Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP-Congress Politics: छात्रों की गुंज! फडणवीसांचा वार सतेज पाटलांचा पलटवार; पुण्यात राजकारण तापणार

राहुल गांधींच्या राष्ट्रीय स्तरावरील 'स्कूल्स इको' मोहिमेचा एक भाग म्हणून, २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावर एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थिनी शिक्षण, सुरक्षा, स्पर्धा परीक्षा आणि रोजगार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतील.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 20, 2026 | 03:59 PM
Devendra Fadnavis on Rahul Gandhi, Satej Patil Congress,

Devendra Fadnavis on Rahul Gandhi, Satej Patil Congress,

Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला अटींसह पोलिसांची मंजुरी.
  • काँग्रेस-संलग्न संस्थांमधील विद्यार्थ्यांचाच सहभाग; संवाद नव्हे एकतर्फी भाषण.
  • कार्यक्रमाची व्याप्ती पाहून सत्ताधाऱ्यांनी धसका घेतला; सर्वांसाठी प्रवेश खुला.
BJP-Congress Politics: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या येत्या २२ ऑगस्ट रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी कडक अटींशर्तींवर या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार राजकीय हल्ला चढवला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमामागील राहुल गांधींच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटल आहे की, “हा खरोखरच ‘छात्रोंची गुंज’ कार्यक्रम आहे की राहुल गांधी केवळ स्वतःसाठी एक नवीन राजकीय व्यासपीठ शोधतायेत, हे मला माहीत नाही. पण राहुल गांधींनी सरसकट तरुणांशी संवाद साधला असता तर आनंद झाला असता. पण माझ्याकडील माहितीनुसार, काँग्रेसशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनाच सहभागी होण्याची परवानगी दिली जात आहे.” असा दावा केला आहे.

Shivsena Symbol Disqualification Hearing: आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? न्यायमूर्तींचा महत्त्वाचा प्रश्न

हा कार्यक्रम नियंत्रित वातावरणात आयोजित केला जात आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरातील काँग्रेस-समर्थित शैक्षणिक संस्थांमधील केवळ विद्यार्थिनींचीच नोंदणी करण्याचे आणि सहभागी होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. फक्त विद्यार्थिनींनाच कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जाईल. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत नियंत्रित वातावरणात आयोजित केला जात आहे. हा खरा संवाद नसून, आमंत्रित प्रेक्षकांसमोर काँग्रेस पक्षाने केलेले एकतर्फी भाषण असेल. असा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला.

राहुल गांधींच्या कार्यक्रमाची भाजपला धास्ती- सतेज पाटील

फडणवीस यांच्या या आरोपांवर आता काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींच्या या कार्यक्रमाची धास्ती घेतल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. छात्रो की गुंज कार्यक्रमाच्या माध्यामातून लाखो युवक-युवतींना राहुल गांधींमध्ये एक आशेचा किरण दिसत आहे. हे कार्यक्रमातून सिद्ध झालं आहे. पण आता सत्ताधाऱ्यांकडून या कार्यक्रमाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. छात्रों की गुंज हा कार्यक्रमासाठी क्यु आर कोड देण्यात आला आहे. तो स्कॅन करून विद्यार्थीनींनी यायचं आहे. असे असले तरी इतर सर्वांसांठी देखील हा कार्यक्रम फ्री आहे. या कार्यक्रमाची व्याप्ती पाहून भाजपने धास्ती घेतली आहे. पण देशातील युवक-युवतींना राहुल गांधींमध्ये जो आशेचा किरण दिसत आहे. त्यातून आम्ही आमचे काम करत राहणार आहोत, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

Vinod Tawade Special: भाजपचे छुपे चाणक्य..! विनोद तावडे कसे बनले भाजपचे प्रमुख निवडणूक रणनीतीकार

२२ ऑगस्ट रोजी पुण्यात राहुल गांधींचा कार्यक्रम

राहुल गांधींच्या राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कूल्स इको’ मोहिमेचा एक भाग म्हणून, २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावर एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थिनी शिक्षण, सुरक्षा, स्पर्धा परीक्षा आणि रोजगार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतील.

पुणे पोलिसांनी ३० अटींसह परवानगी दिली

पोलिसांनी घालून दिलेल्या ३० अटींपैकी, आक्षेपार्ह चित्रे किंवा बॅनर लावण्यास मनाई आहे. तसेच, कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची खात्री आयोजकांना करावी लागेल. पुणे पोलिसांनी दिलेल्या परवानगीनुसार, शहरातील आरटीओ चौकाजवळील एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावर सायंकाळी ४.३० ते रात्री ९.३० या वेळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, तिथे ८,००० ते १०,००० लोक जमण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Politicsdevendra fadnavis and satej patil clash over rahul gandhi pune event chhatron ki goonj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • pune news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी
1

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी

Rahul Gandhi : लाठ्या काठ्यांनी जमाव पांगवता येतो, प्रश्न नाही! राहुल गांधींचा ‘वोट चोरी’ प्रकरणी पुन्हा निशाणा
2

Rahul Gandhi : लाठ्या काठ्यांनी जमाव पांगवता येतो, प्रश्न नाही! राहुल गांधींचा ‘वोट चोरी’ प्रकरणी पुन्हा निशाणा

Daund News : पोलिसांची एकाच दिवशी धडक कारवाई; अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यावर छापा, ७ जणांवर गुन्हे दाखल
3

Daund News : पोलिसांची एकाच दिवशी धडक कारवाई; अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यावर छापा, ७ जणांवर गुन्हे दाखल

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
4

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.