Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi Detained : दिल्लीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; 8 तासांच्या ठिय्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Rahul Gandhi Detained : निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. आकाशवाणी भवनमध्ये तब्बल 8 तास ठिय्या दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

  • By विवेक
Updated On: Oct 06, 2026 | 09:13 PM
Rahul Gandhi Detained

Rahul Gandhi Detained

Follow Us
Follow Us:
  • निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जात असताना राहुल गांधींना पोलिसांनी अडवलं.
  • आकाशवाणी भवनमध्ये राहुल गांधींसह नेत्यांनी 8 तासांहून अधिक काळ ठिय्या दिला.
  • अखेर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
 

नवी दिल्ली : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये आंदोलन करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी अखेर पोलिसांच्या ताब्यात गेले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, केसी वेणुगोपाल यांच्यासह इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. तब्बल आठ तासांहून अधिक काळ आकाशवाणी भवनमध्ये ठिय्या मांडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. (Rahul Gandhi Detained)

निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाताना पोलिसांनी अडवलं

मंगळवारी सकाळपासून इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली होती. राहुल गांधी यांच्यासह खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जात असताना दिल्ली पोलिसांनी त्यांना अडवलं.

पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड्स लावल्यानंतर राहुल गांधी यांनी बॅरिकेड्सवर चढून तिरंगा फडकावला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली.

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

आकाशवाणी भवनमध्ये 8 तास ठिय्या

राहुल गांधींना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला इंडिया आघाडीच्या खासदारांनी घेराव घातला. यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तिथून बाहेर पडले आणि जवळच असलेल्या आकाशवाणी भवनमध्ये पोहोचले.

निवडणूक आयोगाच्या कार्यालयापासून आकाशवाणी भवन अवघ्या 300 मीटर अंतरावर आहे. राहुल गांधी यांनी याच ठिकाणी ठिय्या मांडत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेण्याची मागणी लावून धरली.

‘मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटल्याशिवाय जाणार नाही’

राहुल गांधी मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटून काही प्रश्न विचारायचे आहेत, या भूमिकेवर ठाम होते. मात्र, या ठिकाणी आंदोलन करता येणार नाही, त्यामुळे आंदोलन थांबवावं, असं दिल्ली पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत होतं.

राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांनी तब्बल आठ तासांहून अधिक काळ ठिय्या दिला. राहुल गांधी यांनी आकाशवाणी भवनमध्येच रात्र घालवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र त्याआधीच दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

प्रियंका गांधींसह इतर नेतेही ताब्यात

राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी, केसी वेणुगोपाल आणि इतर काँग्रेस नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी परिसरातील बॅरिकेड्स हटवले आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

दरम्यान, निवडणूक आयोगाविरोधातील या आंदोलनामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान

Web Title: Rahul gandhi detained delhi protest election commission gnyanesh kumar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 09:13 PM

Topics:  

  • Delhi Police
  • election commission of india
  • Gyanesh Kumar
  • INDIA Alliance
  • Priyanka Gandhi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Shivsena Symbol Case : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर शिंदे गटाचा ठाकरे गटावर थेट निशाणा
1

Shivsena Symbol Case : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर शिंदे गटाचा ठाकरे गटावर थेट निशाणा

Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून काँग्रेसने सरकारला घेरलं, आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा पेटला!
2

Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून काँग्रेसने सरकारला घेरलं, आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा पेटला!

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
3

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान
4

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.