Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Politics: सांगली महापालिकेत सत्तेचा पेच! भाजपची डोकेदुखी वाढली; काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी मोठा दावा

सांगली महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि विरोधक दोन्ही ३९ जागांवर अडकल्याने सत्तेचा पेच निर्माण झाला आहे. विश्वजित कदम यांनी समविचारी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेचा दावा केला असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 17, 2026 | 08:22 PM
सांगली महापालिकेत सत्तेचा पेच! भाजपची डोकेदुखी वाढली; काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी मोठा दावा

सांगली महापालिकेत सत्तेचा पेच! भाजपची डोकेदुखी वाढली; काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी मोठा दावा

Follow Us
Close
Follow Us:

 

  • सांगली महापालिकेत सत्तेचा पेच!
  • भाजपची डोकेदुखी वाढली
  • काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी मोठा दावा
सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीत भाजपला ३९ जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ३९ त्यामुळं दोलाईमान परिस्थिती निमार्ण झालेली असताना, भाजपला महापालिकेच्या सत्तेपासून रोखण्यासाठी समविचारी पक्षाशी बोलणी सुरू असून काँग्रेस क्रमांक दोनचा पक्ष असल्याने सत्ता स्थापनेत पुढाकार घेईल असे माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे १८ सदस्य निवडून आले असून महाविकास आघाडी अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तीन सदस्य निवडून आले आहेत. तर भाजपचे ३९ सदस्य विजयी झाले आहेत. भाजपला बहुमतासाठी एका मताची गरज आहे. तथापि, यानंतर स्थायी समितीमध्ये बहुमत राखण्यासाठी अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याने भाजपपुढे सत्ता स्थापन करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. महापालिकेत निरंकुश सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला आणखी मित्रांची गरज भासत आहे तर भाजप विरोधात निवडणूक लढवून विजयी झालेली अन्य सर्व पक्षांची सदस्य संख्याही ३९ आहे.

Bjp News : भाजपची मोठी कारवाई; ‘या’ बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी

या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे नवनिर्वाचित सदस्यांनी वांगी (ता. कडेगाव) येथे जाउन स्व. पतंगराव कदम यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार डॉ. कदमही उपस्थित होते. सांगली महापालिकेत काँग्रेस दोन नंबरचा आज पक्ष बनला असून सत्ता स्थापनेबाबत काँग्रेसच्या समविचारी पक्षांसोबत आम्हीही प्रयत्न करणार आहोत. काँग्रेस हा पक्ष सोडून ज्या पक्षांच्या नावांमध्ये काँग्रेस आहे ते सर्व आमच्या संपर्कात आहेत, सत्ता स्थापनेबाबत त्यांच्याशी चर्चा आम्ही सुरू केलेली आहे.

काही नेत्यांनी कालच याबाबत संपर्क साधला होता. तसेच खासदार विशाल पाटील यांनीही याबाबत भेट घेउन चर्चा केली आहे. ज्या समविचारी पक्षांचे नगरसेवक निवडून आलेत ते आमच्या संपर्कात आहेत, त्या पक्षाकडून आमच्याकडे काही प्रस्ताव आलेले आहेत, या प्रस्तावाबत बसून चर्चा करण्यात येईल. सांगलीत ५५ जागाच्या वर आम्ही जिंकू असं म्हणणाऱ्या भाजपला बहुमत गाठता आले नाही हाच त्यांना मोठा धक्का असल्याची टीका कदम यांनी भाजपवर केली. दरम्यान शिवसेनेचे आमदार सुहार बाबर यांनी याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील असे सांगितले तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनी राष्ट्रवादीचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार असल्याचे सांगितले.

Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले

Web Title: Sangli municipal corporation election result 2026 bjp vs congress power struggle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Sangli
  • sangli news
  • Sangli Politics

संबंधित बातम्या

Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण
1

Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या; काँग्रेसचं निवडणूक आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांना पत्र
2

जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या; काँग्रेसचं निवडणूक आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांना पत्र

Shirur News : शिरूरमध्ये अनपेक्षित राजकीय घडामोडी; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर भाजप…
3

Shirur News : शिरूरमध्ये अनपेक्षित राजकीय घडामोडी; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर भाजप…

PCMC Election Results: महेश लांडगे ‘दादां’वर ठरले वरचढ; पिंपरी-चिंचवडमध्ये मिळवली एकहाती सत्ता
4

PCMC Election Results: महेश लांडगे ‘दादां’वर ठरले वरचढ; पिंपरी-चिंचवडमध्ये मिळवली एकहाती सत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.