Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena : बाळासाहेबांचे विचार सोडल्याने तुम्हाला कामगारांनी नाकारले, संजय निरुपम यांची उबाठावर टीका

ठाकरे बंधु एकत्र आले तरी मुंबईच्या निवडणुकीत फारसा फरक पडणार नाही हे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतून दिसून आले, अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 22, 2025 | 06:16 PM
बाळासाहेबांचे विचार सोडल्याने तुम्हाला कामगारांनी नाकारले, संजय निरुपम यांची उबाठावर टीका (फोटो सौजन्य-X)

बाळासाहेबांचे विचार सोडल्याने तुम्हाला कामगारांनी नाकारले, संजय निरुपम यांची उबाठावर टीका (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडणारे आणि वारंवार भूमिका बदलणारे ठाकरे बंधु एकत्र आले तरी मुंबईच्या निवडणुकीत फारसा फरक पडणार नाही हे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतून दिसून आले, अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ठाकरे बंधु एकत्र आल्याने मुंबईचे राजकारण बदलेल असे केले जाणारे दावे या निकालाने फोल ठरले, असा टोला निरुपम यांनी यावेळी लगावला. मराठी माणसांच्या मनात बाळासाहेब ठाकरेंनंतर आता एकनाथ शिंदे यांना स्थान आहे, असे ते म्हणाले.

नरेंद्र मोदी अज्ञातवासात जाणार? फडणवीस ठरणार ‘लंबी रेस का घोडा’…; ज्योतिषाच्या भाकिताने खळबळ

निरुपम पुढे म्हणाले की, बेस्ट पतपेढी निवडणुकीपूर्वी मुंबईत उबाठा आणि मनसेची युती करण्यात आली होती. मराठी मतांसाठी त्यांनी मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण केला, असा आरोप निरुपम यांनी केला. ठाकरे बंधु एकत्र आल्याने मुंबईचे राजकारण बदलेल. तसेच ठाकरे ब्रॅंडबाबत विजयाचे दावे केले जात होते, मात्र हे दावे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत फोल ठरले. पतपेढीच्या निवडणुकीत २१ जागांपैकी एकही जागा ठाकरे बंधुंना जिंकता आले नाही. या निवडणुकीत ८३ टक्के मतदान झाले. बेस्टच्या १२ हजार मतदारांनी ठाकरे बंधुंना नाकारले, असे निरुपम म्हणाले.

मुंबईत एकच ब्रॅंड तो म्हणजे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आहेत, असे निरुपम म्हणाले. मुंबईतील मराठी माणसांच्या मनात बाळासाहेबांनंतर शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्थान आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार एकनाथ शिंदे आहेत, असे निरुपम म्हणाले. मुंबई सर्वांना सामावून घेणारं शहर आहे. या शहरात भाषिक वाद करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांना स्पष्टपणे नाकारले जाईल, असे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतून संदेश मिळाला आहे. मुंबईत उबाठाचे आमदार आणि खासदार हे मुस्लिम मतांवर निवडून आले. त्यांच्यापासून मराठी मतदार दुरावला आहे, असे ते म्हणाले.

याआधी पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात शोकाकुल वातावरण असताना मराठी भाषिकांचे कैवारी म्हणवणारे ढोंगी राजकारणी कुटुंबासह परदेशात फोटोग्राफी करण्यात मग्न आहेत, असा हल्लाबोल शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी उबाठावर केला. उबाठाने महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत कोणतीही संवेदना व्यक्त केली नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला त्यांनी पाठ फिरवली, अशी टीका निरुपम यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“आधीच रस्त्याची चाळण असूनही… “; एअर बसेसच्या निर्णयावर राजू पाटलांचा राज्य सरकावर हल्लाबोल

Web Title: Sanjay nirupam on ubt by abandoning balasaheb ideas you were rejected by the workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 06:16 PM

Topics:  

  • Sanjay Nirupam
  • shivsena

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
2

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
3

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?
4

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.