Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Politics: राष्ट्रवादीत नव्या चाणक्याची एन्ट्री ? सुनेत्रा आणि पार्थ पवारांनी घेतली गुप्त भेट

Prashant Kishor : निवडणूक सल्लागार आणि ज्येष्ठ नेते प्रशांत किशोर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नवे रणनीतीकार म्हणून काम पाहणार आहेत. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत झालेल्या गुप्त बैठकीत नेमका काय निर्णय झाला आणि १ जूनपासून 'पीके'ची कंपनी कोणती नवी खेळी खेळणार? हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे

  • By anuradha sagar
Updated On: May 19, 2026 | 01:28 PM
Prashant Kishor NCP Strategist, Ajit Pawar Political Strategist

Prashant Kishor NCP Strategist, Ajit Pawar Political Strategist

Follow Us
Follow Us:
  • प्रशांत किशोर  हे देशातील प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार
  • सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवारांनी घेतली प्रशांत किशोरांची भेट
  • २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार मोहिमेची यशस्वी रणनीती
 

Prashant Kishor NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत मतभेद सुरू असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या गोटातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आज (१९ मे) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांनी राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीनंतर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. प्रशांत किशोर यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे रणनीतीकार म्हणून काम पाहणार आहेत. (Prashant Kishor Strategist Of NCP)

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून प्रशांत किशोर यांची कंपनी कामाला सुरुवात करणार आहे. येत्या १जून पासून प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे रणनीतीकार म्हणून काम पाहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिलाली आहे. प्रशांत किशोर हे निवडणूक रणनीतीकार आणि चाणक्य ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी अनेक पक्षांचे निवडणूक रणनीतीकार म्हणून काम पाहिले आहेत. यापुढील ३ वर्षे ते राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे 2029च्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आतापासूनच तयारी सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेचा लाभ अचानक बंद का झाला? पात्र असूनही खात्यात पैसे न आल्याने महिलांचा संताप!

प्रशांत किशोर कोण आहेत?; अजित पवारांच्या ‘गुलाबी कॅम्पेनिंग’मागचे मास्टरमाइंड कोण?

प्रशांत किशोर  हे देशातील प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार (Political Strategist) म्हणून ओळखले जातात. राजकीय वर्तुळात त्यांना ‘पीके’ (PK) या नावानेही संबोधले जाते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार मोहिमेची यशस्वी रणनीती आखल्यानंतर प्रशांत किशोर देशभरात चर्चेत आले होते.

यानंतर त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासह विविध प्रादेशिक पक्षांसाठी निवडणूक रणनीती आखली. तसेच पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जनगमोहन रेड्डी यांच्या YSR काँग्रेस पार्टीसाठी, याशिवाय तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या द्रविड मुनेत्र कळघम आणि आम आदमी पार्टी यांसारख्या अनेक पक्षांसाठीही त्यांनी यशस्वी प्रचार मोहिमा राबवल्या आहेत.

राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी सुमारे आठ वर्षे संयुक्त राष्ट्रांसोबत ( United Nations) सोबत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम केले होते. त्यानंतर त्यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून स्वतंत्र कारकीर्द सुरू केली.

ठाकरे गटाचा खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का?

अजित पवारांसाठी ‘गुलाबी कॅम्पेनिंग’

दरम्यान, राजकीय प्रचार आणि ब्रँडिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘डिझाईन बॉक्स’ने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी देखील ही विशेष प्रचार मोहिम राबवली होती. डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा हे पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट क्षेत्रातील महत्त्वाचे नाव मानले जाते. राजस्थान, कर्नाटकसह विविध राज्यांमध्ये त्यांनी काँग्रेससाठी प्रचार मोहिमांचे नियोजन केले आहे. राजकीय ब्रँडिंग, संदेश व्यवस्थापन आणि इमेज मेकओव्हरमध्ये त्यांचा विशेष हातखंडा मानला जातो.

लोकसभा निवडणुकीतील धक्क्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाची प्रतिमा नव्याने उभी करण्याची जबाबदारी नरेश अरोरा आणि त्यांच्या टीमने स्वीकारली होती. राज्य सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर केल्यानंतर अजित पवार गुलाबी जॅकेटमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसू लागले होते. हीच ‘गुलाबी कॅम्पेनिंग’ रणनीती नरेश अरोरा यांनी तयार केल्याची चर्चा होती. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाल्याचे पाहायला मिळाले.

 

Web Title: Ncp politics prashant kishor to turn ncp strategist meets sunetra pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • parth pawar
  • Prashant kishor
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक
1

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक

सोमेश्वर कारखाना कोणा एकाची प्रॉपर्टी नाही, अजितदादांचा फोटो का वापरता? सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
2

सोमेश्वर कारखाना कोणा एकाची प्रॉपर्टी नाही, अजितदादांचा फोटो का वापरता? सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!
3

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!

Graduate Election : मुख्यमंत्री फडणवीस-शरद लाड भेटीने पुणे पदवीधरची चर्चा तापली!
4

Graduate Election : मुख्यमंत्री फडणवीस-शरद लाड भेटीने पुणे पदवीधरची चर्चा तापली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.