भेटींकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जात आहे.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पार्थ पवारही सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.
पार्थ पवारांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. मात्र, या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान 10 तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करण्याचा उल्लेख झाल्याने विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली.
त्यातच सुनील तटकरे यांनी अजित पवार हयात असते तर 12 फेब्रुवारी रोजीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण झालं असतं, असं विधान केलं होतं.
आता पार्थ पवारांच्या सिल्व्हर ओकवरील भेटीमुळे या चर्चांना आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दिशेने काही हालचाली सुरू आहेत का, याचं उत्तर आगामी घडामोडींमधूनच स्पष्ट होणार आहे.
Ans: शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते मुंबईतील त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले.
Ans: जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि शशिकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. पार्थ पवारही भेटीसाठी दाखल झाल्याची माहिती आहे.
Ans: अजित पवार हयात असते तर 12 फेब्रुवारी रोजीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं विलीनीकरण झालं असतं, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं.






