Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तर मी राजीनामा द्यायला तयार,” मराठा आरक्षणावरून राधाकृष्ण् विखे पाटील यांचे मोठे विधान

जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची तलवार उपसल्यावर आता मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरक्षणाविषयी सरकारची भूमिका मांडली आहे.

  • By विवेक
Updated On: May 16, 2026 | 05:42 PM
Radhakrushna Vikhe Patil, Manoj Jarange Patil, Maratha Reservation,

Radhakrushna Vikhe Patil, Manoj Jarange Patil, Maratha Reservation,

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरंगे पाटील यांनी ३० मे रोजी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे
  • मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरक्षणाविषयी सरकारची भूमिका मांडली
  • माझा राजीनामा दिल्याने जरंगे पाटलांचं समाधान होत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार – राधाकृष्ण विखे पाटील
मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्य सरकारवर भडकले आहेत. मुंबईत झालेल्या आंदोलनात मराठा आरक्षणाचा सातारा गॅझेटचा जीआर एका महिन्यात काढणार असे आश्वासन देण्यात आले असले तरीही प्रत्यक्षात मात्र आठ महिने उलटून गेले तरी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये. तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्यात आलेले नाहीत. यावरून मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उचलले असून ३० मे रोजी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची तलवार उपसल्यावर आता मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरक्षणाविषयी सरकारची भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना त्यांनी “माझ्या राजीनाम्याने जरांगे पाटलांचे समाधान होत असेल तर मी उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे,” असे ते म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापत असल्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलनातील एक प्रमुख व्यक्तिमत्व असलेले मनोज जारंगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात पत्रकार परिषद घेत, जिथे आंदोलनाची नवी तारीख आणि भविष्यातील रणनीती जाहीर केली आहे. यावेळी 30 मे 2026 रोजी आंदोलन करणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. तसेच हजारोंच्या संख्येनं येण्याचे आंदोलकांना आवाहन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शांततेत आंदोलन सुरु राहील, असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

NCP मध्ये नवे सत्तासमीकरण! फक्त राज्यसभा सदस्य की पक्षातील नवी ताकद? NCP मध्ये पार्थ-जय पवारांवर चर्चांना उधाण

काय म्हणाले विखे पाटील?

अहिल्यानगरच्या दौऱ्यात राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “मराठा आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष झाल्यावर हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीची सुरुवात मी केली. आपण अडीच लाख कुणबी दाखले दिलेले आहेत. मराठा आरक्षणविषयक उपसमितीचा अध्यक्ष म्हणून मी सर्व आमदारांना पत्रं पाठवली आहेत. स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी स्थानिक आमदारांनी प्रयत्न करायला हवेत. सातारा गॅजेटची प्रक्रिया आम्ही आता सुरु केली आहे. त्याची अंमलबजावणी अजून सुरु झाली नाही हे मान्य करतो मात्र प्रक्रिया सुरु आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आतापर्यंत आपण मराठा आरक्षणासंदर्भात जे काही निर्णय घेतले त्यांना कुठल्याही न्यायालयाने स्थगिती दिली नाही. आंदोलनादरम्यान निधन झालेल्या मराठा आंदोलकांच्या मुलांना नोकरीमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. एसटी महामंडळात आम्ही त्यांना नोकरी देत होतो, मात्र त्यांनी ती स्वकारली नाही. आता महावितरण आणि एमआयडीसी मध्ये नोकरी देण्यासंदर्भात विनंती केली आहे. उपसमितीचा अध्यक्ष म्हणून माझा राजीनामा दिल्याने जरंगे पाटलांचं समाधान होत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

“देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळं केलं,” मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील पुन्हा भडकले!

Web Title: Radhakrushna vikhe patil statement over manoj jarange patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • Manoj Jarang patil
  • maratha aarkshan
  • maratha obc reservation
  • Radhakrushn Vikhe Patil

संबंधित बातम्या

मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू; आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी कार्यवाहीला वेग
1

मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू; आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी कार्यवाहीला वेग

मराठ्यांच्या वाटेला जाल तर जिंदगीत यशस्वी होऊ देणार नाही – मनोज जरांगे पाटील
2

मराठ्यांच्या वाटेला जाल तर जिंदगीत यशस्वी होऊ देणार नाही – मनोज जरांगे पाटील

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
3

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.