सौजन्य - नवराष्ट्र टीम
यावेळी पिठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे व सहाय्यक अधिकारी म्हणुन मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी काम पाहिले. यावेळी हात उंचावून केलेल्या या मतदान प्रक्रियेत राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गट व शरद पवार गट यांच्या युतीसह एका अपक्षाचे मत मिळवून उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार मितेश प्रदिप गादिया यांना १४ नगरसेवकांनी हात उंच करून आपली मते दर्शविली.
प्रतिस्पर्धी भाजपाच्या ११ नगरसेवकांनी उमेदवार नितीन मच्छिंद्र पाचर्णे यांना हात उंच करून मते दर्शवली. यानुसार पिठासन अधिकारी ऐश्वर्या पाचर्णे यांनी मितेश प्रदिप गादिया यांची उपनगराधक्षपदी निवड झाल्याचे घोषीत केले. त्याप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या वतीने स्विकृत नगरसेवक पदासाठी अभिजित गणेश पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने अमोल दादासाहेब चव्हाण तर भाजपाच्या वतीने राजेंद्र अरुण लोळणे यांची निवड करण्याबाबत पत्र पिठासन अधिकारी यांना दिल्याने त्यांनी स्विकृत निवड झाल्याचे जाहीर केले.
नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष मितेश प्रदिप गादिया व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्विकृत नगरसेवक अभिजित गणेश पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने अमोल दादासाहेब चव्हाण तर भाजपाच्या राजेंद्र अरुण लोळगे यांचे उपस्थित मान्यवरांनी निवडीबद्दल अभिनंदन केले .
शहरामध्ये उलट सुलट चर्चा सुरू
निवडणुकीबाहेर असणारे उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनी या निवडणुकीनंतर गटबंधन करण्यासाठी व उपनगराध्यक्ष आपला व्हावा यासाठी मोठे प्रयत्न केले असल्याची उलट सुलट चर्चा शहरामध्ये आहे. “राज्य व केंद्रात सत्तेत असलेले भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्थानिक पातळीवर एकत्र येतील, अशी चर्चा होती आणि भाजपचा उपनगराध्यक्ष होईल, अशीही अटकळ बांधली जात होती. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र आल्याने ही समीकरणे बदलली.






