'कोणी कुठे जात नाही, ज्यांना जायचे ते गेले'; खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच ठाकरे गटाच्या शिवसेनेचे अनेक नेते पक्ष सोडून जाणार असल्याचे म्हटले जात होते. त्यावर खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. ‘कोणी कुठे जात नाही, ज्यांना जायचे ते गेले. आता सगळे पक्षासोबत मजबूत उभे आहेत. सर्व खासदार यांच्यासोबत संवाद सुरू आहे’, असे खासदार राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘आता तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. २०-२२ खासदार फुटले ते नावे दाखवा ना…शाह यांची स्ट्रॅटेजी आहे एक वावटळ निर्माण करायचे असते, तुम्ही त्यांना जरी पायघड्या घातल्या तरी बेईमानचा किडा घुसला तर कॅन्सरसारखा किडा पोखरतो. नेत्यांच्या संपर्कावर संजय राऊत म्हणाले, संपर्क साधला म्हणून काय झाले? विधानसभेत आणि लोकसभेत एकत्र बसतात संपर्क होत असतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मीनाक्षी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला हा काय नारी सन्मान झाला. मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज शाह यांच्या दबावामुळे फेटाळला गेला. काँग्रेसची ताकद असताना फेटाळला. तृणमूल काँग्रेसबाबत बोलताना ते म्हणाले, काँग्रेसमधून जे-जे बाहेर पडले आहेत, ज्यांनी पक्ष स्थापन केले आहेत, त्यांनी एकत्र काँग्रेसच्या झेंड्याखाली यायला पाहिजे. तसेच अजित पवार गट विलीनीकरण होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये व्हा. मजबूत काँग्रेस देशाला नेतृत्व देणारी यात एकत्र झाले पाहिजे असे माझे मत आहे.
न्यायाधीश मंत्र्यांसोबत करत आहेत पार्ट्या
वय झाले म्हणून कसले मार्गदर्शन करत आहेत. नेहरू यांच्यापेक्षा जास्त दिवस खुर्ची राखली हा विक्रम नाही. न्यायाधीश मंत्र्यांसोबत पार्ट्या करत आहेत, ही तुमची कमाई आहे. जे कोणी केले नाही यापूर्वी ते तुम्ही करत आहात. न्यायाधीशांनी राजकीय व्यवस्थेपासून अंतर ठेवले पाहिजे. हे काय न्याय देणार आम्हाला? इतकी बकवास व्यवस्था मोदी, शाह यांनी केली आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.






