Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Tiger : ऑपरेशन टायगर यशस्वी; सहा खासदारांच्या फोडाफोडीत फडणवीसांची शिष्टाई ठरली निर्णायक

‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांना शिंदे यांच्या शिवसेनेत आणण्यासाठी फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाशी समन्वय साधत एका खासदाराच्या राजकीय भवितव्याची जबाबदारी घेण्याचा शब्द दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 25, 2026 | 06:53 PM
ऑपरेशन टायगर यशस्वी; सहा खासदारांच्या फोडाफोडीत फडणवीसांची शिष्टाई ठरली निर्णायक

ऑपरेशन टायगर यशस्वी; सहा खासदारांच्या फोडाफोडीत फडणवीसांची शिष्टाई ठरली निर्णायक

Follow Us
Follow Us:
  • सहाव्या खासदाराला फोडण्यात महत्त्वाची भूमिका
  • ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत मुख्यमंत्र्यांची शिष्टाई
  • सहा खासदारांनी दिला ठाकरे गटाला दणका
 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून, शिवसेना (ठाकरे गट) आणि महायुतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातील काही खासदारांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

राज्यात शिवसेना (ठाकरे गट) खासदार फोडफोडीचे राजकारण रंगात आले असताना पूर्णपणे मौन बाळगून असलेल्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सूचक विधान करत धक्का दिला होता. ऑपरेशन यशस्वी झाले आहे आणि रुग्ण एकदम सुदृढ आहे, त्यामुळे कोणीही काळजी करण्याची गरज नाही, असे म्हणत मुख्यमंत्री प्रथमच या सर्व घडामोडींवर उघडपणे व्यक्त झाले होते. कारण ऑपरेशन टायगरचे तर ठरले होते. परंतु त्यांना भाजपमध्ये घ्यायचे की शिवसेनेत हेच ठरत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याबाबत मौन बाळगले होते.

Shrikant Shinde : ‘ऑपरेशन टायगर’चे मास्टरमाइंड डॉ. श्रीकांत शिंदे? उबाठाला खिंडार पाडण्यात रणनीती ठरली निर्णायक

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना सुरुवात झाली होती. जानेवारी २०२६ पासून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या विषयावर गांभीर्याने विचार सुरू केल्याचे सांगितले जाते. या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अनेकदा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली.

सुरुवातीला संबंधित खासदारांना थेट भाजपमध्ये घ्यायचे की शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश द्यायचा, यावरून महायुतीत बराच काळ संभ्रम होता. सूत्रांच्या माहितीनुसार, काही खासदारांची भाजपमध्ये जाण्याची इच्छा असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शिंदे यांच्या शिवसेनेतच सामील करून घेण्याची भूमिका घेतली. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय नेतृत्वाशीही चर्चा केल्याचे सांगितले जाते.

एप्रिलमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या मोहिमेसाठी एकनाथ शिंदे यांना हिरवा कंदील दिल्यानंतर हालचालींना वेग आला. सुरुवातीला पाच खासदारांना आपल्या बाजूला वळविण्यात यश आले. मात्र, संख्याबळ वाढविण्यासाठी आणखी एका खासदाराची आवश्यकता असल्याने ही जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

राजकीय कारकिर्दीची जबाबदारी

यानंतर फडणवीस यांनी संबंधित सहाव्या खासदाराशी संपर्क साधून त्याचे मन वळविले. त्याच्या राजकीय भवितव्याची जबाबदारी घेण्याचा शब्द दिल्यानंतर हा तिढा सुटला, अशी माहिती समोर येत आहे.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात या घडामोडींना वेग आला आणि ‘ऑपरेशन टायगर’ पूर्णत्वाला गेले. त्यानंतर सहा खासदारांनी दिल्ली गाठून लोकसभा अध्यक्षांकडे पत्र सादर केल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर संबंधित पक्षांकडून अधिकृत भूमिका आणि पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘ऑपरेशन टायगर फत्ते; चौकार नाही, थेट षटकार, २०२९ साली सहाच्या सहा खासदार पुन्हा निवडून येणार,’ एकनाथ शिंदेंची ग्वाही

Web Title: Operation tiger success devendra fadnavis key role in shiv sena thackeray group mp defection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 06:53 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Operation Tiger
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
1

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
2

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
3

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?
4

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.