Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“पुण्यातील विषारी दारुकांडाचा तपास पुणे पोलिसांच्या ‘मुखिया’ला जमणार नाही म्हणून तपास CID कडे,” रोहित पवार यांचा सरकारवर निशाणा

पुण्यातील विषारी दारूकांडात १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उठली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पोलीस प्रशासनासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • By विवेक
Updated On: May 30, 2026 | 05:06 PM
‘शरद पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही’; रोहित पवारांचा ठाम विश्वास, संजय दिना पाटील यांच्या वर्तनावरही टीका

‘शरद पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही’; रोहित पवारांचा ठाम विश्वास, संजय दिना पाटील यांच्या वर्तनावरही टीका

Follow Us
Follow Us:

पुण्यातील विषारी दारूकांडात १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उठली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत संबंधित आरोपीना सोडणार नसल्याचे सांगत याचा तपास सीआयडी कडे देणार असल्याचे सांगितले आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पोलीस प्रशासनासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “पुण्यातील विषारी दारुकांडाचा तपास पुणे पोलिसांच्या ‘मुखिया’ला जमणार नसल्याचं लक्षात आल्यानेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याचा तपास CID कडे देण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय,” अश्या शब्दांत त्यांनी आगपाखंड केली आहे.

काय म्हणाले रोहित पवार ?

रोहित पायावर यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून जोरदार निशाणा साधला आहे. ते यावेळी म्हणाले, “पुण्यातील विषारी दारुकांडाचा तपास पुणे पोलिसांच्या ‘मुखिया’ला जमणार नसल्याचं लक्षात आल्यानेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याचा तपास CID कडे देण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय. CID कडे तपास दिल्यास काय परिस्थिती होते हे अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासावरून दिसतंच आहे, पण किमान चोऱ्यामाऱ्या, पाकिटमारी, चेन स्नॅचिंग अशा प्रकारच्या छोट्या गुन्ह्यांचा तपास CID करेल असं वाटल्यानेच कदाचित त्यांच्याकडे हा तपास दिला असावा किंवा अजितदादांच्या अपघाताप्रमाणे या दारूकांडातही कुणालातरी वाचवण्याचा यामागे काही हेतू नाही ना, हेही तपासण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.

पुण्यातील विषारी दारुकांडाचा तपास पुणे पोलिसांच्या ‘मुखिया’ला जमणार नसल्याचं लक्षात आल्यानेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याचा तपास CID कडे देण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय. CID कडे तपास दिल्यास काय परिस्थिती होते हे अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासावरून दिसतंच आहे,
पण किमान…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 30, 2026

ते पुढे म्हणाले, “पण आमचंही हेच मत आहे की, राज्य सरकारने यापुढे पोलीस ठाणे वसुलीसाठी राखीव ठेवून चोऱ्यामाऱ्या, पाकिटमारी, चेन स्नॅचिंग यांसारख्या गुन्ह्यांच्या तपासाचं काम CID कडेच सोपवावं आणि अजितदादांच्या अपघाताचा तपास विधानसभेत दिलेल्या शब्दाप्रमाणे CID कडून काढून CBI कडे द्यावा. यामुळं किमान अजितदादांना तरी न्याय मिळेल..”

“…तर आमचा समाज पेटून उठेल,” जरांगे पाटलांच्या आंदोलनावर बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा, ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार?

“खरं म्हणजे काही पोलिसांमुळे बहुतांश प्रामाणिक पोलिसांची बदनामी होते, हे कुणी लक्षात घेत नाही. त्यामुळं मराठी माणूस म्हणून मला पोलिसांनाही विचारायचं की, किती दिवस तुम्ही हे असं दबावाखाली काम करणार? कधीतरी #मराठी_बाणा दाखवून पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिसांची मान अभिमानाने उंचावेल असं काम करणार की नाही?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. ते म्हणाले, “माझे पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणे झाले आहे. विषारी दारू कुठे तयार झाली ते शोधून काढले आहे. आतापर्यंत आठ लोकांना अटक झाली आहे. अजून काही लोकांना अटक होऊ शकते. या प्रकरणातील संपूर्ण साखळी शोधून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,” असे ते म्हणाले.

Maharashtra Politics : महा-राजकीय भूकंप! शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये; विखे पाटलांची ‘डबल स्ट्राईक’ चर्चा

Web Title: Rohit pawar slams pune police and cm devendra fadnavis over pune poisonous liqour case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • pune news
  • Pune Police
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Pune Railway Station वर अत्याधुनिक १६० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित; आरपीएफला मिळणार स्वयंचलित अलर्ट
1

Pune Railway Station वर अत्याधुनिक १६० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित; आरपीएफला मिळणार स्वयंचलित अलर्ट

Pune Sucide : बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची गळफास घेऊन आत्महत्या; व्हिडीओत रविंद्र धंगेकरांचं घेतलं नाव
2

Pune Sucide : बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची गळफास घेऊन आत्महत्या; व्हिडीओत रविंद्र धंगेकरांचं घेतलं नाव

पुण्यातील पासपोर्ट कार्यालयासह पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; धमकीचा ई-मेल मिळताच…
3

पुण्यातील पासपोर्ट कार्यालयासह पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; धमकीचा ई-मेल मिळताच…

कलम 155 गैरवापरप्रकरणी निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; राष्ट्रवादीच्या नेत्याची महसूल मंत्र्यांकडे मागणी
4

कलम 155 गैरवापरप्रकरणी निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; राष्ट्रवादीच्या नेत्याची महसूल मंत्र्यांकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.