Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं

Rohit Pawar MPSC Protest Pune : MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजप आमदार विक्रम पाचपुते आणि रोहित पवार आमनेसामने आले आहेत. पाचपुते यांच्या टीकेला उत्तर देताना रोहित पवारांनी 2029 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभूत करण्याचा थेट इशारा दिला.

  • By विवेक
Updated On: Oct 06, 2026 | 02:52 PM
Rohit Pawar Vikram Pachpute

Rohit Pawar Vikram Pachpute

Follow Us
Follow Us:
  • MPSC आंदोलनावरून रोहित पवारांचा विक्रम पाचपुतेंना थेट इशारा
  • “2029 ला विधानसभेत जाणार नाहीत”, रोहित पवारांचं ओपन चॅलेंज
  • पाचपुतेंच्या ‘अर्बन नक्षल’ टीकेला रोहित पवारांचं सडेतोड प्रत्युत्तर
 

Rohit Pawar MPSC Protest Pune : पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार विक्रम पाचपुते यांच्यात चांगलीच जुंपली आहे. गेल्या पाच दिवसांपासून रोहित पवार हे MPSC विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात बसले आहेत. याच आंदोलनावरून पाचपुते यांनी केलेल्या टीकेला रोहित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. इतकंच नाही, तर 2029 च्या विधानसभा निवडणुकीत विक्रम पाचपुते निवडून येणार नाहीत, असं थेट चॅलेंजच त्यांनी दिलं आहे.

विक्रम पाचपुतेंनी रोहित पवारांवर काय आरोप केला?

काही दिवसांपूर्वी विक्रम पाचपुते यांनी पुण्यातील MPSC आंदोलनावरून रोहित पवारांवर निशाणा साधला होता. हे आंदोलन आता विद्यार्थ्यांचं आंदोलन राहिलेलं नाही, तर ‘रोहित पवार नाईटस’ कार्यक्रम सुरू असल्यासारखं वाटत असल्याची टीका त्यांनी केली होती.

दिवसभर आंदोलनाच्या ठिकाणी केवळ 50 ते 100 लोक असतात आणि विद्यार्थ्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे, असा दावाही पाचपुते यांनी केला होता. तसेच आंदोलनाच्या माध्यमातून राज्याला वेठीस धरण्याचं काम सुरू असून, रोहित पवार हे आंदोलनाच्या आडून ‘अर्बन नक्षल’ तयार करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा

रोहित पवारांचा पाचपुतेंना थेट इशारा

पाचपुतेंच्या या टीकेवर रोहित पवारांनी सोमवारी MPSC विद्यार्थ्यांसमोर बोलताना जोरदार पलटवार केला. “अहिल्यानगरमधील एक आमदार आहेत, त्यांना मी माझे मित्र समजत होतो. पण माझ्यावर टीका करण्याच्या नादात त्यांनी सामान्य कुटुंबातील, शेतकऱ्यांच्या आणि अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलांना अर्बन नक्षल म्हटलं,” अशी टीका रोहित पवारांनी केली.

तसंच, “2029 ला ही व्यक्ती विधानसभेत जाणार नाही, ही माझी जबाबदारी आहे,” असा थेट इशाराच त्यांनी दिला. तुमच्या तोंडून एखादा शब्द चुकीचा निघाला असेल तर माफी मागता आली असती. पण तुम्ही सरळ बोलून नंतर मी असं बोललोच नाही, अशी भूमिका घेत असल्याचंही रोहित पवार म्हणाले.

आता रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना दिलेल्या थेट चॅलेंजमुळे राजकीय चर्चेला पुन्हा हवा मिळाली आहे. MPSC आंदोलनाचा मुद्दा पुढे आणखी किती तापतो आणि या वादाचा 2029 च्या निवडणुकीवर काय परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Web Title: Rohit pawar mpsc protest pune vikram pachpute vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • MPSC
  • pune news
  • rohit pawar
  • Student Protest

संबंधित बातम्या

Pune Water Issue : पुणे शहरातही पाणी टंचाईचे संकट? शहराला हवे 21.34 टीएमसी पाणी
1

Pune Water Issue : पुणे शहरातही पाणी टंचाईचे संकट? शहराला हवे 21.34 टीएमसी पाणी

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा
2

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा

Ulhasnagar News: “रोहित पवार नाईट्स सुरू”; रोहित पवारांच्या आंदोलनावर विक्रम पाचपुतेंचा हल्लाबोल
3

Ulhasnagar News: “रोहित पवार नाईट्स सुरू”; रोहित पवारांच्या आंदोलनावर विक्रम पाचपुतेंचा हल्लाबोल

CM Meeting on MPSC: MPSC विद्यार्थ्यांच्या विजयाचा एल्गार! शासनाकडून मागण्या मान्य, आंदोलनाबाबत मोठा निर्णय
4

CM Meeting on MPSC: MPSC विद्यार्थ्यांच्या विजयाचा एल्गार! शासनाकडून मागण्या मान्य, आंदोलनाबाबत मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.