Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

पक्षवाढ न होण्याला प्रकाश आबिटकर जबाबदार आहेत का? यावर बोलताना क्षीरसागर म्हणाले, मी दुसऱ्या कोणावरही टीका करणार नाही. पण माझ्या ऑफिस समोर नेहमी गर्दी असते, तशी दुसऱ्यांच्या ऑफिसमध्ये गर्दी नसते. तुमच्या दारात जेवढ्या चपला तेवढी तुमची श्रीमंती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 01, 2026 | 11:11 AM
'मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या'; एकनाथ शिंदेंच्या 'या' आमदाराची जाहीरपणे नाराजी

'मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या'; एकनाथ शिंदेंच्या 'या' आमदाराची जाहीरपणे नाराजी

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : कोल्हापुरातील शिवसेनेमध्ये मंत्रिपदावरून अंतर्गत खदखद पुन्हा एकदा बाहेर आली आहे. पालकमंत्रिपद प्रकाश आबिटकर यांना मिळाल्याने शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र, अडीच वर्षानंतर पुन्हा मंत्रिपद मिळेल, अशी आशा आमदार क्षीरसागर यांना आहे. आता हे मंत्रिपद आपल्याला मिळावे, अशी मागणी करत क्षीरसागर यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करून दाखवली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्ष वाढीसाठी प्रचंड मेहनत घेतात. यापूर्वीही घेत होते. पण आता ज्यांची मंत्रिपदासाठी निवड झाली आहे, त्यांनी इतर जिल्ह्यांमध्ये देखील पक्ष वाढीसाठी काम केले पाहिजे. शिवसेनेत अनेक बाहेरची लोक येऊन मंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांना पक्ष वाढीचे महत्व कदाचित कळालेले नाही. शिवसेनेतील मंत्र्यांनी पक्ष वाढीसाठी काय केले? याचं रिपोर्ट कार्ड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यावे, अशी थेट मागणीच क्षीरसागर यांनी केली आहे.

‘परभणीच्या विकासाची चिंता करू नका, महायुती सरकार पाठीशी’; एकनाथ शिंदेंचा संजय जाधवांना शब्द

प्रकाश आबिटकर यांना अप्रत्यक्षपणे टोला

पक्षवाढ न होण्याला प्रकाश आबिटकर जबाबदार आहेत का? यावर बोलताना क्षीरसागर म्हणाले, मी दुसऱ्या कोणावरही टीका करणार नाही. पण माझ्या ऑफिस समोर नेहमी गर्दी असते, तशी दुसऱ्यांच्या ऑफिसमध्ये गर्दी नसते. तुमच्या दारात जेवढ्या चपला तेवढी तुमची श्रीमंती. प्रत्येकाला कमी वेळेत न्याय द्यावा ही माझी काम करण्याची पद्धत आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली खंत व्यक्त करत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

…ते जरांगेंचे कसे होणार?

मनोज जरांगे पाटील प्राण पणाला लावून आंदोलन करत आहेत, समाजाचे नेतृत्त्व करत आहेत. उपोषण करून त्यांची प्रकृती खूप खालावली आहे. मी हे स्वत: पाहिले आहे. संजय जाधव यांना निवडून आणण्यासाठी जरांगे पाटील यांची मदत झाली होती. पण जे कुणी बंडू-झंडू जाधव आहेत, जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? ते नेहमी नवीन आई-बाप शोधत असतात, अशा खोचक शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यावर टीका केली आहे.

Nepal Flood News : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणले; संजय निरुपम यांची माहिती

Web Title: Rajesh kshirsagar has demanded a ministerial post from dcm eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • political news
  • Prakash Abitkar

संबंधित बातम्या

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
1

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
2

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी
4

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.