Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“EV गाड्या घेऊन बेसुमार वीज वापराल, माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास,” रोहिणी खडसे यांची मंत्र्यांवर टीका

राज्यातील मंत्र्यांकडून मोठ्या प्रमाणात EV वाहनांचा वापर करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार आगपाखड केली आहे.

  • By विवेक
Updated On: May 16, 2026 | 08:35 PM
Rohini Khadse slams Maharashtra MInisters over Using EV Cars

Rohini Khadse slams Maharashtra MInisters over Using EV Cars

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील मंत्र्यांकडून मोठ्या प्रमाणात EV वाहनांचा वापर
  • याच पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार आगपाखड
  • सगळ्यांनीच जर ईव्ही कार वापरायला सुरुवात केली तर काही दिवसांनी राज्यात विजेचाही तुटवडा जाणवेल – रोहिणी खडसे
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिका  इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीचे आवाहन देशवासियांना केले होते. यानंतर देशभरातून अनेक चर्चाना उधाण आले. विशेषकरून विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. सामान्य नागरिकांनी देखील मंत्र्यांच्या ताफ्यावरून होणाऱ्या इंधनाच्या वापरावरून नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले. अश्यातच प्रधानमंत्री मोदी यांच्यासह अनेक बड्या मंत्र्यांनी आपल्या ताफयातील वाहनांवर कपात केली. तसेच आता राज्यातील मंत्र्यांकडून मोठ्या प्रमाणात EV वाहनांचा वापर करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार आगपाखड केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचतीविषयी देशवासियांना केलेल्या आवाहनानंतर देशभरातील नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आपल्या वाहनांच्या ताफ्यात मोठी घाट केल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातसुद्धा याचे मोठे पडसाद पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याआधीच आपल्या मंत्रिमंडळातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधत आपल्या वाहनांचा ताफा कमी करत असल्याचे सांगितले आहे. याशिवाय ते इलेक्ट्रिक वाहनांमधूनच प्रवास करताना दिसून आले. मंत्री नितेश राणे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री उदय सामंत, भाजप नेते प्रवीण दरेकर हेदेखील इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. यावरून रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून चांगलेच सुनावले आहे.

“गडकरी मुख्यमंत्री असते तर…” प्रणिती शिंदे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा

काय म्हणाल्या रोहिणी खडसे?

रोहिणी खडसे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत म्हणाल्या, “जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. तेव्हापासून आपल्या राज्यातील मंत्री-संत्री नव्या कोऱ्या EV Car घेत सुटलेत. लोकांना हे एकाप्रकारे ईव्ही कार घेण्याचे आवाहन करत आहेत.”

“आज पावसाळा तोंडावर आहे, पेरणीचे दिवस सुरू झालेत. या अत्यंत गरजेच्या काळात माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास सहन करावा लागतोय. त्याला वेळेत वीज मिळत नाहीये. याचा विचार सत्ताधारी करणार आहेत का ?”

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. तेव्हापासून आपल्या राज्यातील मंत्री-संत्री नव्या कोऱ्या #EVCar घेत सुटलेत. लोकांना हे एकाप्रकारे ईव्ही कार घेण्याचे आवाहन करत आहेत. आज पावसाळा तोंडावर आहे, पेरणीचे दिवस सुरू झालेत. या… pic.twitter.com/gm6GSBdyYA — Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) May 16, 2026

“या मंत्र्या-संत्र्यांना काय आहे? यांना तर कुठंही वीज उपलब्ध होईल, हे बेसुमार वीज वापरतील. पण हा खड्डा माझ्या शेतकऱ्यांच्या सोसावा लागेल ना ! सगळ्यांनीच जर ईव्ही कार वापरायला सुरुवात केली तर काही दिवसांनी राज्यात विजेचाही तुटवडा जाणवेल आणि आता ८ तास असणारे लोडशेडींग उद्या १५-१६ तासांवर पोहोचेल..”

“जरा भान ठेवून वागा, माझ्या शेतकऱ्यांचा जरा विचार करा ! सगळ्याच गोष्टी काय पीआर आणि मार्केटिंगसाठी कसे करता ?” असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

“माझ्याबाबत अनेक चुकीच्या बातम्या पसरवल्या,” ED चौकशीनंतर रुपाली चाकणकरांचे मोठे वक्तव्य

Web Title: Rohini khadse slams maharashtra ministers over using ev cars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Rohini Khadse

संबंधित बातम्या

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
1

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
2

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
3

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
4

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.