Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Political News : “हे परराष्ट्र धोरणाचे अपयश..! गॅस तुटवड्यावरुन विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा

देशामध्ये गॅसचा पुरवठ्यामध्ये कमतरता जाणवत असल्यामुळे सरकारने घरगुती गॅस खरेदीवर काही नियम घातले आहेत. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 10, 2026 | 03:07 PM
Opposition leaders Rahul Gandhi and Arvind Kejriwal criticize Modi government over gas shortage

Opposition leaders Rahul Gandhi and Arvind Kejriwal criticize Modi government over gas shortage

Follow Us
Follow Us:
  • तेलाच्या आणि गॅसच्या किंमतीमध्ये वाढ
  • गॅस तुटवडा सुरु असल्यामुळे केंद्र सरकारकडून उपाययोजना
  • विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे
Political News : दिल्ली : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे (iran israel war) तेलाच्या आणि गॅसच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे भारतामध्ये देखील गॅसचा तुटवडा भासत आहे. यामुळे केंद्र सरकारकडून तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. देशामध्ये ESMA म्हणजे आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम कायदा लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस (LPG Gas) खरेदीबाबत काही नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. मात्र युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतावर आलेल्या संकटावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

देशामध्ये गॅसचा पुरवठ्यामध्ये कमतरता जाणवत असल्यामुळे सरकारने घरगुती गॅस खरेदीवर काही नियम घातले आहेत. त्याचबरोबर संपूर्ण देशामध्ये ESMA कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा फटका सामान्य माणसांच्या घरामध्ये जाणवत असल्यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे परराष्ट्रीय धोरणाचे अपयश असल्याचे देखील विरोधकांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : गॅसच्या तुटवड्यावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; संपूर्ण देशात ESMA कायदा लागू

आप नेते अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. केजरीवाल यांनी लिहिले आहे की, देशभरात, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालये वगळता सर्व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी गॅस पुरवठा खंडित करण्यात आला आहे. फक्त घरगुती वापरासाठी गॅस पुरवला जाईल. येत्या काळात गॅस आणि तेलाची परिस्थिती आणखी बिकट होण्याची अपेक्षा आहे. काही मजबुरींमुळे मोदी ट्रम्पसमोर झुकत आहेत. त्याचे परिणाम आज देश भोगत आहे का? असा सवाल आप नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.

देश भर में, शैक्षणिक संस्थानों और अस्पतालों को छोड़कर, बाक़ी सभी कमर्शियल संस्थानों को LPG गैस की सप्लाई बंद कर दी गई है। केवल घरेलू उपयोग के लिए गैस दी जाएगी। आने वाले दिनों में गैस और तेल की स्थिति और खराब होने के आसार हैं। मोदी जी अपनी किन्हीं मजबूरियों के चलते ट्रम्प के… https://t.co/eBsdwpPKTc — Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 10, 2026

त्याचबरोबर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील या गॅसच्या तुटवड्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचे गंभीर नुकसान होत आहे, परंतु आपल्या तडजोड केलेल्या पंतप्रधानांकडे त्यावर चर्चा करण्याचे धाडस नाही. शेअर बाजार घसरत आहे, एलपीजीच्या किमती वाढत आहेत आणि जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचत आहेत – या सर्वांचा थेट परिणाम सामान्य माणूस, घरगुती बजेट आणि लघु आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांवर होत आहे. पंतप्रधान मोदींना ब्लॅकमेल केले जात आहे. त्यांच्याकडे भारतीय जनतेचे हित विकण्याशिवाय पर्याय नाही. माझे शब्द लक्षात ठेवा, ते संसदेत येणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतला आहे.

हे देखील वाचा : भारताला बसली युद्धाची झळ! LPG गॅसचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

या परिस्थितीवर समाजवादी पक्षाच्या खासदार इकरा हसन म्हणाल्या की, “एलपीजीच्या किमती आधीच वाढल्या आहेत. आम्हाला अनेक ठिकाणाहून तुटवड्याची माहिती मिळत आहे. आम्हाला कच्चे तेल मिळेल की नाही हे देखील माहित नाही. हे आमच्या सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे… मला माहित नाही की आमच्या सरकारसमोर कोणत्या सक्ती आहेत की त्यांनी हार मानली आहे आणि अमेरिका आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करण्याचे आदेश देत आहे. आपण ‘इंडिया फर्स्ट पोलिसी’ स्वीकारली पाहिजे. पण आजचे सरकार देश विकण्याचे काम करत आहे.”असा आक्रमक पवित्रा समाजवादी पार्टीच्या खासदारांनी घेतला आहे.

Web Title: Opposition leaders rahul gandhi and arvind kejriwal criticize modi government over gas shortage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Iran-Israel War
  • LPG Gas
  • LPG gas cylinder
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

महालक्ष्मी धोबीघाटात १५० पीएनजी गॅसजोडण्या! लाकूड-कोळशाच्या वापराला मिळाला पूर्णविराम; प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल
1

महालक्ष्मी धोबीघाटात १५० पीएनजी गॅसजोडण्या! लाकूड-कोळशाच्या वापराला मिळाला पूर्णविराम; प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

Parliament Monsoon Session: अमित शाह संसदेत का येत नाहीत? संसदेबाहेर ‘इंडिया’चा आक्रमक पवित्रा
2

Parliament Monsoon Session: अमित शाह संसदेत का येत नाहीत? संसदेबाहेर ‘इंडिया’चा आक्रमक पवित्रा

‘जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा’; राहुल गांधींचा सरकारला इशारा, प्रशांत किशोरांच्या विजयाचीही चर्चा
3

‘जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा’; राहुल गांधींचा सरकारला इशारा, प्रशांत किशोरांच्या विजयाचीही चर्चा

Iran Security : इस्रायलसाठी हेरगिरीचा आरोप; इराणने दोन जणांना फाशी दिली , सुरक्षा यंत्रणांचा कठोर संदेश
4

Iran Security : इस्रायलसाठी हेरगिरीचा आरोप; इराणने दोन जणांना फाशी दिली , सुरक्षा यंत्रणांचा कठोर संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.