Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू; आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी कार्यवाहीला वेग

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सातारा आणि औंध गॅझेटच्या अंमलबजावणीबाबतही अभ्यास सुरू आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 12, 2026 | 09:54 PM
Shambhuraj Desai (Photo Credit - X)

Shambhuraj Desai (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

सातारा, दि. १२ (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू असून, आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक नियमितपणे होत असून, या बैठकीत व्हेरिफिकेशन, व्हॅलिडिटी तसेच सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जात आहे. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून संबंधित कामकाजाची माहिती घेतली जात आहे. आरक्षणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या प्रक्रियेला अधिक वेग देण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची कार्यवाहीही सुरू असल्याचे देसाई यांनी सांगितले.

Satara News: अर्जांच्या पाठपुराव्याला पालकमंत्री कार्यालयाचा वेग; वर्षभरात १,२३६ प्रकरणे मार्गी

दरम्यान, सातारा गॅझेट तसेच औंध संस्थान गॅझेटच्या अंमलबजावणीबाबत शासनाकडून स्वतंत्र अभ्यास सुरू आहे. या दोन्ही गॅझेटच्या अनुषंगाने उपलब्ध कागदपत्रे, कायदेशीर बाबी आणि प्रशासकीय प्रक्रियेचा विचार केला जात आहे.

सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीबाबत साताऱ्यातून आग्रह वाढत असताना, यासंदर्भात मंत्री व राजघराण्याचे प्रतिनिधी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा निश्चित केली जाणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. आंदोलनापूर्वी सरकारकडून सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती जरांगे-पाटील यांना लेखी स्वरूपात देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठ्यांच्या वाटेला जाल तर जिंदगीत यशस्वी होऊ देणार नाही – मनोज जरांगे पाटील

Web Title: Maratha reservation government action shambhuraj desai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 09:54 PM

Topics:  

  • Manoj Jarang patil
  • Maratha Reservation
  • Satara News

संबंधित बातम्या

‘जरांगे आता संघर्ष योद्धा नाही, टेंडर योद्धा’, मनोज जरांगेंवर अजय बारस्करांचा हल्लाबोल, 3770 कोटींच्या टेंडरचा घोटाळा?
1

‘जरांगे आता संघर्ष योद्धा नाही, टेंडर योद्धा’, मनोज जरांगेंवर अजय बारस्करांचा हल्लाबोल, 3770 कोटींच्या टेंडरचा घोटाळा?

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
2

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
3

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
4

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.