संग्रहित फोटो
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुती नाहीशी झाली आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय झाला आणि माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी देखील घड्याळाच्या चिन्हावर अर्ज दाखल केला, तर आमदार अशोक पवार यांच्या विश्वासावर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक असलेले उमेदवार बाजूला जात काहींनी पक्षांतर तर काहींनी अपक्षाचे बंड हाती घेतल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तालुक्यातील गायब झाला आहे.
अर्ज दाखल करण्यापूर्वी कवठे टाकळी हाजी गटातील माजी आमदार पोपटराव गावडे यांच्यासह त्यांचे पुत्र राजेंद्र गावडे, माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुनीता गावडे तसेच रांजणगाव कारेगाव गटातील जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांनी भाजपात प्रवेश करत कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे या कवठे गटात भाजपाचे राजेंद्र गावडे विरुद्ध राष्ट्रवादीचे दामू घोडे तर रांजणगाव गटात भाजपाच्या स्वाती पाचुंदकर विरुद्ध राष्ट्रवादीच्या ज्योती पाचुंदकर या जावा जावांचा राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार असताना रांजणगाव गटातून दोघींच्या नातेवाईक असलेल्या शिवसेनेच्या अर्चना शिंदे यांनी उडी घेतली आहे.
तर शिक्रापूर सणसवाडी गटातून जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे व माजी सभापती मोनिका हरगुडे एकाच पक्षाकडून इच्छुक असताना हरगुडे यांना उमेदवारी मिळाली आणि मांढरे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंड केले मात्र मांढरे अर्ज मागे घेणार त्यामुळे येथे राष्ट्रावादीच्या मोनिका हरगुडे व भाजपाच्या कुसुम बाळासाहेब खैरे असा सामना रंगणार आहे.
तर तळेगाव रांजणगाव सांडस गटात भाजपाकडून तालुकाध्यक्ष जयेश शिंदे यांची पत्नी रेश्मा शिंदे व आमदार बापू पठारे यांची मुलगी माजी सरपंच राहुल गव्हाणे यांची पत्नी दिपाली गव्हाणे तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सारिका करपे इच्छुक असताना ऐनवेळी राष्ट्रवादीमध्ये आलेल्या रेखा बांदल यांना तसेच भाजपाकडून दिपाली गव्हाणे यांना उमेदवारी देण्यात आल्याने सारिका करपे यांनी शिवसेना व रेश्मा शिंदे आणि अपक्षाचे बंड हाती घेतले आहे, तर केंदूर पाबळ गटातून राष्ट्रवादीने प्रफुल्ल शिवले यांची उमेदवारी जाहीर केल्याने विकास गायकवाड यांनी भाजपाचे कमळ हाती घेत मैदानात इंट्री केल्याने येथे भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगणार आहे.
न्हावरा गटातून भाजपाने उचल घेत दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे यांना उमेदवारी दिलेली असताना राष्ट्रवादीने त्यांच्या विरुद्ध वृषाली वाळके यांना उतरवले असल्याने राष्ट्रवादीतील इच्छुक नाराज तृप्ती सरोदेंनी अपक्षाचे बंड हातात घेतले असताना वडगाव रासाई गटातून माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार यांनी घड्याळ हाती घेतले. भाजपाने अशोक पवार यांचे कट्टर विरोधक सचिन शेलार यांना मैदानात उतरवले आहे. तर विधानसभेच्या वेळी आमदार अशोक पवार यांच्या विरोधात धूडघूस घातलेले दादा पाटील फराटे व सुधीर फराटे यांनी अनेकांचे अर्ज दाखल करत येथे स्थानी आघाडीची घोषणा केली असल्याने येथे सर्वच पक्षांचे टेंशन वाढले आहे.
मात्र वरिष्ठ पातळीवर नेत्यांचे मनोमिलन झालेले असताना स्थानिक पातळीवर कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात असताना आता त्यांचे मनोमिलन करण्यासाठी नेत्यांना मोठे कष्ट घ्यावे लागणार हे मात्र नक्की असून, स्थानिकांची नाराजी कोणाच्या माथी पडणार आणि निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कोणाला पक्षांतरांचा फायदा होणार आणि जिल्हा परिषदेवर कोणाची वर्णी लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
हे सुद्धा वाचा : महापौर पदासाठी हालचालींना वेग; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपमधील अंतर्गत राजकारण तापले






