Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ते सर्व फक्त आणि फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न लोकं…’ अजित पवार विमान अपघातप्रकरणी रोहित पवार संतापले

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता चार महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. या अपघाताप्रकरणी रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता, आता अहमदाबाद विमान दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा मोठा संताप व्यक्त केला आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 11, 2026 | 02:53 PM
Rohit Pawar Press Conference on ajit pawar accident

Rohit Pawar Press Conference on ajit pawar accident

Follow Us
Follow Us:
  • अजित पवार विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांची X पोस्ट
  • अहमदाबाद दुर्घटनेच्या वर्षपूर्तीवरून AAIB वर टीका
  • “सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न” म्हणत राजकीय नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता चार महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. या अपघाताप्रकरणी सीआयडी तपास करत असून अद्यापही अपघातामागची ठोस कारणे मिळू शकली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून वारंवार पत्रकार परिषद घेत हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता, सीआयडीच्या संथ तपासावरही त्यांनी टीका केली होती. या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठीदेखील त्यांनी आंदोलन केले होते. आता अहमदाबाद विमान दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा मोठा संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून जोरदार आगपाखड केली आहे. अजित पवारांच्या अपघातपप्रकरणी अहवालाची वाट बघूया असे वक्तव्य करणाऱ्या काही नेत्यांवर त्यांनी अप्रत्यक्ष टीका करत सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न असे शब्द वापरत टीकास्त्र सोडले आहे.

अहमदाबाद विमान दुर्घटनेला वर्ष पूर्ण होतंय. नियमानुसार एक वर्षाच्या आत AAIB चा अंतिम अहवाल येणं बंधनकारक असतं, परंतु अद्यापही अहवाल आलेला नाही! AAIB च्या तपासात क्रिमिनल अँगल नसतो, अहवाल वेळेवर येत नाही हे माहीत असूनही “अजितदादांच्या अपघात प्रकरणाचा अहवाल येऊ द्या, अहवालाची वाट… pic.twitter.com/c7y56v3M3s — Rohit Pawar (@RRPSpeaks) June 11, 2026

आपल्या पोस्टमधून ते म्हणाले, “अहमदाबाद विमान दुर्घटनेला वर्ष पूर्ण होतंय. नियमानुसार एक वर्षाच्या आत AAIB चा अंतिम अहवाल येणं बंधनकारक असतं, परंतु अद्यापही अहवाल आलेला नाही! AAIB च्या तपासात क्रिमिनल अँगल नसतो, अहवाल वेळेवर येत नाही हे माहीत असूनही “अजितदादांच्या अपघात प्रकरणाचा अहवाल येऊ द्या, अहवालाची वाट बघूया”, असं जे म्हणतात ना ते सर्व फक्त आणि फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न लोकं आहेत. मैत्री, नातीगोती केवळ भाषणामध्ये बोलायला आहे का, प्रत्यक्षात मात्र काहीच नाही का? असा प्रश्न पडतो.” रोहित पवारांच्या या ट्विटमुळे त्यांनी हि अप्रत्यक्ष टीका नेमकी कोणावर केली आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Karnataka Politics : मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच डी. के. शिवकुमार यांना पुन्हा झटका; मंत्र्यांची थेट दिल्लीत धाव

विमान कंपनी VSR च्या कारभारावर केली टीका

अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाची कंपनी असलेल्या VSR कंपनीच्या मालकांवर कारवाई करण्यासाठी रोहित पवार सातत्याने प्रयत्न करत आहेत. आता अजितदादांच्या दुर्देवी अपघातात दादांसह मृत्यू झालेल्या पिंकी माळी व विदीप जाधव या स्टाफला इन्शुरन्स मिळण्याबाबत त्यांनी VSR कंपनीवर टीका केली होती. ‘पिंकी माळी व विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांना VSR कंपनीकडून जो इन्शुरन्स देण्यात येणार होता त्याबाबत VSR कडून सातत्याने टाळाटाळ होत असून सरकारकडून त्या कंपनीच्या मालकाशी संपर्क करून जाधव व माळी कुटुंबाला विम्याचे पैसे देण्यासंदर्भात प्रयत्न होंत नाहीत हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हंटले होते. तसेच, ‘सरकारकडून दोन्ही पिडीत कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत जाहीर केली होती ती मदतदेखील या कुटुंबांना मिळालेली नसल्याचे त्यांनी याआधी स्पष्ट केले होते.

‘कोणी कुठे जात नाही, ज्यांना जायचे ते गेले’; खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान

Web Title: Rohit pawar tweet over ajit pawar plane crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Ahmedabad plane crash
  • ajit pawar plane crash
  • rohit pawar

संबंधित बातम्या

‘फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?’ धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
1

‘फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?’ धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Ajit Pawar Birthday: ‘दादा तुम्ही परत या ना…; शब्दांत न मांडता येणारी जखम, अजित दादांची आज पहिली जयंती
2

Ajit Pawar Birthday: ‘दादा तुम्ही परत या ना…; शब्दांत न मांडता येणारी जखम, अजित दादांची आज पहिली जयंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.