Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मिसिंग लिंकवर प्रश्न विचारला तर राजकारण?’ राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल; सभेत केली मिमिक्री

रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिसिंग लिंक दुर्घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी सभेत फडणवीसांची मिमिक्रीही केली.

  • By विवेक
Updated On: Jul 09, 2026 | 02:51 PM
'मिसिंग लिंकवर प्रश्न विचारला तर राजकारण?' राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल; सभेत केली मिमिक्री

'मिसिंग लिंकवर प्रश्न विचारला तर राजकारण?' राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल; सभेत केली मिमिक्री

Follow Us
Follow Us:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरुवार, 9 जुलै) रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबरदस्त टीका टीका केली. मिसिंग लिंक दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या विधानांवरून राज ठाकरे यांनी आज चांगलयच शब्दांत समाचार घेतला. यावेळी त्यांनी त्यांनी नफडणवीसांची मिमिक्री देखील केली. तसेच, सरकारवर हल्लाबोल करून सत्तेतील लोकांच्या मुजोरीबाबतही सवाल उपस्थित केले.

काय म्हणाले राज ठाकरे ?

राज ठाकरे यांनी आपल्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मिसिंग लिंक दुर्घटनेवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं होतं. यात मी लक्ष घालतो. ज्यांनी चुका केल्या, त्यांच्यावर चौकश्या लावतो, असं बोलायला हवं होतं. ते राहीलं बाजूला. राजकारण करेल त्याला बघून घेईल. सुसंकृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस बघून घ्यायची कोणती भाषा आली. एक खासदारव सांगतो, बॉम्ब टाकेन. माझ्या नावावर पाच मर्डर आहेत. आपल्या राज्यात होऊ शकत कारण ते सत्तेत आहेत. हे बोलायची हिम्मत होते, कारण कुणाचा कुणावर अंकुश नाही.”

Anjali Damania News: अहंकार…फक्त आणि फक्त अहंकार! ‘मिसिंग लिंक’च्या भगदाडावरून अंजली दमानियांचे फडणवीसांना सडेतोड उत्तर

स्वतःच्या अंगाशी आल्यावर ते राजकारण, फडणवीसांना टोमणा

फडणवीसांवर टीका करत ते पुढे म्हणाले, “मिसिंग लिंकवर खांब कोसळला, पाणी आलं. म्हणे त्याच राजकारण करू नका. अरे वा. त्याच्यावर बोललं तर राजकारण. इतके दिवस तुम्ही काय करत होतात. दुसऱ्याचं सरकार असताना तुम्ही काय करत होतात. त्यावेळी आंदोलन झाली ते राजकारण नव्हतं? स्वतःच्या अंगाशी आल्यावर ते राजकारण. असं कसं होईल? म्हणे, एकवेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा.. लोक त्या मिसिंग लिंकवर बोलतात. महाराष्ट्राचा कुठे अपमान करतात. यांना केंद्र सरकारची सवय लागली आहे. केंद्राच्या कोणत्या गोष्टीवर बोललं तर तुम्ही देशद्रोही.”

तुमच्या अंगावर आल्यावर कसा आला महाराष्ट्राचा अपमान?

“आता केंद्राची कामे आहेत तर देशाचा काय संबंध? मिसिंग लिंकबद्दल बोललं तर महाराष्ट्राचा अपमान कुठे झाला? लोकांनी प्रश्न विहारायचे नाही का? इतके दिवस मोबाईलवरून विरोधकांना शिव्या घालायचे ते अंगलट आलंय. दामदुपटीने यांच्या अंगलट आलं. आता त्रास होतंय. तुम्हीच सुरु केल्या या गोष्टी. 10-12 वर्षात तुम्हीच सुरु केलं. वाईट साईट बोलणं. घाण बोलणं, तुमच्या टीमने केलं. तुमच्या अंगावर आल्यावर कसा आला महाराष्ट्राचा अपमान?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मोठा निर्णय! फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक

मिसिंग लिंक दुर्घटनेनंतर राज्याच्या राजकीय वातावरणात मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी मोठ्या प्रमाणात राज्य सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल केला. त्यानंतर फडणवीसांनीं पावसाळी अधिवेशनात याबाबत बोलताना उलट विरोधकांवरच निशाणा साधत ‘महाराष्ट्राला बदनाम करू नका‘ असे वक्तव्य केले. यावरून आता मोठ्या राजकीय चर्चा सुरु झाल्या असून राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर आता काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: Raj thackeray criticizes devendra fadnavis missing link issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Mumbai Pune Missing Link
  • Raj Thackeary

संबंधित बातम्या

‘फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही’; ‘राहुल गांधींच्या कार्यक्रमाची नक्कल फसली,’ हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
1

‘फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही’; ‘राहुल गांधींच्या कार्यक्रमाची नक्कल फसली,’ हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
2

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

‘मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहा, लोकशाही संधी देईल,’ नागपुरमध्ये Gen Z समोर देवेंद्र फडणवीसांचा संघर्षाचा उलगडा
3

‘मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहा, लोकशाही संधी देईल,’ नागपुरमध्ये Gen Z समोर देवेंद्र फडणवीसांचा संघर्षाचा उलगडा

पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमावर फडणवीसांचा गंभीर आरोप; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना पैसे देण्याचा दावा
4

पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमावर फडणवीसांचा गंभीर आरोप; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना पैसे देण्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.