Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics : अमित कदमांचा कोणता झेंडा घेऊ हाती? भाजप नेत्यांशी वाढली सलगी; ठाकरे गटाच्या जीवाला घोर

सातारा-जावळी विधानसभा निवडणूकीनंतर आता अमित कदम यांची भाजप नेत्यांसोबत बातचीत वाढली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 20, 2026 | 12:31 PM
shivsena UBT amit kadam talk more with bjp shivendraraje bhosale spark in satara politics

shivsena UBT amit kadam talk more with bjp shivendraraje bhosale spark in satara politics

Follow Us
Follow Us:
  • जावळी तालुक्यात राजकीय हालाचालींना वेग
  • उद्धव ठाकरे गटाचे अमित कदम यांची भाजपची वाढली सलगी
  • अमित कदम पुन्हा पक्ष बदलण्याच्या तयारीत?
 

Political News : मेढा : दत्तात्रय पवार : राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू व कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो याचा प्रत्यय सध्या जावळी तालुक्यात दिसत आहे. सातारा-जावळी विधानसभा निवडणूक ही प्रामुख्याने उद्धव ठाकरे गटाचे अमित कदम विरुद्ध विद्यमान मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले अशी अटीतटीची लढत झाली होती.मात्र अवघ्या दोनच वर्षात अमित कदम यांनी भाजपचे (BJP Politics) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासोबत सूत जुळवलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे अमित कदम हे भाजप प्रवेश करणार का? या चर्चांना आता उधाण आले आहे.

२०२४ ची विधानसभा निवडणूक ही ठाकरे गटाकडू सचिन मोहिते लढवण्यास इच्छुक असताना देखील माजी आमदार सदाशिव सपकाळ यांच्या मध्यस्थीने ही उमेदवारी ऐनवेळी अजित पवार गटातून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अमित कदम यांना मिळवून देण्यात सपकाळ यांना यश आले. मात्र निष्ठावंत शिवसैनिक या उमेदवारीने नाराज होऊन सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. व या निवडणुकीतील ठाकरे गटाची हवा निघून गेली.

हे देखील वाचा : पंतप्रधानांना खोटे बोलण्याचा राष्ट्रीय आजार…; Women Reservationवरुन खासदार राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

त्यामुळे अमित कदम यांना आपले डिपॉझिट देखील सुरक्षित ठेवता आले नाही. मात्र या दोन वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून अमित कदम यांनी विद्यमान बांधकाम मंत्री यांच्याशी सूत जुळवलेले पाहायला मिळत आहे. रविवारी एका कार्यक्रमात याचा प्रत्यय आला.

जावळी सभापती निवडीत अमित कदम यांनी सौरभ शिंदे यांना सभापती करण्यासाठी कुसुंबी गणाच्या सेनेच्या सदस्या सुनिता दुंदळे यांचे पती विलास दुंदळे यांचे मन वळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र शेवटपर्यंत दुंदळे हे शिवसेनेशीच प्रामाणिक राहिले.अशा परिस्थितीत वसंतराव मानकुमरे यांनी शशिकांत शिंदे यांच्याशी शिष्टाई घडवून आणत पंचायत समितीची सत्ता भाजपच्या ताब्यात देण्यास मदत केली. त्यामुळे अमित कदम यांचा डाव फसला.

हे देखील वाचा : PM मोंदींना झालंय तरी काय? तमिळनाडूच्या सभेत दिसला डार्क स्कीनटोन; Viral Video, सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

अमित कदम हे नेमके कोणत्या पक्षाचे ?

ठाकरे गटाकडून विधानसभा लढवलेले अमित कदम हे ठाकरे गटात रमलेच नाहीत,चार महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिका,नगरपरिषद निवडणुकीच्या दरम्यान महाबळेश्वर नगरपरिषदेचे कदम हे शिवसेना शिंदे गटाचे निरीक्षक होते.त्यांना तिथंही यश मिळवता आले नाही,तरीही त्यांचा शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. अशातच कदम हे आता भाजप नेत्यांशी सूत जुळवत असल्याने अमित कदम नेमके कोणत्या पक्षाचे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र अद्याप त्यांनी आपली कोणतीही राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही.

Web Title: Shivsena ubt amit kadam talk more with bjp shivendraraje bhosale spark in satara politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 12:31 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Satara News
  • Shivendra Raje Bhosale

संबंधित बातम्या

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा
1

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या
2

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!
3

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी
4

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.